वडिल गेले हे कळले तरी त्याने बॅटिंग केली | virat kohli information in marathi 

मित्रांनो वर्ष होते 2006 आणि नेहमीप्रमाणे भारतामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत एक मॅच होती दिल्ली विरुद्ध कर्नाटक आणि या मॅचच्या दरम्यान पुनीत नावाचा एक उत्कृष्ट कोच हा जेव्हा कपडे बदलन्याच्या खोली मध्ये जातो तेव्हा त्याला तिथे दिसतो अठरा वर्षाच्या विराट कोहली ज्याच्या डोळ्यातून अश्रूची धारे ही चालू होती. ते पाहून तो कोच विराट कोहलीला विचारतो की काय झालं तू का रडत आहे तर विराट कोहली त्या कोचला सांगतो की काही वेळापूर्वीच माझ्या वडिलांचा ब्रेन स्ट्रो या आजाराने मृत्यू झाला आहे. तर त्यावेळी मॅच सुरू झाली नव्हती त्यामुळे सर्व खेळाडूंनी व त्या कोचने विराट कोहलीला घरी जाण्यास विनंती केली. परंतु त्यावेळी विराट कोहली कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. त्याला त्यावेळी त्याच्या टीम साठी खेळणं व वडिलांच्या मला क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नासाठी खेळणं महत्वाच वाटत होत. त्यावेळेस विराट कोहलीच्या मनात काय चाललं आहे हे कोणालाही कळत नव्हत त्यामुळे सर्वांनी त्याला जास्त आग्रह न करता त्या वेळेस त्या मॅच मध्ये खेळू दिल.आणि त्याच मॅच मध्ये विराट कोहलीने 90 रन बनवून एक आपल्या वडिलांन साठी एक शेवटची भेट दिली. हेच नाही तर ज्या दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्या दिवशी तारीख होती 18 आणि तेव्हापासूनच विराट कोहलीने त्याच्या शर्टचा नंबर हा 18 केला. या 18 वर्षाच्या मुलामध्ये एवढं धाडस होतं की आपले वडील गेले आहेत हे माहीत असून देखिल  तो मैदानावरती खेळत होता.आणि अशाच ध्येयामुळे तो जगातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला आहे.आज आपण विराट कोहली विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

नैसर्गिक कौशल्याने भरलेला व खूप मेहनत घेऊन एक उत्कृष्ट खेळाडू बनणारा विराट कोहली याचा जन्म हा 5 नोव्हेंबर 1988 साली दिल्लीमध्ये झाला. आई वडील, तो आणि त्याला एक मोठा भाऊ असे चार जणांच छोटसं मध्यमवर्गीय कुटुंब होतं वडील प्रेम कोहली हे क्रिमिनल लॉयर होते व आई सरोज कोहली घर काम करत असायची. विराट कोहली ला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. अवघ्या नऊ ते दहा वर्षाचा असतानेच त्याने मॅचेस खेळायला सुरुवात केली होती.आणि विराटच्या वडिलांनी त्याचं क्रिकेट विषयी प्रेम कौशल्य व ध्येय पाहून त्यांनी 9 वर्षाच्या लहान वयामध्ये वडिलांनी त्याला राजकुमार शर्मा यांची पश्चिम दिल्लीमध्ये असणारी क्रिकेट अकॅडमी देखील जॉईन करुण दिली. आणि ह्याच ॲकॅडमीने आणि राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहली हा एक पुढे येऊन मोठा खेळाडू बनला. आणि ह्याच ॲकॅडमी मध्ये त्याचा क्रिकेट मध्ये पाया एवढा मजबूत झाला की त्याला सर्व बारीक बारीक गोष्टी चा अभ्यास झाला होता त्यामुळे खूप मेहनत घेऊन त्याचा अखेर कार भारताच्या अंडर 19 या संघामध्ये निवड करण्यात आली.

विराट कोहलीचा सुरुवातीचा संघर्ष

  • विराट कोहलीला क्रिकेट या खेळामध्ये लहानपणापासूनच आवड होती परंतु विराट कोहलीला जगातील एक मोठा खेळाडू बनण्यासाठी खूप संघर्ष घ्यावा लागला त्यामधील एक संघर्ष म्हणजे वयाच्या 18 व्या वर्षीच वडिलांचे दुःखद निधन झाले त्याचा प्रभाव विराट कोहलीच्या मानसिक तेवर पडला आणि पुढील काही काळ त्याला त्याच विचाराने गुंतवून ठेवून त्याचा तोटा त्याला त्याच्या खेळामध्ये झाला. विराट कोहली सांगतो की त्याचे वडील त्याला सोडून गेले हा विराट साठी सर्वात एक मोठा धक्का होता. त्याचे वडील नेहमी त्याला त्याच्या क्रिकेट विषयी असणाऱ्या ध्येयाला मार्गदर्शन करत असायचे त्याला नेहमीच वडिलांकडून क्रिकेटसाठी पूर्णपणे सपोर्ट होता त्यामुळे जेव्हा वडील त्याला सोडून गेले तेव्हा त्याच्या मानसिकतेवर काही काळ परिणाम झाला.
  • विराट कोहलीला सुरुवातीच्या काळात आणखी एका गोष्टीसाठी खूप सामोरे जावे लागले ते म्हणजे त्याच्या शरीराचे वजन शरीराचे जास्त वजन असल्यामुळे आणि चेहऱ्याचा आकार खूप जाड असल्यामुळे असंख्य खेळाडू त्याची मैदानात खिल्ली उडवत असत.व अशा टीकाणमुळे त्याचे कुठे ना कुठेतरी नुकसान हे त्याच्या खेळामध्ये त्याला जानवू लागले. त्यामुळे त्याने एक निश्चयाने व ध्येयाने त्याच्या फिटनेस कडे व आहाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत विराट कोहली फिटनेस मध्ये एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो.

