संजय गांधी निराधार योजना ही अशा लोकांसाठी आहे की जे निराधार व्यक्ती आहेत, अंध, विकलांग, अनाथ मुले, दिर्घ आजारी लोक, घटस्फोटीत महिला, सोडलेली महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त महिला, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर अशा सर्वांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
- ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- अर्ज
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- आजारी असल्यास वैद्यकीय पुरावा
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला
संजय गांधी निराधार योजना अनुदान किती दिले जाते
संजय गांधी निराधार योजनेत अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्तीस दरमहा 600 रुपये अनुदान दिले जाते ज्यामध्ये एका कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर त्या कुटुंबाला एकूण 900 रुपये अनुदान दिले जाते वरील अनुदान हे वयाच्या 25 वर्षापर्यंत दिले जाते
संजय गांधी निराधार योजना पात्रता
- सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र अर्जदार हा भारताचा रहिवासी असायला हवा
- त्याचप्रमाणे त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 21000 पर्यंत असायला हवे
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची सर्व कागदपत्रे तपासूनच जर तो पात्र असेल तर त्याला या योजनेचा लाभ सरकार मार्फत दिला जाईल