डिजिटल ७/१२ कसा काढायचा | digital signature satbara

शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनी विषयी जर कोणतेही कायदेशीर काम करायचे असेल तर आपल्याला जमिनीचा सातबारा लागतो आणि तो सातबारा जेव्हा आपण काढण्यासाठी तलाठी कडे जातो तलाठी कडे जातो तेव्हा काही कारणास्तव आपल्याला तो सातबारा मिळत नाही किंवा जेव्हा आपण तो सातबारा काढण्यासाठी  तलाठी कार्यालयात जातो तेव्हा तिथे तलाठी उपलब्ध न असल्या कारणाने आपल्याला तो दाखला देखील मिळत नाही त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की आपण ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढू शकतो. व या डिजिटल सातबारा चा उपयोग आपण कुठेही कायदेशीर कामात करू शकतो.घरबसल्या सातबारा मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या भूलेख वेबसाईटवर अर्ज करून किंवा तुम्ही सातबारा उतारा डिजिटल पद्धतीने सरकारच्या वेबसाईटवर म्हणजेच महाभुलेख या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता.

आँनलाईन 7/12

  • शेतकरी मित्रांनो डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला गुगल वरती bhulekh.mahabhumi.gov.in असं गुगल वरती टाकून सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला digital signed satbara Login लॉगिन असं इंग्लिश मध्ये दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल जिथे तुम्हाला लॉगिन करायचं आहे लॉगिन मध्ये आपल्याला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे रेगुलर लॉगिन आणि दुसरं म्हणजे ओटीपी लॉगिन, तर रेगुलर लॉगिन मध्ये आपल्याला खूप माहितीही भरावी लागते त्यामुळे आपण ओटीपी लॉगिन करणार तर ओटीपी लॉगिन करताना तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल क्रमांक तिथे टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सेंड ओटीपी तिथे क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक पाच ते सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरिफाय ओटीपी या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन मजकूर उघडेल
  • सातबारा डाऊनलोड करण्याआधी एक महत्त्वाची सूचना ऑनलाइन सातबारा डाऊनलोड करण्यासाठी प्रति सातबारा आपल्याला पंधरा रुपये लागतात जसे की आपल्याला खाली सूचना दिली आहे रिचार्ज च्या तिथे तुम्हाला शून्य रुपये असे दिसत असेल तिथे तुम्हाला प्रथम सातबारा डाऊनलोड करण्यासाठी रिचार्ज करायचा आहे रिचार्ज आपण ऑनलाइन पेमेंट मेथडने करू शकतो आणि त्यानंतरच तुम्ही सातबारा हा डाऊनलोड करू शकता तुम्ही फोन पे किंवा ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून रिचार्ज केल्यानंतर तो रिचार्ज तुम्हाला तिथे खाली दिसेल
  • त्यानंतर आपल्याला वरील माहिती भरून सातबारा हा डाऊनलोड करून घ्यायचा आहे त्यासाठी प्रथम आपल्याला सर्वात पहिला जिल्हा निवडायचा आहे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा आपल्याला तिथे जिल्हा निवडायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचं आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे तालुक्यामधील तुम्ही कोणत्या गावांमध्ये राहता ते निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचं सर्वे नंबर आणि गट नंबर हा टाकायचा आहे
  • हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला खाली डिजिटल सातबारा हा डाऊनलोड करायचा आहे, हा सातबारा डाऊनलोड झाल्यानंतर खाली तुमचे पंधरा रुपये कट झालेले तुम्हाला दिसून येतील.सातबारा हा तुमचा पीडीएफ मध्ये डाउनलोड होईल त्यानंतर तुम्हाला त्या संकेत स्थळावरुण लॉगआउट व्हायच आहे

बोगस सातबारा कसा ओळखायचा

  • आज काल खूप सारी लोक ही एक बनावट पद्धतीचा ७/१२ तयार करून बँकिंग कडून कर्ज घेतात किंवा त्यांची जमीन इतर लोकांना विकून फसवणूक करतात त्यामुळे असंख्य गुन्हे देखील दाखल होतात आणि खूप साऱ्या लोकांची फसवणूक देखील होते त्यामुळे आज आपण माहिती घेणार आहोत की जर तुम्ही एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असाल आणि समोरच्या व्यक्तीचा सातबारा हा खरा आहे की खोटा आहे हे ओळखण्यासाठी आपण काय करावं हे आपण आत्ता जाणून घेऊया
  • सर्वप्रथम आपल्याला सातबारा उतारा वरती तलाठी ची सही आहे का हे पहिलं पाहून घ्यायचं आहे प्रत्येक सातबारा उतारा वरती तलाठी ची सही असतेच त्यामुळे तुम्हाला दाखवलेल्या सातबारा वरती जर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा एकदम बोगस आहे
  • यानंतर जर सातबारा हा डिजिटल पद्धतीचा ऑनलाइन स्वरूपात असेल आणि असा तो तुम्हाला जर दाखवला. तर त्या सातबारा वरती आपल्याला पाहिचे आहे की खालच्या बाजूला एक सूचना दिली जाते त्या सूचनेमध्ये सांगितले जाते की गाव नमुना सात व गाव नमुना 12 हा डिजिटल असल्यामुळे त्यावर कोणत्याही सहीची गरज भासत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे कोणी डिजिटल स्वरूपाचा सातबारा घेऊन आले तर खालील बाजू सूचना नसेल तर तो सातबारा बनावट आहे.
  • यानंतर बोगस सातबारा ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे क्यू आर कोड सरकारने जेव्हापासून ऑनलाईन डिजिटल सातबारा काढला आहे तेव्हापासून सरकार त्या सातबारा वरती एक किंवा कोड देत आहे तू जर आपण स्कॅन केला तर आपल्याला त्या व्यक्तीचा ओरिजनल सातबारा हा दिसेल किंवा त्या जमिनीचा खरा मालक कोण आहे हे आपल्याला कळेल त्यामुळे डिजिटल सातबारा वरती किंवा कोड आहे की नाही ते आपल्याला तपासून घ्यायचं आहे
  • बोगस सातबारा ओळखण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे त्याच्यावरती असलेला LGD  आणि ई महाभुमी प्रकल्पाचा लोगो हा असणे गरजेचे आहे LGD कोड हा प्रत्येक गावासाठी एक विशिष्ट कोड दिला जातो हा कोड गावाच्या नावापुढे नमूद केला जातो.

त्यानंतर त्या डिजिटल सातबारा वरती महाराष्ट्र शासनाचा आणि ई भूमीचा लोगो हा असतो महाराष्ट्र शासनाचा जो लोगो असतो तो वरच्या बाजूला मध्ये असतो आणि ई भूमीचा जो लोगो असतो तो मध्यभागी असतो.तर वरील सर्व बाबी लक्षात घेऊनच तुम्ही जमिनीचे खरेदी विक्री करा किंवा तपासून घ्या

FAQ

सातबारा उतारा म्हणजे काय

७/१२ म्हणजे जमिनीची एक प्रकारची ओळख कारण प्रत्यक्ष जमीन पाण्यासाठी न जाता आपण त्या जमिनीची संपूर्ण माहिती बसल्या जागी सातबाऱ्यातून मिळवू शकतो.

सातबारा असण्याचे फायदे

जर आपल्याकडे ७/१२ असेल तर आपल्याला सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता येतो तसेच महसुली न्यायालय दिवानगी न्यायालय याच्या मधले जे खटले असतात त्यामध्ये देखील सातबाराचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो

Leave a Comment