सर्वसामान्य व गरजू लोकांना सरकारमार्फत मोफत अन्नधान्य दिले जाते परंतु याचा लाभ काही गरजू लोकांना घेता येत नाही त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड नसते त्यामुळे रेशन कार्ड कसे काढायचे व काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दाखला
- सातबारा
- शंभर रुपये स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र
- फोटो व सही
नवीन रेशन कार्ड कसे काढायचे
- नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी वरील दिलेली सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन या www.rcms.mahafood.gov.in संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे तो तुम्ही घरबसल्या देखील करू शकतात याची प्रत्यक्ष व्हिडिओ तुम्ही youtube वर पाहू शकता की अर्ज कसा केला जातो
- यानंतर तुम्हाला महसूल कार्यालयांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्यधान्य वितरण अधिकाऱ्याकडे जाऊन फोटो व्हेरिफिकेशन करून तुम्हाला नवीन रेशन कार्ड प्राप्त होईल
रेशन कार्ड चे फायदे काय आहेत
मित्रांनो रेशन कार्ड हे ओळखपत्र म्हणून देखील वापरले जाते तसेच सरकार मार्फत गरजू व गरीब लोकांना अन्य धान्य दिले जाते त्याचा संपूर्ण लाभ रेशन कार्ड असलेल्या धारकांना घेता येतो फक्त याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही दारिद्र रेषेखाली असणे खूप गरजेचे आहे तरच तुम्हाला या अन्नधान्यांचा लाभ घेता येतो तसेच एक ओळखपत्र म्हणून रेशन काढला संपूर्ण देशात मान्यता दिली आहे
पांढरे रेशन कार्ड कोणाला मिळते
पांढरे रेशन कार्ड हे जे सरकारी कर्मचारी असतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक ते दीड लाखापेक्षा जास्त असते अशा लोकांना पांढरे रेशन कार्ड मिळते व त्यांना या रेशन कार्ड मुळे सरकारमार्फत दिले जाणाऱ्या अन्नधान्य चा लाभ घेता येत नाही