घरबसल्या सातबारा पीक नोंदणी व पाहणी | e pik pahani

तुम्ही जर का पूर्वीचे सातबारे उतारे पाहिले तर त्या सातबारा उतारावर वर्षानुवर्ष सारख्याच किंवा ठराविक पिकांची नोंद झाल्याचे दिसून येईल म्हणजे तुम्ही जर विदर्भात असाल तर कापूस आणि सोयाबीन हीच पीक तुम्हाला त्याच्यात नोंदवली गेलेली दिसेतील परंतु याही व्यतिरिक्त आपण आपल्या शेतामध्ये कमी प्रमाणात का होईना किंवा कमी क्षेत्रावर का होईना इतर पीके ही घेतो त्यामुळे आत्ता शासनाच्या निर्णयानुसार सगळ्या पिकांची तुम्ही सातबारा उताऱ्यावरती नोंद करू शकणार आहात यासाठी सरकारने ई पीक पाहणी हे पोर्टल तयार केला आहे.येथून सरकारला कळते की एका गावात किती पीक क्षेत्र आहे आणि तसेच शेतकऱ्यांना पीक विमा पीक कर्ज अशा योजनेचा लाभ घेण्याचे सोप होईल.

ई पीक सातबारा नोंदणी | Registration 2023

  • सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये सरकारने दिलेलं ई पीक पाहणी हे ॲप प्ले स्टोअर वरती किंवा iphone वरती apple स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करा. ( या ॲपचे व्हर्जन 2 हे अपडेट असायला पाहिजे तरच ते काम करेल नाहीतर आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअर वरती जाऊन ते अपडेट करून घ्यायच आहे)
  • यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला एक मजकूर दिसेल तो मजकूर आपल्याला डाव्या साईडला फिरवायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन मजकूर येईल यामध्ये आपल्याला आपल्या ठिकाणचा महसूल विभाग निवडायचा आहे निवडल्यानंतर पुढे दिलेल्या बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • यानंतर आता पुन्हा एकदा एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला खातेदाराचे नाव निवडण्यासाठी येईल जर तुमची याआधी या ॲप वर नोंदणी झाली असेल तर तुम्ही खातेदाराचे नाव निवडून तेथे चार अंकी संकेतांक टाकणार आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करणार
  • आणि जर याआधी तुम्ही इथे नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा इथे क्लिक करून online registration  करायचं आहे आणि सर्वप्रथम तुमची इथे नोंदणी करून घ्यायची आहे
  • नवीन खातेदाराची नोंदणी करताना सर्वप्रथम तुम्हाला विभाग निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तसेच तालुका व गाव अशा चार गोष्टी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या निवडायचे आहेत त्यानंतर खाली दिलेल्या पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर पुढे एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला खातेदाराचे पहिले नाव मधले नाव व आडनाव असे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक तुम्हाला सातबारा वरती मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे आपण गट नंबर टाकून त्या गटामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नावे आहेत ती सर्व नावे आपण पाहू शकतो. तर आपण आपल्या खातेदाराचे नाव इथे निवडायचे आहे त्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करायचं आहे
  • पुढे क्लिक केल्यानंतर एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला खातेदाराचे नाव व खातेदाराचा खाते क्रमांक दिसेल त्यानंतर पुन्हा एकदा पुढे जा या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर एक नवीन मुज्कर उघडेल तिथे आपल्याला सूचना देण्यात येईल की खालील नोंदणी ही या मोबाईल क्रमांकावरती झालेली आहे जर तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर डाव्या साईडला कोपऱ्यात मोबाईल क्रमांक बदला या बटणावरती क्लिक करून आपण मोबाईल क्रमांक देखील बदलू शकतो त्यानंतर तुम्ही परत पुढे या बटनावरती क्लिक करा त्यानंतर एक नवीन सूचना उघडेल तिथे सांगितलं जाईल की तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायचे आहे का तर तुम्हाला तिथे होय बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • हे सर्व भरल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा परत पहिल्या मजकुरावरती येऊ तर तिथे आपल्याला आपण ज्या खातेदाराची नोंदणी केली आहे त्याचे नाव तिथे निवडायचे आहे नाव निवडल्यानंतर खाली संकेतांक हा तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर  तुम्हाला आलेला असेल तो तिथे टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला संकेतांक हा प्राप्त झालेला नसेल तर तुम्ही संकेतांक विसरलात इथे क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल वरती संकेतांक मिळून जाईल
