मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधी योजना ही महाराष्ट्र शासन अंतर्गत राबवली जाणारी एक वैद्यकीय उपचारासाठी योजना आहे यामध्ये रुग्णास या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते व या योजनेसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे लागतात
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे
- रुग्णाची ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- रहिवासी दाखला
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
- वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (डॉक्टरांकडू)
- रुग्णाचे रेशन कार्ड
- बँक खाते झेरॉक्स
- रुग्णाच्या आजाराचे रिपोर्ट
- व मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधी अर्ज
ही सर्व कागदे घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयांमध्ये तुमच्या अर्जाची नोंद करायची आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा पण वैद्यकीय सेवांची गरज पडेल तेव्हा तुमचा उपचार हा मोफत करण्यात येईल
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी किती मिळतो
- जर दवाखान्याचा खर्च हा 20 हजार रुपये असेल तर या योजनेतून सहायता ही 10 हजार रुपये इतकी मिळते
- जर दवाखान्याचा खर्च हा 20 हजार पासून ते 50 हजार पर्यंत असेल तर या योजनेतून साहित्य ही 15000 रुपये इतकी मिळते
- जर दवाखान्याचा खर्च हा 50 हजार रुपयांपासून ते 1 लाखापर्यंत असेल तर या योजनेतून सहायता ही 20 हजार रुपये इतकी मिळते
- जर दवाखान्याचा खर्च हा 1 लाखापासून ते 3 लाखापर्यंत असेल तर या योजनेतून सहायता ही 30 हजार रुपये इतकी मिळते
- जर दवाखान्याचा खर्च हा 3 लाखापासून ते 5 लाखापर्यंत असेल तर या योजनेतून सहायता ही 40 हजार रुपये इतके मिळते
- यानंतर शेवटचं म्हणजे 5 लाखापर्यंत व त्यापेक्षा जास्त दवाखान्याचा खर्च असेल तर त्या खर्चासाठी या योजनेतून 50 हजार रुपये इतका सहायता निधी मिळतो
मुख्यमंत्री सहायता निधी फोन नंबर
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अर्ज करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही या 02222025540/02222026948 क्रमांकावर संपर्क करून माहिती घेऊ शकता
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजना आवश्यक माहिती
मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य योजनेअंतर्गत एका रुग्णाला तीन वर्षातून या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल, त्यामुळे या योजनेचा आधार हा जेव्हा जास्त गरज असेल तेव्हाच घ्या