परीक्षा स्वरूप,कागदपत्रे,वय ,पात्रता,पगार | zp bharti 2023

सर्व उमेदवारांना कळवण्यात येते कि १८,९३९ पदांची मेगा जिल्हा परिषद महाराष्ट्र भरती २०२३ यासाठी आत्ता काही दिवसात अर्ज भरायला सुरवात होणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ मे पर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे.आणि आज आपण पाहणार आहोत या भरतीच परीक्षा स्वरूप कस असणार आहे.तसेच कोणती,कागदपत्रे,वय,पात्रता,प्रत्येक पदासाठी वेतन किती असणार आहे.

 

जिल्हा परिषद भरती परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम 

सर्वप्रथम या भरतीची जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा ऑनलाईन चार पर्यायी पद्धतीने होणार आहे आणि 100 प्रश्नासाठी २०० गुणांची ही परीक्षा घेण्यात येईल म्हणजेच परीक्षेमध्ये १०० प्रश्न असणार आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत आणि या सर्व परीक्षेसाठी जो वेळ असणार आहे तो दोन तासाचा असणार आहे आणि हे सर्व पदांसाठी लागू असणार आहे.आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के म्हणजेच ९० मार्क हे असणे गरजेचे असणार आहे.(समान गुण असल्यास कोणाला प्राधान्य मिळेल दोन किंवा दोनहून अधिक उमेदवारांना जर समान गुण असतील तर दोघांमध्ये जर एखादा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जर पाल्य असेल तर त्याला सर्वप्रथम प्राधान्य हे दिले जाईल. त्यानंतर ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल.)

नं.विषय प्रश्नाची संख्यागुण माध्यम
1English१५ ३० इंग्रजी
2मराठी१५ ३० मराठी
3सामान्य ज्ञान/General Knowledge१५ ३० इंग्रजी व मराठी
4तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी१५ ३० इंग्रजी व मराठी
5तांत्रिक विषय/ Techincal Subject४० ८० इंग्रजी / इंग्रजी व मराठी
एकूण १०० २००

शैक्षणिक निवड/पात्रता

  • आरोग्य पर्यवेक्षक पद शैक्षणिक पात्रता सर्वप्रथम आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे विज्ञान शाखेतील तीन वर्षाची पदवी असणे गरजेचे आहे म्हणजेच थोडक्यात तुमच्याकडे BSC ही पदवी असली पाहिजे आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा बारा महिन्याचा पाठ्यक्रम हा यशस्वीरित्या पूर्ण केलेला असला पाहिजे तरच तुम्ही आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करू शकता
  • आरोग्य सेवक पुरुष पद पात्रता (बिगर पेसा) या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही माध्यमिक शाळेतून विज्ञान या विषयातून उत्तीर्ण झाले असायला पाहिजे म्हणजेच की दहावी तुमचा विज्ञान विषय असायला हवा आणि त्यामधून तुम्ही दहावी उत्तीर्ण देखील झाले असायला पाहिजेत तरच तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येईल
  • आरोग्य सेवक महिला पद पात्रता जर महिलांना या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी उमेदवाराचे सहाय्यकारी प्रवासाविका महाराष्ट्र परिचार्य परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचार्य परिषदेमध्ये ज्यांची नोंदणी झाली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांनाच या पदासाठी अर्ज करता येईल
  • औषध निर्माण अधिकारी पद पात्रता या पदासाठी जर उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर उमेदवाराकडे औषध निर्माण शास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे तरच उमेदवार आला या पदासाठी अर्ज करता येईल
  • कंत्राटी ग्रामसेवक पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान बारावी मध्ये किमान 60 टक्क्याहून अधिक गुण असले पाहिजे कोणत्याही शाखेतून असले तरी चालेल किंवा तुमच्याकडे अभियांत्रिकी पदवी असेल तर ते देखील या पदासाठी चालेल किंवा कृषी पदवी असेल किंवा बी.एस.डब्ल्यू असेल ते देखील या पदासाठी चालते
  • कनिष्ठ आरेखक पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच  आरेखक कोर्स देखील उमेदवारांनी पूर्ण केलेला असला पाहिजे.
  • कनिष्ठ लेखाधिकारी पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वातप्रथम उमेदवाराकडे पदवी असणे गरजेचे आहे बीएससी बीकॉम बीए अशी पदवी असणे उमेदवाराकडे गरजेचे आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जवळपास पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
  • पशुधन पर्यवेक्षक पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पशुधन वैद्यकीय शास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे किंवा ती पदवी नसेल तर पशुधन पर्यवेक्षक पशुधन सहाय्यक अशा बाबतीत पशुसंवर्धनाने दिलेली पदवी किंवा प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे तेव्हाच त्याला हा अर्ज भरता येईल.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे भौतिक शास्त्र रसायन शास्त्र वनस्पतीशास्त्र यामध्ये उमेदवाराची पदवी असणे गरजेचे आहे
  • लघुटंकलेखन पद पात्रता या पदासाठी उमेदवाराची टायपिंग व स्टेनो असणे गरजेचे आहे
  • विस्तार अधिकारी पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे विद्यापीठातील बीए बीकॉम बीएससी असल्याची पदवी असणे गरजेचे आहे आणि 50 टक्के उत्तीर्ण असायला पाहिजे
  • विस्तार अधिकारी सांख्यिकी पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराच विज्ञान कृषी वाणिज्य अर्थशास्त्र गणित अशा सांख्यिक विषयासह पदवी होणे गरजेचे आहे
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास व अभियांत्रिकी चा कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे
  • आरोग्य सहाय्यक पुरुष पद पेसा पात्रता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं विज्ञान विषयातून माध्यमिक शाळा शिक्षण पूर्ण झालेलं असायला पाहिजे

