महाराष्ट्र पोलीस खात्यातून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर भरले जाणारे पद म्हणजे होमगार्ड, या पदासाठी पगार हा प्रतिदिन 570 रुपये हा कर्तव्य भत्ता व भोजन भत्ता शंभर रुपये प्रतिदिन दिला जातो होमगार्ड या पदासाठी रेगुलर काम नसल्यामुळे त्याचा ठराविक महिन्याला पगार आपण काढू शकत नाही पण दररोजचा रोज पाहिला तर याप्रमाणेच एकूण 670 रुपये होमगार्ड या पदासाठी दिले जातात
होमगार्डचा पगार किती आहे
पद | वेतन |
होमगार्ड पगार | 670 प्रतिदिन |
होमगार्ड ला कोणती कामे असतात
- सर्वप्रथम होमगार्ड ला काम असे असते की पोलीस दलात काम करत असलेल्या पोलिसांची सहायता (मदत) करणे
- यानंतर पोलिसांप्रमाणेच राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे काम योग्यरीत्या पार पाडणे
- तसेच नैसर्गिक येणारी संकटे अपघात भांडणे अशा असंख्य अत्यावश्यक सेवांमध्ये त्यांना काम करावे लागते
- सर्वात महत्त्वाचे होमगार्ड ला काम हेच असते की जिथे संप मोठमोठे मोर्चे होतात किंवा मोठमोठे उस्तव असतात त्या ठिकाणी होमगार्ड या पदाचा बंदोबस्त लावला जातो त्यामुळे होमगार्ड या पदाला जास्त फार काम नसून फक्त पोलिसांची सहायता करणे व लोकांची मदत करणे एवढेच काम असतं
होमगार्ड या पदाची स्थापना कधी झाली
मित्रांनो महाराष्ट्रात होमगार्ड या पदाची स्थापना ही मुंबई प्रांतामध्ये 6 डिसेंबर 1946 रोजी झाली , महाराष्ट्र होमगार्ड ज्याला गुरुहरक्षक देखील बोललं जातं हे पद खास करून पोलिसांच्या साहित्यासाठी व लोकांच्या मदतीसाठी या पदाची स्थापना करण्यात आली