शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी हे शेती पूरक व्यवसाय हे शोधत असतात परंतु शेतीपूरक व्यवसाय करत असताना काही व्यवसायला खर्च हा खूप लागतो जसे की गाई म्हशींचा जर व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी सुरुवातीला गाय म्हशी विकत घेण्यासाठी खर्च हा एकून 70 ते 80 हजारापर्यंत आजच्या काळात होतो. परंतु एखाद्या शेतकऱ्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी हा खर्च एक मोठा खर्च आहे. त्यामुळे आपण आज पाहणार आहोत गाय म्हशींच्या व्यवसायानंतरचा एक उत्कृष्ट शेती पूरक व्यवसाय तो म्हणजे शेळीपालन व्यवसाय हा व्यवसाय कमी भांडवलात जास्त उत्पादन देणारा शेतकऱ्याचा एक प्रमुख व्यवसाय आहे.
शेतकरी मित्रांनो शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय असला तरी आपल्याला यामध्ये जास्त गुंतवणूक ही सुरुवातीला करायची नाही जर आपण शेळीपालन पहिल्यांदाच करत असाल तर आपल्याला सुरुवात ही एका शेळी पासून करायची आहे आणि त्या शेळीच्या अनुभवावरती आपल्याला पुढे त्या एक शेळीमध्ये संख्यांची वाढ करायची आहे. कारण या व्यवसायासाठी भांडवल कमी लागते त्यामुळे खूप सारे शेतकरी हे या व्यवसायाची सुरुवात ही 20 ते 25 शेळ्यांपासून सुरुवात करतात आणि त्यांना या व्यवसायाबद्दल अनुभव नसल्या कारणामुळे त्यांना पुढे जाऊन या व्यवसायात तोटा होत असतो. त्यामुळे आज आपण दोन पद्धतीने शेळीपालन कसे करता येईल यावर माहिती घेणार आहोत.
एक शेळी किती नफा व किती तोटा देईल
पहिल्या पद्धतीमध्ये आपण पाहूया की जर आपण एक शेळी पाळली तर ती शेळी आपल्याला किती नफा व किती तोटा देईल, यामध्ये आपण शेळी खरेदी करण्यापासून ते खाद्यांपर्यंत किती खर्च येतो यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.
- शेतकरी मित्रांनो शेळी खरेदी करताना आपण तीन प्रकारच्या शेळ्या खरेदी करू शकतो त्यामधील पहिली म्हणजे आदत शेळी,म्हणजेच की जी शेळी दहा ते बारा वयाची आहे आणि ती शेळी आतापर्यंत गाभण राहिली नाही अशी शेळी आपल्याला खरेदी करण्यासाठी विकल्प असतो.
- यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्रकारामध्ये आपण अशी शेळी पाहतो जी पहिल्यांदाच गाभण राहिलेली आहे आणि सध्या देखील गाभण स्थितीत आहे अशी शेळी आपण खरेदीसाठी पाहतो आणि यानंतर तिसऱ्या प्रकारामध्ये आपण अशी शेळी पाहतो जिने आधी पिल्लांना जन्म दिलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आता ती गाभण आहे अशा तीन प्रकारांमध्ये आपण शेळी ही खरेदी करू शकतो.
शेळी खरेदी खर्च
- शेतकरी मित्रांनो शेळी आपण तीन प्रकारांमध्ये खरेदी करू शकतो हे आपण पाहिलं त्यामध्ये आता आपण पहिला प्रकार म्हणजे आदत शेळी जी अजून गाभण राहिलेली नाही अशी शेळी जर आपल्याला विकत घ्यायची असेल तर ती शेळी आपल्याला बाजारामध्ये नऊ ते दहा हजार रुपयात एक शेळी मिळू शकते. समजा जर तुम्हाला त्या शेळ्या घ्यायचे असतील तर तुम्हाला 90 हजाराच्या आसपास ही किंमत मोजावी लागणार आहे आणि तसेच या दहा शेळ्यांसाठी एक बोकड आपल्याला बिडिंग साठी लागतो त्याचा खर्च नऊ ते दहा हजार इतका येतो.
- शेतकरी मित्रांनो यानंतर जर आपल्याला दुसऱ्या प्रकाराची शेळी घ्यायची असेल म्हणजेच एक अशी शेळी की जी पहिल्यापासूनच गाभण राहिलेली आहे. अशी शेळी तुम्हाला बाजारामध्ये नऊ ते दहा हजारापर्यंत भेटून जाईल.
- यानंतर तिसऱ्या प्रकारची जर शेळी आपल्याला विकत घ्यायची असेल म्हणजे एक अशी शेळी जिने आधीच पिल्ले दिली आहेत परंतु सध्या गाभण आहे अशी शेळी आपल्याला इतर शेळ्यांपेक्षा थोडी जास्त महाग मिळते म्हणजेच 13 ते 14 हजारापर्यंत अशी शेळी आपल्याला मिळून जाईल व आपल्याला एक बोकड पण घ्यायचा आहे यासाठी दहा ते बारा हजार रुपये लागती. वरील शेळी व त्यांचा खर्च हा सरासरी काढलेला खर्च आहे त्यामुळे तुमच्या भागात ज्याप्रमाणे विक्री होत असेल त्याप्रमाणे तुम्हाला खर्च हा होणार आहे.
