महाराष्ट्रात 4000 पदांची तलाठी भरती | talathi bharti 2023

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मध्ये 31/12/2020 यावर्षी तलाठी गट क ही एकूण 1012 पदे इतकी महाराष्ट्र मध्ये रिक्त ठेवली होती तसेच 7/12/ 2022 या वर्षी देखील महाराष्ट्र शासनाने तलाठी पदाची नवीन पदे ही एकूण 3110 इतकी ठेवली होती परंतु दोन्हही वर्ष भरती न झाल्या मुळे महाराष्ट्र शासनने 2023 या वर्षी एकून 4122 पदांची तलाठी भरती एकाच टप्यात काढली आहे.

पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतुन  पदवीधर झालेला असावा. (मुक्त विभागतील पदवी असेल तर ती पदवी देखील या भरती साठी चालु शकते ) तसेच इंजीनियर डिग्री देखील चालेल, परंतु कोणताही डिप्लोमा किंवा आईटीआई या भरती साठी चालणार नाही.यानंतर व्ययोमर्यादा ही जर उमेदवार हा ओपन या प्रवर्गातील असेल तर वय हे 18 ते 38 इतके असायला पाहिजे.आणि जर उमेदवार केटेगिरी प्रवर्गातील असेल तर त्याच वय हे 18 ते 43 इतक असायला पाहिजे,तसेच तुम्ही खेलाडू, माजी सैनिक, किंवा भूकंपग्रस्त भागातील असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्राधान्य हे दिले जाणार आहे.

परीक्षा पद्धत / Pattern

तलाठी पदासाठी यामध्ये उमेदवाराची एकच परीक्षा घेण्यात येते ती म्हणजे लेखी परीक्षा त्याच्या व्यतिरिक्त एकही परीक्षाही उमेदवाराची घेतली जात नाही (शारीरिक चाचणी असेल इंटरव्यू किंवा मेडिकल असेल अशा कोणत्याही चाचण्या किंवा परीक्षा या पदासाठी घेतल्या जात नाही) यामध्ये फक्त तुम्हाला एकच लेखी परीक्षा पास करावी लागते त्यामध्ये तुम्हाला 200 मार्काचे 100 प्रश्न असतात. यामध्ये कोणतेही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते.

विषय प्रश्न गुण 
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी2550
अंकगणित आणि बुद्धिमत्ता2550

तलाठी सिल्याबस

  • मराठी साठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ, शब्दांचे प्रकार, जाती, नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विभक्ती, संधी, संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचार, वाक्यांचे अर्थ, प्रयोग, अचूक शब्द ओळखा, अशा सर्व व्याकरणाच्या गोष्टी मराठी अभ्यासक्रमात असणार आहेत
  • यानंतर इंग्रजी विषयासाठी सीनोनीम, अँटोनीम, प्रोव्हर्ब्स, वोकॅबिलरी, स्पेलिंग मिस्टेक, सेन्टेन्स स्ट्रक्चर, स्पॉट द एरर, क्वेश्चन टॅग, पॅसेज टेंसेस
  • यानंतर चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान मध्ये महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, तसेच महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, समाज सुधारक, राज्यघटना, पंचायत राज, भारतीय संस्कृती, विज्ञान विभागातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जैविक शास्त्र, प्रश्न यानंतर चालू घडामोडी मध्ये मनोरंजन राजकीय, सामाजिक, क्रीडा, आर्थिक, अशा घटकांवर प्रश्न
  • यानंतर बुद्धिमत्ता व अंकगणित यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ वेग अंतर घड्याळ, सरासरी व्याज,चलन, मापन, नफा तोटा, शेकडेवारी, यावर प्रश्न यानंतर बुद्धिमत्ता मध्ये अंक मालिका अक्षर मालिका वेगळा शब्द वेगळे अंक ओळखा अक्षर ओळखणे तसेच आकृती ओळखणे

तलाठी भरती Cut ऑफ

कास्टकट ऑफ
OPEN186
OBC170
EWS172
SC164
ST156
2023 मध्ये तलाठी पदासाठी जास्त प्रमाणात जागा असल्यामुळे याचा कट ऑफ थोडा कमी देखील लागू शकतो त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास हा चांगला करावा व जास्तीत जास्त प्रश्न कसे बरोबर येतील यावर लक्ष द्यावे.

पगार / वेतन

तलाठ्याचा जो पगार असणार आहे तो सुरुवातीला जर तलाठ्याची पोस्टिंग ही जिल्ह्यांमध्ये झाली तर सुरुवातीचे वेतन हे 39 हजार इतकं मिळत आणि यानंतर जर तलाठी पोस्टिंग ही ग्रामीण किंवा खेडेगावात तालुक्याच्या ठिकाणी झाली तर त्याच सुरुवातीच वेतन हे पस्तीस हजार इतकं असतं

