महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात परंतु त्यामध्ये आज आपण अशा तीन सरकारी योजना पाहणार आहोत की ज्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेता येऊ शकतो.
कोल्ड स्टोरेज योजना
सर्वप्रथम आपण पाहूया कोल्ड स्टोरेज योजना तर शेतकरी मित्रांनो भारत सरकार द्वारे असंख्य योजना शेतकऱ्यासाठी राबवल्या जातात त्यामधील ही एक योजना आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त व फायदेशीर योजना म्हणून देखिल ओळखली जाते. असं का तर, आपण जर भाजीपाला उत्पादक असाल किंवा फळ उत्पादक असाल किंवा फुले उत्पादक असाल तर आपण पाहिलं असेल शेतकरी अनेक प्रकारच्या भाज्यांची फळांची फुलांची लागवड ही करत असतो परंतु भाज्यांची फळांची व फुलांची लागवड करत असताना त्यांना जर योग्य भाव मिळाला नाही किंवा माल मार्केटला न्यायला वेळ लागला किंवा उष्णतेमुळे देखील त्यांचा माल हा खराब होत असतो त्यामुळे त्यांना दरवर्षी लाखोचे नुकसान हे होत असते, आणि हेच नुकसान टाळण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या कोल्ड स्टोरेज मशीन आता उपलब्ध झालेल्या आहेत ज्यामध्ये जर आपण एखादा माल ठेवला तर तो माल पाच ते सहा दिवस थंड राहून टिकू शकतो, तसेच जर आपण फळांची शेती करत असाल तर त्यासाठी कोल्ड स्टोरेज एक योग्य यंत्र मानले जाते. त्यामुळे आता खूप सारे शेतकरी हे भाजीपाला व फळे जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी हे कोल्ड स्टोरेज यंत्र विकत घेत आहे. परंतु कोल्ड स्टोरेजची जर किंमत पाहिली तर त्याची किंमत ही खूप जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने ,एखाद्या शेतकऱ्याला जर कोल्ड स्टोरेज ही मशीन घ्यायची असेल तर त्याला 50% हून अधिक अनुदान देण्याचे ठरवले आहे. म्हणजेच कोल्ड स्टोरेज ही मशीन जर एक लाख रुपयाची असेल तर सरकार त्यासाठी पन्नास हजार इतके व त्याच्याहून अधिक अनुदान हे तुम्हाला देणार आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज हे उपलब्ध होईल व त्याच्या मालाचे नुकसान देखील होणार नाही.
कोल्ड स्टोरेज योजना अर्ज
- शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या www nabard.org या संकेतस्थळा वरती जावे लागेल.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर योजना या मजकुरावरती जा आणि त्यानंतर किसान समृद्धी योजना आपल्याला निवडायची आहे.
- त्यानंतर तुमचे तिथे राज्य निवडा आणि ऑनलाइन फॉर्म येईल तो तुम्हाला तिथे पूर्णपणे व्यवस्थित भरायचे आहे.
- तसेच त्या अर्जामध्ये तुम्हाला व्यवसायाची माहिती विचारली जाईल त्यामुळे तुमचा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायचीच माहिती तुम्ही तिथे द्या
- यानंतर तुम्हाला या अर्ज साठी काही कागदपत्रे लागतील ती तुम्हाला तिथे दाखवली जातील ती सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे आणि त्यानंतर ती सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत अपलोड केल्यानंतर तुम्हाला शेवटला काही शुल्क भरायला लागेल आणि त्यानंतर तुमचा अर्ज हा या योजनेसाठी सबमिट होईल.
- अर्ज केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल त्यासाठी तुम्ही ज्या वेबसाईट वरती अर्ज केला आहे त्या वेबसाईट वरती दररोज अपडेट राहणे हे गरजेचे राहणार आहे ज्यामुळे या योजनेचा लाभ तुम्हाला भेटला आहे की नाही हे कळेल अधिक माहितीसाठी तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन हेल्पलाइन नंबर ला देखील संपर्क करू शकता.