(सगळ्या पदांसाठी महत्त्वाची पद पात्रता) कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची एमएस-सीआयटी पूर्ण असणे हे खूप गरजेचे आहे

जिल्ह्यानुसार पदसंख्या

जिल्हा एकूण पदे 
अहमदनगर ७२९ पदे 
अमरावती ४६३ पदे 
अकोला २४२ पदे 
संभाजीनगर २६२ पदे 
भंडारा १४२ पदे 
बीड ४५६ पदे 
गोंदिया २५७ पदे 
चंद्रपूर ३२३ पदे 
गडचिरोली ३३५ पदे 
हिंगोली १५० पदे 
उस्मानाबाद ३२० पदे 
नंदुरबार ३३३ पदे 
लातूर २८६ पदे 
नाशिक ६८७ पदे 
सिंधुदुर्ग १६२ पदे 
सांगली ४७१ पदे 
ठाणे १९६ पदे 
सोलापूर ४१६ पदे 
बुलढाणा ३३२ पदे 
वाशिम 
वर्धा२६७ पदे 
रत्नागिरी४४६ पदे 
पुणे५९५ पदे 
जालना३२८ पदे 
नांदेड५५७ पदे 
कोल्हापूर५३२ पदे 
सातारा७०८ पदे 
परभणी२५९ पदे 
पालघर७०८ पदे 
रायगड५१० पदे 
जळगाव४१४ पदे 
नागपूर४१८ पदे 

महाराष्ट्रामधील पदे

महाराष्ट्र पदे संख्या
आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवक पुरुष 40%,आरोग्य सेवक पुरुष 50%,आरोग्य सेवक महिला,औषध निर्माण अधिकारी,कंत्राटी ग्रामसेवक,कनिष्ठ अभियंता ग्रा.पा.पू, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी,कनिष्ठ अभियंता विद्युत,कनिष्ठ अभियंता स्थापत्य,कनिष्ठ अभियंता स्थापत्य ल.पा,कनिष्ठ आरेखक,कनिष्ठ यांत्रिकी,कनिष्ठ लेखाधिकारी,कनिष्ठ सहाय्यक लिपिक,जोडारी,तारतंत्री,पर्यवेक्षिका,पशुधन पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,यांत्रिकी,दोरखंडवाला,लघुलेखक,लघुटंकलेखक,वरिष्ठ सहाय्यक लिपिक,वरिष्ठ सहाय्यक लेखा,विस्तार अधिकारी कृषी,विस्तार अधिकारी पंचायत,विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन,विस्तार अधिकारी सांख्यिकी ते,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ल. पा१८,९३९

FAQ

जिल्हा परिषद भरती परीक्षा फी किती आहे?

परीक्षा फी हे खुल्या प्रवर्गासाठी १,००० रुपये इतकी राहणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी ९०० रुपये इतकी राहणार आहे.

आरोग्य पर्यवेक्षक पगार किती आहे?

किमान ३५ ,४०० ते अधिक एक लाख १२ हजार ४०० दर/महा

आरोग्य सेवक पुरुष/महिला पगार किती आहे?

किमान २५५०० ते अधिक ८११०० दरमहा इतका आहे.

औषध निर्माण अधिकारी पगार किती आहे?

किमान २९ हजार २०० ते अधिक ९२ हजार ३०० दरमहा इतका आहे.

कंत्राटी ग्रामसेवक पगार किती आहे?

सुरुवातीचे तीन वर्ष दर महा ६००० इतके

कनिष्ठ अभियंता पगार किती आहे?

किमान ३८ हजार ६०० ते अधिक एक लाख २२८००

पशुधन पर्यवेक्षक पगार किती आहे?

किमान पंचवीस हजार पाचशे ते अधिक ८१ हजार १०० दरमहा इतका आहे

Leave a Comment