महाराष्ट्र शासन अंतर्गत राबवली जाणारी लाडकी बहीण योजना यासाठी पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये इतका भत्ता दिला जातो त्यामुळे या योजनेचा लाभ 2025 मध्ये खूप सार्या महिला घेत आहेत या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
लाडकी बहीण योजना कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते झेरॉक्स
- रेशन कार्ड
- फोटो व सही
- हमीपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
लाडकी बहीण योजना 2025 साठी अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता भासते ज्यामध्ये तुमचे कौटुंबिक उत्पन्न हे 2.50 लाखाच्या आत पाहिजे तसेच तुमच्याकडे बँक खाते असणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड देखील अपडेट पाहिजे
लाडकी बहीण योजना 2025 अर्ज कुठे करायचा
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे ऑनलाईन तुमच्या जवळच्या ई-सेवक केंद्रा मध्ये जाऊन व दुसरे म्हणजे तुमच्या गावात असणाऱ्या अंगणवाडी का सेविका यांच्याकडे जाऊन अर्ज करू शकता
लाडकी बहीण योजनेचा वयोमर्यादा काय आहे
लाडकी बहीण योजनेसाठी वयोमर्यादा ही सरकारने 21 ते 65 वर्ष इतकी ठेवली आहे ज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल असे सांगितले आहे
लाडकी बहीण योजना किती पैसे मिळतात
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार 2024 पर्यंत प्रति महिना दीड हजार रुपये पात्र महिलेच्या खात्यावर पाठवत होते परंतु नुकतीच सरकारने घोषणा केली आहे की 1500 वरून प्रति महिना 2100 रुपये प्रति महिलेच्या खात्यावर पाठवण्यात येतील त्यामुळे आता अनुदानात वाढ पाहायला मिळेल
लडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता ही अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असायला हवी व तिचे वय 21 वर्षे पुढील व 65 वर्षा आतील असायला हवे