17 लाखाची वांग्याची शेती | वांगी लागवड माहिती

शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप सारे शेतकरी असे मिळतात की त्यांच्याकडे पुरेशी जमीन नसल्यामुळे ते शेती पूरक व्यवसाय करत नाहीत किंवा एखाद्या अशा तरकारी पिकाची लागवड  देखिल करत नाहीत ज्यामधून त्यांना वर्षाल उत्पन्न मिळेल. त्यामुळेच आज आपण त्या सर्व शेतकऱ्यांसाठी,ज्यांच्याकडे जमीन कमी आहे त्यांना त्याच जमिनीत एक व्यवसाय कसा सुरु करता येईल. या बद्द्ल आपण सपूर्ण माहिती घेणार पाहणार आहोत.

wangi lagwad in marathi

शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फलटण तालुक्यातील मच्छिंद्र मुळीक नावाचा एक शेतकरी ज्याच्याकडे दीड ते पावणे दोन एकर इतकी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये तो वांगी पिकाची लागवड करून वर्षाला 15 ते 20 लाखाचे उत्पन्न हे काढत आहे. आणि त्याच उत्पन्नातून मच्छिंद्र याने एका वर्षात वीस लाख रुपयांचा बंगला देखील बांधला. सर्वांच्या दररोजच्या जीवनातील आहारामध्ये खाली जाणारी भाजी म्हणजे वांग्याची भाजी. आणि जसे की वांग्याचे पीक हे बाराही महिने चालते त्यामुळे याचाच विचार करून मच्छिंद्र मुळीक यांनी वांगी लागवड करण्याचा निर्णय घेतला. आणि करोनानंतर सुरुवातीच्याच वर्षी एका एकरामध्ये त्यांनी वांगी लागवड केली. आणि या वांग्यांचा तोडा हा आठ ते दहा महिने इतका चालला आणि हा सर्व आठ दहा महिन्याचा तोडा विकून त्यांना त्यावर्षी प्रति किलो चाळीस रुपये इतका भाव मिळाला व त्यांचा एकूण तोडा हा 20 टन इतका गेला आणि त्यावर्षी त्यांना वार्षिक उत्पन्न हे 12 ते 13 लाखाच झालं. त्यांना आजपर्यंत एवढ उत्पन्न केव्हाच झालं नव्हतं. अजूनही ते त्यांच्या शेतामधून 300 किलो वांगी प्रतिदिवशी काढतात व बाजारामध्ये व्यापाऱ्याकडे विकतात.अवघा दहावी पास झालेला मच्छिंद्र यांनी पहिल्यांदाच एका वर्षात एवढे उत्पन्न काढलं होतं. तर आता आपण सविस्तर माहिती पाहूया की मच्छिंद्र मुळीक हे वांग्या पिकाची लागवड कशी करतात.

वांगी लागवडीसाठी राण कस पाहिजे

शेतकरी मित्रांनो वांगी पिकाची लागवड करताना आपल्याला जमीन ही चांगली निचरा होणारी जमीन पाहिजे म्हणजे आपल्या जमिनीत पाणी धरून ठेवले नाही पाहिजे जमिनीतून पाणी निघून गेले पाहिजे अशी जमीन आपल्याला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला आपल्या जमिनीची मशागत करून घ्यायची आहे म्हणजेच जर आपण आपल्या जमिनीमध्ये याआधी कोणतेही पीक घेतल असेल तर त्या पिकाचे सर्व अवशेष आपल्याला जमिनीमधून काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण जमिनीमध्ये उभ्या व आडव्या पद्धतीने नांगरट करून घेणार नांगरट झाल्यानंतर प्रति एकर शेतामध्ये तीन-चार ट्रॉली गांडूळ खत किंवा शेणखत आपण टाकणार ज्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल व जमिनीला लागणारे अन्नद्रव्य देखील मिळून जातील त्यानंतर आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे. त्यानंतर लागवड करण्यासाठी आपल्याला दोन सरींमधलं अंतर हे सात ते आठ फुटाचे ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मल्चिंग व ड्रॉप टाकून बेड भरून घ्यायचे आहेत. अशाप्रकारे आपल्याला ही लागवड करायच्या आधी जमिनीची पूर्व मशागत करायची आहे.

