शेतकऱ्याने कमवले 70 दिवसात 7 लाख | कोबी लागवड

शेतकरी मित्रांनो नोकरीच्या शोधात खूप सारे युवक फिरत आहेत परंतु त्यामधील काही युवक असे आहेत की पाच दहा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतामधून एक व्यवसाय केलेलाच बरा असाच एक पंढरपूर मधील हनुमंत माळी नावाच्या शेतकऱ्याने कोबी लागवड करून अवघ्या 70 दिवसात 7 लाखाचे उत्पन्न कमवले, कुठे शहरांमध्ये जाऊन वर्षाला कंपनीमध्ये काम करून दोन तीन लाख कमावणारा हनुमंत माळी याने अवघ्या दोन ते अडीच महिन्यात 300 ते 400 पटीने जास्त पैसे हे कमवले. आज आपण त्यांनी कशी कोबी लागवड केली आणि एवढं उत्पन्न काढलं यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेतकऱ्याला कमी पिकामध्ये जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणजे भाजीपाला पीक त्यामुळे खूप सारे तरुण शेतकरी हे आता भाजीपाला पिकाकडे वळत आहेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत माळी. वडिलांची पहिल्यापासून ऊस शेती होती. परंतु ऊस शेतीमध्ये कारखाने हे दोन चार महिने बंद असतात त्यामुळे ऊसाची बिले ही शेतकऱ्याला मिळत नाही त्याचे नुकसान त्याला पुढील पिकावर होते. त्यामुळे चालू परिस्थितीला परवडत नसल्यामुळे हनुमंताने भाजीपाला म्हणजेच तरकारी पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्यांदाच त्याने 26 जुलै रोजी 70 हजार रोपांची कोबी लागवड केली. आणि अडीच महिन्यानंतर त्याला त्या लागवडीतून सात लाख रुपये इतकं उत्पन्न निघालं आता आपण कोबी लागवडीबाबत संपूर्ण माहिती पाहूया.

कोबी लागवडीसाठी शेतीची मशागत कशी करायची

शेतकरी मित्रांनो कोणतीही लागवड करायची झाली तर त्याआधी आपल्याला शेतीची मशागत करावी लागते. तर हनुमंत माळी सांगतात की या कोबी लागवडीसाठी आपण पहिल्यांदा जमिनीची उभ्या व आडव्या पद्धतीने नांगरट करून घेणार. त्यानंतर आपल्याला प्रति एकर तीन ते चार ट्रॉली गांडूळ खत किंवा शेणखत हे टाकायचा आहे. (आणि या आधी जर आपण त्या शेतामध्ये इतर कोणतेही पीक घेतले असेल तर त्या पिकाचे सर्व अवशेष आपल्याला बाहेर काढून टाकायचे आहेत) त्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये रोटर मारून ते सर्व खत मिसळून बेड तयार करायचे आहेत. आपल्याला बेड हा साडेचार फुटावर एक बेड असा करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती लॅटरल ड्रीप टाकून एका फुटाला तीन रोप अशा पद्धतीने रोपांची सेटिंग करायची आहे.

कोबी बियाने

सिजेंटा कंपनीच सेंट किंवा सेमीनीज कंपनीच सेंट या दोन्ही वाणांचा तुम्ही वापर करू शकता सिजेंटा कंपनीच सेंट याची किंमत प्रति रोप एक रुपये इतकी आहे आणि सेमिनिस कंपनीच्या सेंट या रोपाची किंमत 50 पैसे इतकी प्रति रोप येते. आणि एका एकर मध्ये आपण वीस ते पंचवीस हजार इतकी रोपे ही लावू शकतो.

कोणत्या कोबीला मागणी जास्त असते

शेतकरी मित्रांनो एक कोबी हा एक किलो ते पाऊन किलो असेल तर त्याला मागणी किंवा दर जास्त असतो.त्यामुळे आपण कोबी जास्त किलोचा किंवा साईजचा तयार केला नाही पाहिजे आपण त्याच आकाराचा किंवा किलोचा कोबी बनवला पाहिजे ज्याचा बाजारामध्ये आपल्याला चांगला भाव मिळेल.

कोबी खत व्यवस्थापण

  • रोप लागवड केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच सर्वप्रथम आपल्याला ड्रीपने ह्युमिक ऍसिडने पाणी द्यायचं आहे
  • त्यानंतर आपल्याला तयार केलेल्या बेडमध्ये बेसल डोस द्यायचा आहे.बेसल डोसमध्ये आपण युरिया, 24.24,18.46, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे देखील प्रॉडक्ट आपण वापरू शकता आणि लँड पावर या सर्व गोष्टी मिक्स करून आपल्याला बेड वरती टाकायच्या आहेत.
  • त्यानंतर लागवडीनंतर आपल्याला चौथ्या दिवशी एक बुर्शीनाशक सोडायचे आहे.
  • कोबी वर करपा व आळी या दोन प्रकारचे रोग होतात आणि यांचा नियोजन आपल्याला दर आठ दिवसाला फवारणी करायची आहे
  • त्यानंतर लागवडीच्या मध्य काळात आपल्याला एखाद्या मायक्रोन्यूट्रिएंट ची फवारणी करत राहायची आहे, सरासरी महिनात आपण तीन फवारणी करू शकतो.
  • फवारणी ही आपण पौर्णिमा व अमावस्या या दिवशी करू शकतो कारण म्हणजे असे काही कीटक असतात जे अंडी किंवा प्रजनन हे अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी करत असतात त्यामुळे फवारणी आपण त्या दिवशी किंवा त्याची आदल्या दिवशी केली तर आपल्या पिकावरील कीटक नष्ट होतील.

पाणी नियोजन

आपल्याला वापसा पद्धतीने पाणी हे दोन ते तीन दिवसातून एकदा द्यायचे आहे. कोबी या पिकाला पाणी हे उसा पेक्षा तर कमीच लागते त्यामुळे पाण्याची एवढी काळजी नाही.

कोबी पीक खर्च व नफा

कोबी या पिकासाठी खर्च हा प्रति एकर 30 ते 40 हजार इतका येतो. त्यामध्ये संपूर्ण मजुरी खर्च रोपांचा खर्च फवारण्यांचा औषधांचा खर्च हा मिळवून एवढा खर्च येतो. आणि यामध्ये जर नफ्याचा विचार केला तर नफा हा बाजारभावानुसार होतो जसं की कोबीची विक्री ही नगाने न होता किलो ने होते त्यामुळे जर कोबीचा भाव प्रति किलो दहा रुपये इतका असेल तर तेव्हा शेतकऱ्याला चांगले उत्पादन हे होते. प्रत्येक एकर पहिले तर वीस हजार ते पंचवीस हजार रोपांची लागवड ही करता येते आणि त्यामधून उत्पादन हे 18 ते 20 टन इतके होते, आणि यामधून दहा रुपये प्रति किलो भावाने 18 ते 20 टनाचे पैसे हे दीड ते दोन लाख रुपये इतके होतात. कधी कधी तर कोबी हा 20 रुपये प्रती किलो या भावाने जातो त्यामुळे एका एकरमधुन 3 ते 4 लाखच उत्पन्न हे निघत. त्यामुळे आपण जर योग्य वेळी लागवड केली तर नक्कीच 3 महिन्यात आपला माल तयार होईल व त्याला चांगला भाव मिळेल.(परंतु वरिल माहिती वाचून लगेच लागवड करायच्या आधी आपण कृषी अधिकाऱ्याकडून योग्य माहिती घेऊनच कोबी लागवाड करणार)

Leave a Comment