मातृ वंदना योजना 2.0 : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पुन्हा एकदा सर्व महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्या योजनेमध्ये पहिल्या आपत्यामध्ये व दुसऱ्या आपत्यामध्ये एकूण 11 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे, या योजनेतून महिलांना अनुदान कसे प्राप्त होणार संबंधित माहिती आपण खाली पाहूया
मातृ वंदना योजना किती अनुदान मिळणार
केंद्र सरकार मातृ वंदना योजनेअंतर्गत प्रथम आपत्य पाल्य महिलेला 5 हजार इतके अनुदान दिले जाणार ते अनुदान 3 हजार व 2 हजार अशा दोन टप्प्यात दिले जाणार आहे व यानंतर दुसऱ्या अपत्याच्या वेळी जर महिलेला मुलगी झाल्यास त्या महिलेला 6 हजार रुपयांचे अनुदान दोन टप्प्यात दिले जातील ते तीन, तीन हजार अशा टप्प्यात असते
मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करायचा
मातृ वंदना योजनेसाठी अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन गर्भधारणा असलेल्या मुलीची माहिती देऊ तिथे त्या महिलेचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे
अर्ज हा संपूर्णपणे शासकीय सरकारी दवाखान्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून भरला जातो व त्यानंतरच महिलेला जेव्हा आपत्य होते तेव्हा या योजनेचा लाभ हा अनुदानातून मिळतो
मातृ वंदना योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात
मातृ वंदना योजनेसाठी खालील ठराविक काही कागदपत्रे लागतात ज्यामध्ये सर्व कागदपत्रे तुम्हाला सरकारी दवाखान्यात घेऊन जावी लागतात
- ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
इत्यादी ठराविक कागदपत्रांची आवश्यकता या योजनेसाठी अर्ज करताना लागते