विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मधील रसग्रहण व ते रसग्रहण कसे केले जाते यांची सविस्तर माहिती या पीडीएफ DOWNLOAD मध्ये आहे ती पीडीएफ आपण डाऊनलोड करून सर्व माहिती वाचून त्याचा योग्य परीक्षेमध्ये उपयोग करू शकता.एखाद्या कवितेचा संपूर्ण चारही बाजूने आस्वाद घेऊन ती माहिती सारांश किंवा आशय पद्धतीने आपल्या शब्दात लिहिणे म्हणजे रसग्रहण होय.
रसग्रहणाचा प्रश्न कसा सोडवायचा
कोणत्याही कवितेचे रसग्रहण करताना आपल्याला खलील तीन बाबी विचारात घेऊनच मग रसग्रहण हे करायचे आहे.
- आशय सौंदर्य : आशय सौंदर्यामध्ये आपल्याला कवीचे व कविताचे नाव,कवितेचा विषय कश्या संबधित ही कविता आहे, कवितेची कल्पना या कवितेत कोणती व कश्याबद्द्ल कल्पना मांडली आहे, त्याचबरोबर कवितेमधून काही संदेश,उपदेश, अनुभव प्राप्त होतो का अशी सपूर्ण माहिती आपल्याला प्रत्येक कवितेत लिहावी लागते.
- काव्य सौंदर्य : काव्य सौंदर्या मध्ये आपल्याला काही महत्वाच्या ठरावीक गोष्टी ह्या लिहाव्या लागतात.म्हणजेच की कवितेत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे का केला असेल तर कवितेमधून कोणती भावना व्यक्त होत आहे. तसेच कवितेमध्ये काही प्रतिमा किंवा प्रतिके वापरली आहेत का अश्या वरिल काही कवितेच्या बारीक गोष्टीचा विचार करुण व पाहून तुम्हाला लिहायचे आहे. आणि जर भावार्थ चांगलं लक्षात ठेवला तर आपल्याला लिहिणे सोपे जाईल.
- भाषिक वैशिष्ट्ये : यामध्ये आपल्याला कवितेमधील कवीची भाषा शैली कोणती आहे व त्याची मांडणी कशी केली आहे हे आपल्याला लिहावे लागते म्हणजेच बोलीभाषा ही ग्रामीण भागातील असेल किंवा एखाद्या विषयावर आधारित असेल किंवा एखाद्या प्रसंगावर आधारित असेल किंवा एखादा संवाद देखील असू शकतो, किंवा एखादी कल्पना देखील असू शकते नेमकी कोणती भाषा शैली आहे हे आपल्याला थोडक्यात लिहायचे आहे.
कोणत्याही कवितेचे रसग्रहण करताना त्या कवितेचा आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे सारखेच येणार आहेत, फक्त कवितेच्या ओळी बदलल्यामुळे त्या कवितेचे काव्यसौंदर्य हे वेगळे लिहायचे आहे.
मराठी कविता रसग्रहणाची उदाहरणे
“दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे”
सर्वप्रथम आपल्याला कवितेचा आशय सौंदर्य करायचा आहे त्यामध्ये आपण कवितेचे नाव लिहिणार जसे की या कवितेचे नाव आहे दोन दिवस, त्यानंतर या कवितेचा कवी आहे नारायण सुर्वे, या कवितेत कवीने कामगारांच्या जीवनाचे व दुःखाचे वर्णन हे केलेले आहे. जीवनात कामगार दुःखी असतो परंतु समाजामध्ये वावरण्यासाठी खूप काम करून कष्ट देखील करत असतो, नारायण सुर्वे यांनी या कवितेमध्ये कामगारांच्या कष्टाचे व जिद्दीचे वर्णन हे केलेले आहे
यानंतर आपल्याला कवितेचा काव्य सौंदर्य लिहायचा आहे. या कवितेमधील वरील ओळींमध्ये कवीने कामगारांचे जीवन हे किती कठीण आहे हे सांगितले आहे. म्हणजेच कामगारला खूप काळ आनंद पाहण्यासाठी वाट पहावी लागते परंतु त्याचं संपूर्ण आयुष्य हे दुःखामध्येच गेलेले असते. प्रत्येक कामगाराच आयुष्य हे चिंतादायक त्रासदायक खडतर असे असते यामुळे जगावे तरी कशे हाच त्याच्यासमोर एक प्रश्न नेहमी उभा राहत असतो असे थोडक्यात आपल्याला लिहायचे आहे.