विराट कोहली अंडर 19 करिअर

विराट कोहली रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये त्याच्या रनांचा आकडा पाहून व त्याची उत्कृष्ट खेळी पाहून. 2002 मध्ये दिल्ली अंडर 15 या संघासाठी त्याची निवड करण्यात आली व त्यामध्ये त्याने देखील उत्कृष्ट खेळी ही सर्वांसमोर दाखवली. ज्यामुळे त्याची 2006 मध्ये भारताच्या अंडर 19 या संघामध्ये देखील निवड करण्यात आली. आणि यामध्ये देखील त्यांनी असंख्य राणांचा वर्षाव करून एक उत्कृष्ट खेळी खेळली. ज्यामुळे दर्शकांच व सिलेक्टरांच लक्ष त्यांने पूर्णपणे वेधून घेतलं. व 2008 मध्ये भारताच्या अंडर 19  क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. आणि पुन्हा यामध्ये देखील त्याने व त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने क्रिकेट जगाचे लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे वेधून घेतले आणि त्यानंतर त्याची भारतीय संघामध्ये निवड झाली.

विराट कोहली आंतरराष्ट्रीय करियर

विराट कोहली चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये प्रवास हा सचिन तेंडुलकरच्या भारतीय क्रिकेट संघातील शेवटच्या वर्षापासून सुरू झाला विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये निवड ही 2008 मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यांमध्ये त्याची निवड करण्यात आली परंतु त्याला या सामन्यामध्ये खेळायला मिळाले नाही यानंतर त्यांने जून 2011 मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा पहिला कसोटी सामना खेळला. आणि त्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी पाहून त्याला भारताचा एक प्रमुख फलंदाज आणि भविष्यातील एक कर्णधार म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.

विराट कोहली चे संपूर्ण रेकॉर्ड

विराट कोहली ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 70 शतके व 109 अर्धशतके आणि एकूण 22000 हून अधिक धावा त्यांने पूर्ण आंतरराष्ट्रीय करियर मध्ये बनवल्या आहेत. तसेच तो एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सर्वात फास्ट 8 हजार 9 हजार 10 हजार 11 हजार 12 हजार रन बनवणारा खेळाडू बनला आहे. 2017 मध्ये एम एस धोनी कर्णधार या पदावरुण रिटायर झाल्यानंतर विराट कोहलीची भारतीय संघाचा नवीन कर्णधार म्हणून निवड करण्यात आली त्याचबरोबर विराट कोहलीला 2017,2018 व 2019 मध्ये तीन वेळा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून देखील गौरविण्यात आले आहे.

विराट कोहली कडून या गोष्टी शिकल्या पाहिजेत

  • ध्येय आणि कठीण : विराट कोहलीला सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्यामागे कुठे ना कुठेतरी त्याच्या क्रिकेट खेळाडू बनण्याचा ध्येयाचा हात आहे लहानपणापासून त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती परंतु त्याला एक मोठा खेळाडू बनण्याची देखील आवड होती आणि  हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियमितपणे कठीण परिश्रम घेऊन एक यशाकडे पाऊल टाकले. त्यामुळे आपल्याला ज्या पण क्षेत्रामध्ये यश मिळवायचे आहे ते क्षेत्र डोळ्यापुढे ठेवून कठीण परिश्रम घेतले पाहिजे.
  • मानसिकता : प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मानसिक ते साठी खूप सामोरे जावे लागते जेव्हा कठीण क्षण असतो तेव्हा आपली मानसिकता ही खूप ढासळलेली असते. असं खूपदा विराट कोहली बरोबर देखील झालेल आहे परंतु विराट कोहलीने सांगितले आपण त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या मेहनतीवर किंवा सरावावरती घेतले पाहिजे त्यानंतर कठीण क्षण हा तुम्हाला छोटा वाटू लागेल व छोटेसे यश देखील तुम्हाला मोठे वाटू लागेल.
  • शिकणे आणि सुधारणे : विराट कोहली म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने नेहमी त्याच्या जीवनात नवीन गोष्टी शिकत राहिला पाहिजे आणि अशा काही गोष्टी सुधारल्या पाहिजे ज्याचा प्रभाव कुठे ना कुठेतरी आपल्या यशावर होतो किंवा भविष्यावर होईल.
  • आवड व प्रेम : विराट कोहली सांगतो की आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम करत असाल किंवा एखाद्या खेळामध्ये खेळत असाल तर आपल्याला त्या क्षेत्राविषयी किंवा त्या खेळाविषयी आवड असणे हे खूप गरजेचे आहे जेव्हा आपण एखाद्या खेळ आवडीने,कौतुकाने खेळतो तेव्हा नेहमी आपल्या खेळाचे कौतुक हे केले जाते.

Leave a Comment