महाराष्ट्रा मध्ये गरीब कुटुंबापासून ते श्रीमंत कुटुंबामध्ये सर्वांच्या घरात ज्वारीच्या भाकरीचे सेवन केले जाते परंतु अजून असंख्य लोकांना ज्वारी खाण्याचे फायदे माहित नाहीत त्यामुळे खालील लेखात आपण ज्वारी खाण्याचे फायदे आम्ही सांगितले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचा
मित्रांनो आपण ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे पाहणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण आहारात अनेक प्रकारच्या भाकरी खात असतो त्यामध्ये मुख्यतो गव्हाची, बाजरीची आणि ज्वारीची भाकरी खातो.
या धावपळीच्या जीवनात आपण सकस आहार घेणे गरजेचे आहे. पुर्वीच्या काळी महाराष्ट्रतील लोक फास्ट फूड नावाचे पदार्थ खात नव्हते. तेव्हा त्याकाळी असलेल्या लोकांना ज्वारी सारख्या धान्यांचे महत्व कळाले होते. खेड्यातील लोक आज पण ज्वारीची भाकरी खातात . ज्वारीही फायबर युक्त असते व हे फायबर आपल्या शरीराला 48% आवश्यक आहे .
ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे आपली अन्न नलिका सुरळीत चालते. यामुळे पोटात गॅस बनत नाहीत पोट साफ होते पोट जड वाटत नाही व पोटाचे विकार देखील होत नाहीत. शरीरातील हाडे आणि शिरा मजबूत होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. कॅन्सर पासून बचाव होतो. रक्तभिसरण सुरळीत चालते. हृदयाला फायदेशीर आहे . अशाप्रकारे ज्वारीच्या भाकरीचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा जर समावेश नसेल तर हे शरीरासाठी नुकसानदायक आहे. आजपासूनच तुम्ही ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला पाहिजे .