Sarkari Yojana : मित्रांनो मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजना राबविण्यात येते या योजनेमधून तुमच्या विहिरीचे काम सुरू असेल किंवा तुम्हाला ये योजनेमधून नवीन विहीर करायची असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्वचा ठरणार आहे
मित्रांनो दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विहीर मंजूर करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये बरीच कागदपत्रे आवश्यक नसताना मागितली जातात ती आता या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत तर काही नियमात सुद्धा बदल हे करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पाहूया या व्हिडिओमध्ये मनरेगा अंतर्गत च्या विहीर अनुदान योजनेबाबत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या नवीन निर्णया बाबत सविस्तर माहिती
राज्यात सुविधा संपन्न कुटुंब मिशनचा भाग म्हणून प्रत्येक शेताला पाणी उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून वित्तीय वर्ष 2023 24 मध्ये राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान 15 विहिरी मागणीनुसार ती यापेक्षा अधिक राहील आणि डार्क झोन मुळे वीर शक्य नसेल तर तिथे 25 शेततळे देण्याची कार्य हाती घेतले आहे
महाराष्ट्र राज्यात शेततळ्यासाठी ऑफलाइन पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहे यामुळे राज्य शासनाने आता विहीर अनुदान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये अर्जदाराला काही ठराविक कागदपत्रे जोडून अर्ज केल्यास विहीर योजने चा लाभ मिळणार आहे, येत्या 2024 चेक जानेवारी महिन्यात राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना ही राबवणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालय मध्ये जाऊन योजनेसंबंधीत अधिक माहिती घेऊ शकता
विहीर अनुदान योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे जॉब कार्ड
- ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड
- जमिनीचा सातबारा
- भूधारणा साठी ८ अ
- बँक खाते पासबुक
- ग्रामसभेचा ठराव
- उत्पन्नाचा दाखला