वेतन रक्कम 
तलाठी पगार ३९ हजार किमान आणि १ लाख हून अधिक 

तलाठी प्रमोशन

  • जेव्हा तलाठी या पदासाठी तुम्ही काम करता किंवा जॉईन होता तर सुरुवातीचे दोन वर्षे हे तुमचा ट्रेनिंग पिरेड असतो सुरुवातीचे दोन वर्षे तुम्हाला एखाद्या तलाठीच्या हाताखाली देखील काम करावे लागते जोपर्यंत तुम्हाला सर्व कामाची माहिती प्राप्त होत नाही किंवा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेनिंग म्हणून काम करावे लागते. तसेच तुम्हाला त्यामधे मंडल अधिकारी च्या हाताखाली देखिल काम करावे लागते. आणि त्यानंतर दोन वर्षांनी तुमची एक परीक्षा होती त्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावे लागते आणि त्या परीक्षेत जेव्हा तुम्ही पास होता त्यानंतर तुम्हाला तलाठी हे पद परमनंट मिळते.
  • जेव्हा तुम्ही दोन वर्षानंतर एक स्वतंत्र तलाठी होता त्यानंतर तुम्ही सात ते आठ वर्षाच्या कालावधीमध्ये तलाठी या पदावरून तुमचं प्रमोशन हे मंडळ अधिकारी या पदावर होऊ शकत परंतु प्रमोशन हे कॅटेगिरी नुसार देखील होऊ शकत जर तुम्ही ओपन या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला नऊ-दहा वर्षे देखील लागू शकतात
  • मंडळ अधिकारी झाल्यानंतर पुन्हा सात ते आठ वर्षानंतर तुमचे प्रमोशन हे नायब तहसीलदार या पदासाठी होऊ शकते आणि त्यानंतर तुमचं प्रमोशन हे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या पदासाठी होते परंतु इथपर्यंत शक्यतो कोणीही जात नाही. हे प्रमोशन मिळवण्यासाठी तुमची सर्व कामे ही खूप चांगली असायला पाहिजेत.

तलाठी भरती 2023 कागदपत्रे

  • या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एकूण 13 ते 14 कागदपत्रे ही लागतात त्यामध्ये सर्वात पहिलं उमेदवाराकडे आधारकार्ड असणे गरजेचे आहे व ते आधारकार्ड उमेदवाराचे अपडेट असायला पाहिजेत म्हणजेच त्या आधारकार्ड बरोबर उमेदवाराचा मोबाईल नंबर हा लिंक असायला पाहिजे.
  • त्यानंतर उमेदवाराकडे पॅन कार्ड असणे देखील गरजेचे असणार आहे त्यामुळे पॅन कार्ड देखील तुम्हाला लागणार आहे
  • यानंतर तुमच्याकडे जर वाहन चालवण्याचे लायसन असेल तर ते देखील तुम्ही तुमच्याजवळ ठेवा त्याची देखील तुम्हाला गरज भासणार आहे
  • यानंतर दोन फोटो तुम्हाला लागणार आहेत त्यामुळे फोटो देखील तुम्ही तुमच्याजवळ ठेवा व तसेच तुमची एका कोऱ्या कागदावर सही देखील तुम्हाला लागणार आहे या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा
  • यानंतर तुम्हाला दहावी बारावी तसेच पदवी असल्याचे मार्कशीट तुम्हाला तिथे लागणार आहे ऑनलाइन स्कॅन करण्यासाठी त्यामुळे ही तीन मार्कशीट किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे
  • यानंतर तुम्हाला TC किंवा LC लागणार आहे नाहीतर तुमच्याकडे जर दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट असेल ते देखील चालेल.
  • त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर तुम्ही कॅटेगरीत बसत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे.
  • यानंतर उमेदवाराकडे नॉन क्रिमिनल असल्याचा दाखला असणे खूप गरजेचे आहे हे देखील तुम्हाला लागणार आहे
  • त्यानंतर महिलांसाठी WR सर्टिफिकेट हे लागणार आहे जर एखादी महिला ओपन या कॅटेगरीमध्ये असेल तर तिला WR सर्टिफिकेट हे लागणार आहे
  • यानंतर उमेदवाराकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे देखील गरजेचे आहे हे देखील तुम्हाला लागू शकतं
  • यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलेडीटी देखील लागणार आहे जे पण उमेदवार कास्ट मध्ये बसणार आहेत त्यांना हे लागणार आहे
  • यानंतर तुम्हाला MS-CIT सर्टिफिकेट हे लागणार आहे त्यामुळे तुमच्याकडे एमएस-सीआयटी सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे.
  • अशी वरील सर्व कागदपत्रे ही तुम्हाला तलाठी या भरतीसाठी लागणार आहेत त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधी ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत की नाही हे तुम्ही तपासूनच ऑनलाईन फॉर्म साठी अर्ज करा.

तलाठी जिल्ह्यानुसार जागा

जिल्हा जागा संख्या 
नाशिक10035
औरंगाबाद847
कोकण731
नागपूर580
अमरावती183
पुणे746
FAQ

तलाठी परीक्षेची वेळ किती असते

तलाठी भरती लेखी परीक्षा वेळ ही 120 मिनिटाची आहे.

तलाठी अभ्यासासाठी कोणती पुस्तके घ्यावी

विषय पुस्तके 
मराठीबाळासाहेब शिंदे पुस्तक
इंग्रजीबाळासाहेब शिंदे किंवा एम जे शेख पुस्तक 
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीतात्याचा ठोकळा आणि अभिनव प्रकाशन हे पुस्तक
अंकगणित व बुद्धिमत्तासतीश वसे यांचे पुस्तक

तलाठी म्हणजे काय

ग्रामीण भागातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणजे तलाठी होय

Leave a Comment