व्यवसाय : आपण पाहतो की समाजामध्ये असे खूप तरुण आहेत की ज्यांचे पुरेसे शिक्षण नाही ज्यामुळे त्यांना नोकरीची संधी मिळत नाही परंतु जर त्यांनी व्यवसायाकडे लक्ष दिले तर व्यवसायामध्ये त्यांना भरघोस यश प्राप्त होऊ शकते त्यामुळे आज आपण असे पाच व्यवसाय पाहणार आहोत जे व्यवसाय करण्यासाठी तरुणाला कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज भासत नाही
Car wash buisness : मित्रांनो car wash business ( गाडी धुवने व्यवसाय ) हा व्यवसाय असा व्यवसाय आहे की जो तुम्ही कुठेही करू शकता व या व्यवसायामध्ये आपल्याला ग्राहक सापडायला लागत नाही व अगदी कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे.
आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये एक ना एक गाडी असतेच परंतु प्रत्येक जनते गाडी धुण्यासाठी एखाद्या कार वॉश सेंटरला जातो व तिथे अवघे 100 ते 150 रुपये एका मोठ्या गाडीचे धुण्यासाठी घेतात तर जर आपण विचार केला की आपण दिवसाला दहा गाड्या धुतल्या तर आपल्याला महिन्याला 30 हजार रुपये पर्यंत उत्पन्न हे निघू शकते जे की एखाद्या नोकरदाराला नसते, त्यामुळे जर तुम्ही कमी शिक्षणामध्ये व्यवसाय टाकण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय ठरेल
Food truck business : मित्रांनो फूड ट्रक व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे की जो तुम्ही चालता फिरता करू शकता ते कसे तर तुम्हाला सुरुवातीला थोडीशी गुंतवणूक करावी लागेल जे असेल एखादा छोटा हत्ती खरेदी करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला ट्रक हा संपूर्ण पदार्थ बनवून विकता येतील असा बनवावा लागेल
तुम्ही जर शहरात गेला तर पाहत असाल की शाळा,कॉलेज,दवाखाने व गर्दीच्या ठिकाणी असे ट्रक आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये खाद्यपदार्थ बनवून विकले जातात व त्याला खूप मागणी देखील असते, त्यामुळे जर तुम्हाला उत्तम प्रकारे नाष्टा पदार्थ किंवा खाद्यपदार्थ बनवता येत असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय ठरणार आहे ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही जागेचे भाडे देण्याची गरज नाही
दूध व्यवसाय : मित्रांनो पूर्ण जगभरात सर्वांच्या घरी दूध हे असतेच त्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागातील शेतकरी असाल व तुमच्या जवळ जर गाय व म्हैस असेल तर तुम्ही नक्कीच दूध व्यवसाय करायला पाहिजे ते का तर दूध व्यवसायामध्ये सर्वात जास्त ग्राहक असतात, जर तुम्ही दूध व्यवसाय केला आणि जर तुमच्या दुधाची क्वालिटी उत्तम असेल भेसळयुक्त दूध आपण जर ग्राहकांना दिले, तर आपला दुधाचा व्यवसाय खूप वाढेल व त्यामधून आपल्याला भरघोस उत्पादन देखील मिळेल
नारळ पाणी व्यवसाय : मित्रांनो आपण पाहत असाल कि नारळ पाणी व्यवसाय हा खूप प्रमाणात केला जातोय ज्यामध्ये विक्रेत्याकडे एक गाडी असते ज्यामध्ये तो नारळ घेऊन विकत असतो परंतु आपल्याला माहित आहे का त्या व्यवसायातून त्याला किती उत्पन्न मिळते तर मित्रांनो पुण्यातील एका म्हाताऱ्या माणसांनी हा व्यवसाय केलता ज्यामध्ये त्याने एका महिन्यात 60 ते 70 हजार रुपये नारळ पाणी व्यवसाय करून कमावले होते
ते कसे तर त्याने नारळ पाणी व्यवसायाची गाडी ही दवाखाना कॉलेज व शाळा व गर्दीच्या ठिकाणी लावली होती त्यामुळे त्याला ग्राहकांसाठी जास्त फिरायला लागत नव्हते व प्रत्येक नारळा मागे 40 रुपये घेऊन तो दिवसाला 200 ते 300 नारळ विकत होता त्यामुळे त्यातून सगळा खर्च वगळून त्याला महिन्याला 50 ते 60 हजार रुपये नफा होत होता यामुळे जर आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नारळ पाणी व्यवसाय पाहिला तर हा व्यवसाय एक उत्तम व्यवसाय ठरतो
मेस व्यवसाय : महिलांना व्यवसाय करण्याची खूप इच्छा असते परंतु त्यांना असा व्यवसाय पाहिजे असतो की जे त्या व्यवसाय घरबसल्या करू शकतात त्यामुळे जर आपण शहरांमध्ये राहत असाल आणि आपण एक महिला असेल तर आपण खानावळ मेस व्यवसाय सुरू करू शकता ज्यामध्ये आपण घरोघरी जेवनाचे डबे पूरवु शकतो
तसेच तुम्ही जे बाहेर गावावरून शाळा कॉलेज किंवा नोकरी करण्यासाठी विद्यार्थी येतात त्यांना देखील तुमचे डबे देऊन तुम्ही हम खानावळ मेस व्यवसाय चालवू शकत, तर महिलांसाठी हा व्यवसाय एक उत्तम व्यवसाय ठरणार आहे