यानंतर आपल्याला कवितेमधील भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत. कवीने लिहिलेल्या या ओळींमधून कवीचे हृदय किती मोठे आहे ते वाचकाच्या डायरेक्ट काळजाला जाऊन भिडते हे आपल्याला दिसून येते. त्यांनी त्याच्या कवितेमध्ये सांगितले आहे की कामगाराचे एकंदरीत जीवन हे किती कठीण असते. त्याला त्याच्या जीवनात किती दुःखाचे चटके सोसावे लागतात हे याची माडंणी आपल्याला करायची आहे असे आपण रसग्रहण करू शकतो.
“अपकीर्ति ते सांडावी | सत्कीर्ती वाडवावी
विवेके दृढ धरावी | वाट सत्याची ||”
सर्वप्रथम आपण कवितेचा आशय सौंदर्य लिहिणार त्यामध्ये आपण कवितेचे नाव व कवित्रीचे नाव लिहिणार तर या कवितेचे नाव आहे उत्तमलक्षण आणि हे कविता लिहिली आहे संत रामदास यांनी आणि या कवितेमधून त्यांनी सांगितले आहे की चांगल्या माणसाची वैशिष्ट्ये कशी असतात आणि आपण सत्तेच्या बाजूने किंवा नेहमी सत्य कसे मांडले पाहिजे याविषयी त्यांनी माहिती सांगितली आहे थोडक्यात एक सत्यवान व्यक्तीत कोणते गुण असतात किंवा त्याची गोष्ट कशी असते हे त्यांनी सांगितले आहे
यानंतर आपल्याला कवितेचा काव्यसौंदर्य लिहायचा आहे संत रामदास सांगतात की प्रत्येक व्यक्तीने समाजामध्ये त्याची प्रतिमा ही चांगली दर्शवली पाहिजे, त्याचे वर्तन दुसऱ्याला न पटण्यासारखे कधीच ठेवले नाही पाहिजे, थोडक्यात सांगयच झाल तर काव्यसंदर्भामध्ये आपल्याला हेच लिहायचं आहे की त्या कवितेमधून त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला आहे आणि त्यात मधून आपल्याला काय भावना मिळाली काय भावार्थ मिळाला हे आपल्याला थोडक्यात मांडायचे आहे.
यानंतर आपल्याला भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहे.वरील ओळींमध्ये तीन मुद्दे महत्वपूर्ण पद्धतीने मांडले आहेत त्यामध्ये सांगितले आहे की व्यक्तीने कसे वागले पाहिजे त्याचे वर्तन कसे ठेवले पाहिजे समाजामध्ये नेहमी सत्तेच्या बाजूने ठाम कसे उभे राहिले पाहिजे, तसेच दृढ चपखलपणे हा वाक्प्रचार देखील उपयोगात आणला आहे.
फक्त काव्य सौंदर्य कसं लिहायचं (उदाहरण )
” तैसा द्यावे माझिया काज | अंकिला मी दास तुझा ||”
वरील होळीचा जर आपल्याला फक्त काव्यसौंदर्य लिहायचा झाला तर तो आपण असा लिहिणार कवी संत नामदेव यांनी ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगातून आई व बाळाच्या नात्यामधून आपले व परमेश्वराचे काय नाते असते हे सांगितले आहे आगीच्या तडाख्यात बाळाला वाचवण्यासाठी जशी प्रेमळ कष्टाळू दयाळू आई धाव घेते. तसं तू माझ्यासाठी धाव घेतोस मी तुला शरण आलेला दास आहे. अशी भावना संत नामदेव कवी विठ्ठलापुढे व्यक्त करत आहेत. आई बाळाच्या उदाहरणातून कवी संत नामदेवांचे विठ्ठल भेटीसाठी कळकळ ही यामधून व्यक्त होत आहे. भक्ती,प्रेम,व्याकुळता अशा सर्व भावना या मधून व्यक्त झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे अखंडपणे मुलाला जपणारी आई त्याला एखाद्या संकटातून दूर करते तसेच माझी विठूमाऊली देखील माझ्यासाठी धाव घेते. असा थोडक्यात आपल्याला कवितेचा आस्वाद हा लिहायचा आहे.
FAQ
10 परीक्षेला रसग्रहण किती मार्काला येते
परीक्षेला रसग्रहण हे 3 ते 5 मार्क्ससाठी येते
रसग्रहण कसे करावे
रसग्रहण हे आशय सौंदर्य,काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये या तीन पद्धतीमध्ये केले जाते