शेळी शेड खर्च
शेतकरी मित्रांनो शेळी पालन व्यवसायात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे शेळी शेड तर आपण जर प्रथमच शेळीपालन हा व्यवसाय करत असाल तर आपल्याला शेड साठी सुरुवातीला खर्च करायचा नाही.त्यामुळे आपण सुरुवातीला लाकडांपासून एखादं कच्चं शेड उभारणार यामध्ये शेळ्यांसाठी सावली राहील व हवा पाण्यापासून त्यांचं थोडं संरक्षण होईल असं कच्चं शेड उभारणार जर आपण एक शेळीपाळत असाल तर आपण आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्याला त्या शेळी साठी व बोकडासाठी पण जागा करू शकतो. त्यासाठी तुम्हाला खर्च देखील येणार नाही त्यामुळे सुरुवातीच्या वेळेस या व्यवसायासाठी जेवढा खर्च टाळता येईल तेवढा आपल्याला टाळायचा आहे. आणि जर आपण पंधरा ते वीस शेळ्यांसाठी जर विचार करत असाल तर आपण तीस ते पस्तीस हजाराचा एक मोठा शेड हा बांधू शकता.
शेळी खाद्य व सांभाळणे खर्च
शेतकरी मित्रांनो या व्यवसायात शेळ्यांचे जर खाद्य पाहिले तर शेळ्यांना हिरवा पाला,सुक्का पाला,झाडाचा पाला,तसेच काही खुराक अशा गोष्टी खाण्यासाठी लागत असतात, सुख्या चाऱ्याचा जर विचार केला तर त्यामध्ये गव्हाचा भुसा,सोयाबीनचा भुसा,मुगाचा भुसा,तुरीचा भुसा या पद्धतीचा सुखा चारा तुम्ही देऊ शकता. हा सर्व भुसा तुम्हाला बाजारामध्ये चार ते पाच रुपये प्रति किलो या भावाने मिळून जातो. यानंतर हिरवा चारा जर आपण पाहिला तर त्यामध्ये मका सात ते आठ रुपये किलो या भावाने मिळून जातो. यानंतर शेवटी खुराकमध्ये घरगुती धान्य म्हणजे गहू,बाजरीचा भरडा,मक्याचा भरडा,पेंड असा घरगुती खुराक आपण देऊ शकतो, यामध्ये एका शेळीला रोजचा खुराक हा 15 ते 20 रुपये इतका येतो. आणि तुमच्या घरचा चारा जर नसेल जर तुम्हाला सगळं विकत घ्यायचं असेल तर त्या शेळीला महिन्याला पाचशे ते सहाशे रुपये इतका खर्च येऊ शकतो खुराक टाळण्यासाठी आपण शेळ्या जर जंगलामध्ये फिरवत असेल तर त्याचा फायदा देखील आपल्याला होणार आहे व आपल्याला खर्च देखील कमी होणार आहे तसेच अनेक सारी झाडे ही शेळ्या खात असतात त्यामुळे त्या झाडांचा पाला तुम्ही आणून घरात साठवून ठेवू शकता किंवा वाळवून शेळ्यांना घालू शकता त्यामध्ये देखील तुमचा खर्च वाचणार आहे.
एक शेळी मागे किती उत्पन्न होईल
शेतकरी मित्रांनो नवीन शेळ्या विकत घेतल्यानंतर त्यांना आपल्या भागातील वातावरण सूट व्हायला किंवा आपल्या इथे सेट व्हायला पंधरा ते वीस दिवस लागत असतात आणि सेट झाल्यानंतर जर आपण त्या शेळ्या लावल्या तर जवळपास सहा महिन्याने ते करडे हे देत असतात म्हणजेच पिल्ले ही देत असतात. आणि 80 टक्क्यापेक्षा अधिक शेळ्या एकाहून अधिक पिल्लाला जन्म देत असतात. त्यामुळे सहा महिन्यानंतर एका शेळीला दोन पिल्ले होणार आणि एका शेळीने दोन्ही बोकड जातीची पिल्ले दिली,तर ती पिल्ले जर आपण तीन महिन्यांनी विकायला काढली तर आजच्या घडीला नऊ ते दहा हजार इतका एका बोकडाचा भाव आहे त्यामुळे आपल्याला त्या बोकडांमधून अठरा ते वीस हजार रुपये मिळणार आहेत. परंतु हेच बोकड तुम्ही सात ते आठ महिने तयार केले आणि जत्रा किंवा ईद च्या सिझनला विकले तर त्याचा भाऊ नक्कीच 14 ते 15 हजार प्रति बोकड असा मिळतो आणि समजा जर शेळीने दोन पाठी जन्माला घातल्या म्हणजेच दोन शेळ्या जन्माला घातल्या तर त्या देखील शेळ्यांचा भाव 9 ते 10 महिन्यानंतर 13 ते 14 हजार प्रति शेळी असा तुम्हाला विकता येईल.
तर शेतकरी मित्रांनो असा तुम्हाला शेळी पालन व्यवसायासाठी खर्च व नफा तोटा होणार आहे या व्यवसायाची संबंधित माहिती मिळवण्यासाठी आपल्या तालुक्यातील किंवा गावाच्या सभोवताली जे पण शेळीपालन व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण अधिक या व्यवसायाबाबत माहिती घेऊ शकता