वांगी लागवड कशी करायच

  • सर्वप्रथम वांगी लागवड करताना दोन रोपांमधील अंतर आपल्याला दोन ते अडीच फुट इतक ठेवायचा आहे.
  • यानंतर लागवड करण्यासाठी महाराष्ट्रमध्ये सर्वात प्रसिद्ध बाण म्हणून ओळखले जाणारे पंचगंगा जातीच वांग्याच बाण तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या हवामानानुसार जवळपास कृषी अधिकाऱ्याला विचारून तुम्ही बाणाबद्दल अधिक माहिती घेऊ शकता.
  • पंचगंगा वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हे बाण बाजारामध्ये चांगले चालते व या बाणाची वांगी ही एक लमकुळ्या अंडाआकार स्वरुपाची असतात ज्याची किंमत आपल्याला बाजारामध्ये चांगली मिळून जाते.
  • आणि पंचगंगा या वाणातुन आपल्याला 30 ते 40 टन प्रती एकर काढणीपर्यंत माल हा निघतो. आणि या वाणाची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर या वाणाचा कालावधी हा दहा ते अकरा महिन्यापर्यंत चालतो.
  • तसेच या वाणाच्या लागवडीपासून दोन ते अडीच महिन्यानंतर आपल्या पिकाला वांगी लागण्यास सुरू होतात.
  • एक एकर मध्ये पंचगंगा जातीच्या वाणाची रोपे अडीच ते तीन हजार काडी इतकं बसते. फक्त जमीन ही चांगली निचऱ्याची असायला पाहिजे म्हणजेच की पाऊस पाणी पडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी साठवून नाही राहिलं पाहिजे एवढेच बाकी जमीन कुठल्याही प्रकारची असली तरी चालेल.
  • तसं सांगायचं झालं तर वांग पीक हे बारा महिने चालणारे पीक आहे त्यामुळे तुम्ही याची कधीही लागवड करू शकता. पण जर तुम्ही याची लागण उन्हाळी हंगामात म्हणजे एप्रिल मे महिन्यात केली तर तुम्हाला पुढे आठ-दहा महिने वांग्याचे बाजार भाव चांगले मिळून जातात.

टॉप तीन वांग लागवडीसाठी बियाणे

शेतकरी मित्रांनो वांग लागवडीमधील खालील वाण हे उत्तम दर्जाचे व जास्त जास्त उत्पादन देणारे टॉप तीन वान आहेत.

  • त्यामधील सर्वात पहिल वान म्हणजे पंचगंगा सीड्सच सुपर गौरव हे वाण आणि या वाणामुळे अवघ्या 45 ते 50 दिवसात वांग हे लागवडीपासून ते तोडणीसाठी तयार होत.
  • यानंतर दुसर वाण आहे म्हको कंपनीच मही 4 हे वाण. हे वाण देखील लागवडीसाठी एक उत्तम वान आहे निळसर स्वरूपाची वांगी या वाणाला येतात तसेच या वांग्याची टिकवन क्षमता ही खूप चांगली आहे.
  • यानंतर तिसर जे वाण आहे ते आहे अनकूप कंपनीच 1093 हे वाण, या वाणाला देखील मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे हे देखीलवाण आपण वापरू शकता.

वांग्याच्या किडीसाठी खत व्यवस्थापन

  • शेतकरी मित्रांनो वांग्या पिकाची जर आपल्याला वयोमर्यादा वाढवायचे असेल तर आपल्याला त्या पिकाच्या किडी वरती नियंत्रण ठेवणे हे खूप गरजेचे आहे. तर वांग्या पिकामध्ये तीन-चार प्रकारच्या किडीचा अभाव हा पिकावरती होत असतो जसे की फळातील आळी, शेंड्यातील आळी,कळीतली आळी,तसेच पांढरी माशी, याच्या पासून आपल्याला त्याचा बचाव करावा लागतो. आणि हा बचाव करण्यासाठी आपल्याला पिकावरती अळीचे स्प्रे घ्यावे लागतात. त्यामध्ये अनेक कीटकनाशकांचा म्हणजेच डेलिगेट स्प्रे, लार्विन, रॉकेट,उलाला,माशीसाठी किफन स्प्रे, अशी आपल्याला कीटकनाशकांची फवारणी घ्यावी लागते.
  • यानंतर जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा रोप कोणत्याही किडीने जळले नाही पाहिजे यासाठी आपण सुरुवातीला वेळेवर वेळेवर डेन्सिंग  घेतली पाहिजे, बाजारात रोपांची मुळे वाढण्यासाठी काही लिक्विड भेटतात ती कृषी अधिकाऱ्याला दाखवून घेतली पाहिजे.
  • आणि जेव्हा रोप मोठे व्हायला सुरुवात होईल तेव्हा सेंड आळीचा परिणाम आपल्या रोपावरती होतो तर त्याचा बचाव करण्यासाठी आपल्याला फवारण्या ह्या घेत राहायच्या आहेत.
FAQ

बाजारामध्ये चांगलं वांग कसं ओळखायचं

चांगलं वांग ओळखण्यासाठी आपल्याला वांग्याची साईज ही मिडीयम आकाराची असावी व त्याचा देट हा हिरवा व लमकुळा व खालील भाग अंडाकृती असेल तर ते वांग चांगलं वांग म्हणून ओळखले जाते. 

चांगल्या वांग्यांची रोपे कुठे मिळतात

नर्सरी या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जातीची व चांगल्या प्रकारची वांग्याची रोपे ही मिळून जातात.

एक एकर वांग्यातून किती उत्पन्न मिळते

शेतकरी मित्रांनो एक एकर लागवडी मधून जवळपास 10 ते 12 लाख रुपये इतके उत्पन्न मिळते. उत्पन्न हे बाजारभावावरती ठरलेल असतं त्यामुळे जर बाजार भाव जास्त असेल तर याच्या पेक्षा जास्त देखील आपल्याला उत्पन्न मिळू शकत परंतु बाजार भाव कमी असेल तर याच्या पेक्षा कमी देखील आपल्याला उत्पन्न हे मिळू शकत.

Leave a Comment