प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस खात्यामार्फत प्रत्येक गावासाठी एक मानधनावर पोलीस पाटील नेमला जातो आणि त्या पोलीस पाटील ला पगार किती असतो व त्याचे काम काय अशा संदर्भात सर्व माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत
पोलीस पाटील पगार किती आहे
गाव पातळीवर काम करत असलेल्या पोलीस पाटील ला सुरुवातीला सरकारमार्फत सहा हजार पाचशे रुपयांचा पगार दिला जात होता परंतु नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा पगार 15000 रुपये इतका करण्यात आला आहे त्यामुळे आता प्रत्येक पोलीस पाटील चा पगार हा पंधरा हजार रुपये इतका आहे
पोलीस पाटील चे काम काय असते
पोलीस पाटील हा विविध क्षेत्रासाठी किंवा गाव पातळीवर काम करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून नेमण्यात आलेला एक व्यक्ती असतो त्याचे काम एवढे असते की त्या परिसरात किंवा गावात कायदा व सुव्यवस्था राखणे व गाव पातळीवर होणाऱ्या गुन्ह्यांची कल्पना पोलीस ठाण्यात कळवणे
पोलीस पाटील ची निवड कोण करते
पोलीस पाटील ची निवड ही जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्याकडून करण्यात येते व ही निवडणूक करताना त्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता या सर्वांचा अभ्यास करून त्याची निवड केली जाते व त्याला गाव पातळीवर काम करण्यासाठी संधी मिळते