कृषी पर्यटन योजना
शेतकरी मित्रांनो कृषी पर्यटन योजना ही एक अशी योजना आहे की ज्या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यालाच घेता येतो कारण की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व त्याच्या उत्पन्न वाढीसाठी ही योजना खास करून राबवण्यात येते आणि त्याचबरोबर या योजनेमुळे प्रत्येक गावाचा शहराचा व देशाचा देखील विकास होऊ शकतो ते कसं तर आता आपण या योजनेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया ज्या शेतकऱ्यांची गावामध्ये पडीक जमीन असते किंवा अधिक जमीन असते त्या जमिनीला शेतकऱ्याला कृषी पर्यटनासारखे बनवायचे आहे त्यासाठी शेतकऱ्याला त्या जमिनीत फुले फळे व शेतीविषयक अशा गोष्टी की ज्यामधून त्याला उत्पन्न मिळेल किंवा त्याच्या उत्पन्न वाढीस मदत होईल, परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमची जमीन कृषी पर्यटनासारखी बनवाल तर तेव्हा नक्कीच शहरातील लोक तुमच्या कृषी पर्यटन बघायला भेट देण्यास तेव्हा तुम्ही त्या फळांच्या व फुलांच्या विक्री मधून एक उत्पन्न निर्माण करू शकता,या योजनेमध्ये पर्यटन विभागाकडून शेतकऱ्याला त्याचे क्षेत्र कृषी पर्यटन क्षेत्र बनवण्यासाठी अनुदान दिले जाते अनुदान हे प्रति एकर 50 हजार रुपये इतके आणि पंचवीस ते पन्नास टक्के इतकी सबसिडी ही शेतकऱ्याला दिली जाते या अनुदानाचा वापर करून शेतकरी हा त्याच्या शेतामध्ये अनेक प्रकारची झाडे म्हणजेच फळझाडे किंवा फुलझाडे लावू शकतो ज्यामधून शेतकऱ्याची कमाई देखील वाढते व निसर्ग वाढीसाठी देखील मदत होते.
कृषी पर्यटन योजना अर्ज
- शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही www agritourism.mahaonline. gov. in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- या योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो जमिनीचा सातबारा अशा अनेक ठराविक कागदांची गरज भासणार आहे ज्याची माहिती तुम्हाला ऑनलाईन संकेतस्थळावर ती मिळून जाईल आणि हा अर्ज भरण्यासाठी कोणताही शुल्क तुमच्याकडून आकारला जात नाही आणि सर्व माहिती वाचूनच तुम्ही लक्षपूर्वक हा अर्ज भरा आणि अर्ज भरल्यानंतर त्या संकेतस्थळावर त्या अर्ज बाबत माहिती घेत रहा.
नाबार्ड डेरी पशुपालन योजना
शेतकरी मित्रांनो नाबार्ड पशुपालन योजना एक अशी योजना आहे की ज्यामध्ये शेतकरी जर पशुपालन व्यवसाय करत असेल म्हणजेच की शेतकऱ्याकडे गाई म्हैस असेल तर त्या गाईच्या व म्हशीच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्याला जेवढा खर्च वर्षाला येत असतो त्या खर्चासाठी शेतकऱ्याला नाबार्ड डेरी पशुपालनाकडून अनुदान दिले जाते.
जर एखाद्या गावामध्ये एखादा शेतकरी गाय पाळत असेल तर ती गाय पाळण्यासाठी त्याला वर्षाला एक लाख रुपये इतका खर्च येत असेल तर सरकार त्या शेतकऱ्याला 25% अनुदान देते म्हणजेच 25 हजार रुपये इतकं अनुदान शेतकऱ्याला हे मिळणार आहे या योजनेमार्फत ज्यामुळे नक्कीच शेतकऱ्याचा थोडाफार खर्च हा कमी होईल आणि उत्पन्न वाढीस मदत होईल.
नाबाड डेरी पशुसंवर्धन योजना अर्ज
- शेतकरी मित्रांनो नाबार्ड डेरी पशुसंवर्धन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला www nabard.Org या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- फॉर्म भरताना तिथे दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला अचूकपणे फॉर्म भरायचा आहे.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर बँकेचे पासबुक तसेच ज्या बँकेचे पासबुक तुम्ही भरणार त्या बँकेचे मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि यानंतर पशुपालनाच्या संबंधित नोंद म्हणजे जर तुम्ही दूध उत्पादनाची नोंद केली असेल तर ते देखील तुमचं चालू शकतं अशा वरील सर्व गोष्टी तुम्हाला लागणार आहेत.
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला याच संकेतस्थळावरती येऊन तुम्हाला योजनेच्या योजनेच्या कालावधीपर्यंत चेक करायचं आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहात का नाही.
शेतकरी मित्रांनो वरील ज्या तीन योजना सांगितल्या आहेत त्या तीनही योजनेची एक छोटीशी सविस्तर माहिती आपल्याला सांगितली आहे त्यामुळे या योजनांबाबत सविस्तर माहितीसाठी तुम्ही एखाद्या कृषी अधिकाऱ्याला किंवा जवळच्या पंचायत समिती किंवा ग्रामसेवकाला याच्याबद्दल अधिक माहिती तुम्ही विचारू शकता किंवा माहितीमध्ये दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन त्या योजनेच्या हेल्पलाइन नंबर ला संपर्क करून तुम्ही या योजनेबाबत अधिक माहिती प्राप्त करू शकता