महाराष्ट्रा मध्ये आपण पाहतो की अनेक गरजू व शेतकरी नागरिकांचे वय हे 60 किंवा 65 वर्षांपुढील असते व त्या वयात त्यांना कुटुंब चालवण्यासाठी हवी तेवढी आर्थिक पैशाची मदत मिळत नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने श्रावणबाळ योजना ही महाराष्ट्रात आणली आहे ज्या योजनेतून 65 वयाच्या पुढील नागरिकांना 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात व किती अनुदान कशा स्वरूपात मिळेल याबद्दल खाली संपूर्ण माहिती दिली आहे
श्रावण बाळ योजना कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड)
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- विहित नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला
वरील कागदपत्रांची आवश्यकता या योजनेसाठी अर्ज करताना लागणार आहे त्याची पूर्तता करूनच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा
श्रावण बाळ योजना किती अनुदान मिळते
श्रावण बाळ योजनेतून पात्र लाभार्थ्यास प्रति महिना 600 ते 1500 रुपये अनुदान मिळते. अनुदान हे प्रति महिना लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होत असते
श्रावण बाळ योजनेसाठी निवड कशी केली जाते
श्रावण बाळ योजनेसाठी 60 ते 65 वया पेक्षा जास्त नागरिकांची निवड केली जाते व पात्र लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 25 हजार रुपये आतील असायला पाहिजे, असे असेल तरच या योजनेसाठी अर्जदार हा वरील कागदपत्रे जमवून अर्ज करू शकतो
श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
श्रावण बाळ योजने साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसंबंधी माहिती देऊन वरील कागदपत्रे जोडून अर्ज करू शकता