नवीन घरकुल यादी 2023-24 पहा मोबाईल मध्ये | gharkul yadi

शेतकरी मित्रांनो आपले नाव नवीन घरकुल यादीत आले आहे की नाही व कोणत्याही गावाची जर आपल्याला चालु घरकुल यादी पाहायची असेल तर आपण सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल क्रोम आपल्याला उघडायचे आहे. आणि उघडल्यानंतर आपल्याला तिथे( pmayg.nic in) हे संकेतस्थळ टाकून सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला सर्वप्रथम हे संकेतस्थळ दाखवण्यात येईल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना असे पोर्टल उघडेल. त्या संकेतस्थळावर तुम्हाला वरती एक मजकूर दिसेल त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरला असणारा पर्याय (Awaassoft) यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक छोटीशी टॅब उघडेल त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन (Report) यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आता परत पुन्हा नवीन मजकूर तुमच्यासमोर एक उघडेल, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला (H social Audit Report ) असा एक पर्याय दिसेल त्यामध्ये तुम्हाला खाली असणाऱ्या (Beneficiary details for verification) या पर्यायावर क्लिक करायचे आहे

  • एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम (Select) या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं राज्य निवडायचा आहे. राज्य हे आपण आपलं महाराष्ट्र निवडणार. त्यानंतर पुन्हा त्याच्या खाली दिलेल्या (Select) बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या पण जिल्ह्यात तुम्ही असाल तो जिल्हा तुम्ही तिथे निवडा. त्यानंतर पुन्हा खाली तीन नंबरच्या (Select) या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि तिथे आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर पुन्हा शेवटच्या चार नंबरच्या (Select) बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तिथे आपल्या गावाचे किंवा ग्रामपंचायतीचे नाव आपल्याला निवडायचे आहे. तेवढं निवडल्यानंतर शेवटी पुन्हा (Select) बटनावर क्लिक करून तिथे आपल्याला चालू वर्ष घरकुल यादी 2023-24 निवडायचे आहे.( सूचना ज्या वर्षी तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे तेच वर्षे तुम्ही निवडा) त्यानंतर पुन्हा एक खाली (Select) बटन येईल त्यावर क्लिक करून आपल्याला आपली तिथे योजना निवडायची आहे तर सर्वात प्रथम जी योजना असेल (Pradhan mantri Awas yojana gramin) ती आपल्याला तिथे निवडायची आहे. निवडल्यानंतर आपल्याला त्याच्याखाली एक गणित असेल त्याचे उत्तर आपल्याला  खालील बॉक्समध्ये अचूकपणे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर खाली असणाऱ्या (Submit) या बटणावरती क्लिक करायचं आहे.
  • एवढी सर्व प्रोसेस तुम्ही योग्य केल्यावर तुमच्या समोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुमच्या गावाची घरकुल यादी 2024 खालच्या साईडला दाखवण्यास सुरुवात होईल आणि घरकुल यादीच्या वरती तुम्हाला एक घरकुल यादी pdf डाऊनलोड करण्यासाठी पर्याय दिला जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही ती यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

घरकुल योजनेत अनुदान रक्कम किती मिळते

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्या योजनेसाठी तुम्ही जर पात्र झाला असाल तर तुम्हाला अनुदान हे एक लाख वीस हजार इतक मिळतं आणि हे अनुदान चार ते पाच हप्त्यामध्ये सरकार द्वारे दिले जाते हप्ता हा 15 किंवा 25 हजारापर्यंत आपल्या खात्यावरती पडत असतो.

आपल्याला घरकुल योजनेचे किती हप्ते भेटले आहेत हे आपण कसं पाहणार

शेतकरी मित्रांनो आपल्याला घरकुल योजनेचे किती हप्ते भेटले आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला या (pmayg.nic in) पोर्टल वरती जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर वरील सांगितल्या माहितीप्रमाणे आपल्याला चालू वर्षाची घरकुल यादी काढायची आहे आणि त्या पीडीएफ मध्ये आपल्याला एकूण हप्ते किती जमा झाले आहेत आणि किती रुपयाचे हप्ते झालेत ती सर्व माहिती आपल्याला तिथे त्या यादीमध्ये कळून जाईल व आणखी किती हप्ते अजून बाकी आहेत ते देखील कळेल.

घरकुलाचा हप्ता किती तारखेला जमा झाला आहे हे कसे पाहायचे

शेतकरी मित्रांनो आपल्याला खूपदा कळत नाही की आपला हप्ता आपल्या खात्यात कधी जमा झालेला आहे त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला या(pmayg.nic in) पोर्टल वरती जायचे आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्याला वरती दिलेल्या माहितीप्रमाणे घरकुल यादी काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या संकेतस्थळाच्या वरील मजकुरामध्ये असणाऱ्या (Awaassoft) या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला (Report) हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली E या पर्यायांमध्ये (E SECC REPORT) मध्ये चार नंबरचा पर्याय (Category -wise SECC DATA ) इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा तालुका व ग्रामपंचायतचे गाव निवडून खाली दिलेल्या गणिताचे उत्तर काढून कॅपच्या, त्या रिकाम्या बॉक्समध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे. हे सबमिट केल्यानंतर पुन्हा एक नवीन मजकूर लोड होऊन पुन्हा तुम्हाला परत तशीच तुमच्या गावाची घरकुल यादी दाखवण्यास सुरुवात होईल. त्या यादीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करायचं आहे. आणि तिथे क्लिक केल्यानंतर एक नवीन मजकूर तुमच्यासमोर उघडून तुम्हाला त्या व्यक्तीचे संपूर्ण माहिती मिळेल की त्याच्या घरकुलाचा पहिला दुसरा किंवा तिसरा हप्ता हा कधी जमा झाला आहे व त्या संबंधित तुम्हाला संपूर्ण त्या व्यक्तीची माहिती मिळून जाईल.

ग्रामपंचायत घरकुल यादी 2023-24

शेतकरी मित्रांनो खालील संकेतस्थळावर जाऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये  राबवली जाणारी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना 2023-24 यादी तुम्ही तुमच्या तालुक्यामधील गावानुसार डाऊनलोड करून पाहू शकता (pmayg.nic in)

घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

मतदान कार्ड ज़ेरॉक्स ,आधार कार्ड, जागेचा सातबारा उतारा,पानपट्टी घरपट्टी भरल्याची पावती,रहिवासी दाखला,उत्पन्नाचे शपथपत्र, पक्के घर नसल्याचे हमीपत्र, दिलेली माहिती खरी असल्याचे घोषणापत्र, आपले स्वतःचे फोटो,जुन्या घराचे फोटो,जात प्रमाणपत्र व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

Leave a Comment