केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी घरकुल योजना ज्याचा उद्देश आहे सर्वांसाठी घर यामधून महाराष्ट्र मधील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सरकार मार्फत घरकुल योजना राबवून घर दिले जाते तर ते घर मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत व आपण अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे या संबंधित खालील प्रमाणे माहिती आहे
घरकुल योजना कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- सातबारा उतारा
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- विज बिल
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र
वरील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहे
घरकुल योजना 2024 किती अनुदान दिले जाते
घरकुल योजना 2024 अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यास सरकारमार्फत 1 लाख 54 हजार रुपयाचे अनुदान दिले जाते वरील अनुदान हे तीन टप्प्यात दिले जाते जसे जसे तुमचे घराचे काम तुम्ही पूर्ण करतात त्याप्रमाणे अनुदान हे टप्प्यात दिले जाते
घरकुल योजना 2024 पात्रता काय आहे
- घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा
- अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा कमी असायला हवे तरच तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र होतो
- अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे याआधी कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे तसेच त्याने याआधी या योजनेचा लाभ घेतला नसावा
- अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने याआधी जर केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या गृह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही
घरकुल योजना 2024 साठी अर्ज कुठे करायचा
घरकुल योजना 2024 साठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जाऊन करावा लागेल त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एक अर्जाची प्रत घेऊन त्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावा लागेल व या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल