Poultry farming : ग्रामीण भागात पाहिले तर शेती पूरक व्यवसाय खूप कमी पाहायला मिळतात जसे की शेळीपालन,दूध व्यवसाय,गाय व म्हैस पालन व त्यामधीलच एक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय, हल्ली कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे, कारण असे की कुक्कुटपालन व्यवसायाला कमी भांडवल लागते व त्यामधून जास्त उत्पन्न देखील निर्माण होते असाच एक उपक्रम महाराष्ट्र मधील एका महिलेने केला आहे ज्या संबंधित आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत
पूर्वीपासून ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो व त्यातून शेतकऱ्याला आर्थिक मदत देखील प्राप्त होत असते परंतु आत्ता अनेक तंत्रज्ञान वाढल्या कारणामुळे कुकुट पालन व्यवसायाला खूप जोर आलेला आहे ज्यामुळे आता असंख्य शेतकरी हे कुक्कुटपालन हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करत आहेत ज्यामध्ये पुरेशा भांडवलात जास्त उत्पादन निर्माण होते
आपण पाहतो की पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसायात वेगवेगळ्या जातीचे संकरित पशु जाती विकसित झालेल्या आहेत ज्यामध्ये गावठी कोंबडी असेल बॉयलर कोंबडी असेल आर आर कोंबडी असेल कडकनाथ कोंबडी असेल अशा असंख्य जाती विकसित झाल्या आहेत व व्यवसायाच्या दृष्टिकोनातून यांना मागणी देखील खूप आहे
कुक्कुट पालन व्यवसाय प्रगती केलेली महिला
महाराष्ट्र मधील पुणे जिल्ह्यात असलेल्या शिवरी या गावात एक सुनंदा पवार ही महिला कुक्कुटपालन व्यवसाय करून महिन्याला एक ते दोन लाखाचे उत्पन्न काढत आहे, या संबंधित आम्ही माहिती घेतली तेव्हा आम्हाला कळाले की सुनंदा पवार यापूर्वीपासून शेती व्यवसाय करत होत्या परंतु काही कारणास्तव ते बाहेर गावात गेल्या असता त्यांना एक कुक्कुटपालन व्यवसायाचा पोल्ट्री शेड दिसला व तो शेड त्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्याची इच्छा झाली
सर्वप्रथम सुनंदा पवार यांनी 15 गावठी कोंबड्या घेऊन व्यवसाय करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कुक्कुटपालन व्यवसायासाठी लागणारा शेड नव्हता पण व्यवसाय करण्याची आवड असल्याकारणामुळे त्यांनी सुरुवातीला 15 गावठी कोंबड्या विकत घेऊन व्यवसायाला सुरुवात केली त्या पंधरा गावठी कोंबड्या मधून त्यांना दोन ते तीन महिन्यात 10 ते 12 हजार रुपयांचे उत्पन्न निघाले ते उत्पन्न त्यांनी अजून कोंबड्या विकत घेण्यासाठी गुंतवले
यानंतर जशी जशी ग्राहकांची मागणी खूप प्रमाणात वाढू लागली तसा त्यांनी त्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी घरातून पैसे घेऊन व नातेवाईकांकडून थोडीशी मदत म्हणून पैसे घेऊन त्यांनी स्वतःचा पोल्ट्री शेड उभा केला व त्यानंतर त्यांनी 100 ते 200 गावठी पिल्ले त्यामध्ये भरली व दोन ते तीन महिन्याने त्या शंभर ते दोनशे गावठी पिल्लांतून त्यांना 1 लाख रुपयांचे उत्पन्न निघाले व त्यांच्या व्यवसायाला येथून खूप मोठी भरारी मिळाली
सुनंदा पवार यांच्याकडे आत्ता पाहिले तर 500 ते 1000 कोंबड्या व कोंबडा या दोन्हींचे प्रकार आहेत यातून ते कोंबड्यांची अंडी विकून व कोंबड्या विकून महिन्याला एक ते दोन लाखाच्या आसपास उत्पन्न काढतात त्यामुळे आपण जर ग्रामीण भागातील नागरिक असेल आणि शेतीपूरक व्यवसाय शोधत असाल तर कुक्कुटपालन व्यवसाय हा आपल्यासाठी एक योग्य व्यवसाय ठरेल