  • तर संकेतांक टाकल्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनावरती खाली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता एक नवीन मजकूर उडेल म्हणजेच आपण ई पीक पाहणी या एप्लीकेशनच्या होम पेज वरती येऊ इथे तुम्हाला वेगवेगळ्या नोंदण्या दिसतील तुम्हाला हवी असलेली नोंदणी तुम्ही नोंदवू शकता जसं की मी पीक माहिती नोंदवा ही नोंदणी तुम्हाला नोंदवून दाखवतो
  • तर पीक माहिती नोंदवा येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे जमिनीचे एकूण क्षेत्र देखील निवडायचे आहे खातेदाराचे जेवढे क्षेत्र असेल तेवढेच आपल्याला तिथे निवडायचे आहे त्यानंतर हंगाम हा आपण आपल्या परीने निवडू शकता जसे की रब्बी हंगाम धरला यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे पिकाच वर्ग या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चार पर्याय दिसतील त्यामधील निर्वळ पीक म्हणजेच एक पीक जर तुम्ही एक पीक केला असेल तर तुम्ही एका पिकासाठी तिथे नोंदणी करू शकता आणि जर तुम्ही बहुपीक म्हणजे मिश्र पीक खूप सारी पिके केली असेल तर तुम्ही त्या ऑप्शन वरती क्लिक करू शकता व नोंदणी करू शकता पिकाचा वर्ग निवडल्यानंतर खाली आपण त्या पिकाचा प्रकार निवडणार आहोत त्यामध्ये जर फळबाग असेल तर फळबाग निवडणार किंवा आपण कोणतेही पीक घेतले असेल तर आपण पीक  निवडणार
  • त्यानंतर तुम्हाला खाली पिकांची किंवा झाडांची नावे निवडायचे आहे तुम्ही कोणत पीक घेतलं असेल त्याचं नाव तिथे निवडायचा आहे किंवा जी फळबाग तुमची निवडली असेल त्या फळ बागेचं नाव तिथे तुम्हाला निवडायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला क्षेत्रभरा इथे तुमच्या जमिनीचे क्षेत्र टाकायचा आहे जे तुम्ही पहिले टाकला आहे तेवढेच तिथे तुम्हाला टाकायचा आहे.यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही तिथे निवडायचे आहे जर तुमच्या शेतामध्ये जलसिंचनाचा कोणत्याही साधन नसेल तर कोरडवाहू या पर्यायाला आपल्याला निवडायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला लागवडीचे दिनांक निवडायचे आहे जेव्हा तुम्ही लागवड केली असेल ती तारीख तुम्ही तिथे निवडू शकता
  • यानंतर तुम्हाला अक्षांश रेखांश मिळवा हे मिळवण्या अगोदर तुम्ही ज्या गटाची पीक पाहणे करत आहात त्या गटांमध्ये तुम्ही असायला पाहिजेत अक्षांश रेखांश मिळवा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे अक्षांश रेखांश आणि अचूकता हे दाखवण्यास सुरुवात होईल
  • त्यानंतर फोटो काढा या ऑप्शन वरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या पिकाची नोंदणी करत आहोत त्या पिकाचा आपल्याला फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर आपल्याला बरोबर या बटनावरती खाली क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला एक नवीन मजकुरावर पाहायला मिळेल
  • तर यानंतर आपल्याला खाली वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक आहे त्याच्यासमोर एक बारीक बॉक्स आहे तिथे क्लिक करून आपल्याला खाली हिरव्या बटणावरती क्लिक करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला सूचना देण्यात येईल की पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे आणि ही माहिती आपण पिकांची माहिती पहा या पर्यायावरती जाऊन पाहू शकतो आणि भरलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही 48 तासांच्या तिथे दुरुस्ती किंवा ती माहिती नष्ट करू शकता
FAQ

ई पीक पाहणी काय आहे

या पाहणीमध्ये तलाठ्याकडे न जाता आपण घरबसल्या कोणत्याही पिकाची नोंद आपल्या सातबारा वरती करू शकतो

ई पीक पाहणी फायदे?

पीक पाहणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा भरता येतो, आणि यानंतर आपल्या पिकाची आपण नोंद केल्यानंतर ती नोंद झालेली आहे हे दाखवल्यानंतर आपल्या पिकात जे वेळोवेळी आपल्याला  नैसर्गिक नुकसान होत असते त्याचा आपल्याला खर्च किंवा अनुदान देखील शासनाकडून मिळत असतो आपल्या पिकाची ऑनलाईन नोंद असल्याकारणाने आपल्याला पीक कर्ज देखील भेटेल.

Leave a Comment