सरकारी योजना : महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन दुधाळ गाय,म्हैस वाटप योजना ही राबविण्यात येणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे व कागदपत्रे काय लागणार आहे तसेच या योजनेसाठी आपण घरबसल्या मोबाईल द्वारे अर्ज कसा करू शकतो या संबंधित सर्व माहिती खाली दिली गेली आहे
दोन दुधाळ गाय व म्हैस वाटप योजनेचा लाभ कोणाला मिळेल
दोन दूध दुधाळ गाय व म्हैस वाटप योजनेचा लाभ हा सर्वप्रथम महिला बचत गटातील महिलांना देण्यात येणार आहे,त्यानंतर दुसरा लाभ हा अल्पभूधारक म्हणजेच ज्यांच्याकडे एक ते दोन हेक्टर च्या आसपास जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यानंतर सुशिक्षित बेरोजगार जे रोजगारासाठी इकडे तिकडे फिरत असतात त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे
दोन दुधाळ गाय व म्हैस वाटत योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे
दोन दुधाळ गाय व म्हैस योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला 1 लाख 74 हजार इतके अनुदान दोन दुधाळ गाय व म्हैस विकत घेण्यासाठी मिळणार आहे ज्यामध्ये जर तुम्ही म्हैस घेत असाल तर त्यासाठी प्रति म्हैस 80 हजार व जर गाय घेत असाल तर प्रति गाय 70 हजार अशा स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे
दोन दुधाळ गाय व म्हैस योजना कागदपत्रे
- उमेदवाराचा फोटो
- ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड
- सातबारा
- रहिवासी दाखला
- स्वघोषणापत्र
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- दारिद्र्य रेषेखाली असल्याचा पुरावा
- बचत गटात असल्यास त्याचे प्रमाणपत्र
दोन दुधाळ गाई म्हैस योजनेसाठी अर्ज कसा करायचा
दोन दुधाळ काय म्हैस योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालय मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही जवळच्या ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता
जर तुम्हाला घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही युट्युब वर जाऊन या योजनेसाठी अर्ज कसा केला जातो त्याबद्दल एक प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून या योजनेसाठी अर्ज करू शकता