मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच एक नवीन व्यवसाय महाराष्ट्रामध्ये सुरू केला व त्यामध्ये त्याला एक चांगले यश देखील मिळालेले आहेत शरीराने अपंग असणाऱ्या शेतकऱ्याने एका गाडीपासून अवघे 30 ते 40 हजार रुपये महिन्याला कमवले आहेत या व्यवसायामध्ये बद्दल आज आपण संपूर्ण माहिती या खालील दिलेल्या लेखातून पाहणार आहोत ती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा.
बाबा हे गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्याकडे शेती जास्त नव्हती त्यामुळे पहिल्या पासूनच ते कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी ड्रायव्हिंग चे काम करत होते परंतु एक दिवस असा आला की त्या दिवशी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. झालं असं की बाबा एकदा मालगाडी मध्ये माल घेऊन चेन्नईला गेले होते तिथे गेले असताना त्यांनी एक नवीन व्यवसाय म्हणून नारळ पाणी व्यवसाय पाहिला तर चेन्नईमध्ये नारळ पाणी व्यवसायासाठी एक छोट्या छोट्या गाड्या बनवल्या होत्या आणि बाबांचे लक्ष त्या गाड्यांकडे गेल आणि जेव्हा त्यांनी त्या व्यवसायाची तिथे विचारपूस केली तर तेव्हा त्यांना तिथे कळले की या व्यवसायातून उत्पन्न देखील चांगला आहे आणि हा व्यवसाय अगदी सावलीत बसून देखील आपण करू शकतो त्यामुळे त्यांनी लगेच तिथून त्यांच्या मुलांना फोन केला व त्या व्यवसायाबद्दल त्यांना कल्पना दिली व त्या व्यवसायाचे काही फोटो मुलांना व्हाट्सअप द्वारे पाठवले. आणि त्या व्यवसायाची गाडी पाहून मुलांचे देखील त्या व्यवसायाकडे लक्ष आकर्षित झालं कारण की महाराष्ट्र मध्ये नारळ पाणी तर सगळेच देत होते परंतु नारळ पाणी विकण्यासाठी अशी गाडी व असा व्यवसाय महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत कोणीच केला नव्हता त्यामुळे मुलांनी देखील वडिलांना त्या गाड्या महाराष्ट्रामध्ये आणण्यास सांगितल्या व येथून त्यांची या व्यवसायासाठी सुरुवात झाली.
नारळ पाणी व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती
मित्रांनो खालील दिलेल्या चित्रात आपण बाबांनी जो नारळ पाणी व्यवसाय केला आहे त्याची गाडी पाहू शकता.
- मित्रांनो वरील चित्रात जी तुम्हाला गाडी दिसत आहे ती संपूर्णपणे नारळ व्यवसायासाठी बनलेली गाडी आहे असं का तर या गाडीच्या मध्ये आपल्याला नारळ कापण्यासाठी एक कोयता देखील दिला आहे जो कोयता गाडीला फिटिंग केलेला आहे ज्याच्या मदतीने आपण फक्त नारळ एका भागामध्ये ठेवून वरून एक कोयत्याचा दांडा असतो तो दाबल्यावर नारळ लगेच फोडला जातो ज्यामुळे आपल्याला जास्त मेहनत करावी नाही लागत व आपल्या हाताला लागा लागीचे काम देखील होत नाही
- त्यानंतर मित्रांनो तो नारळ आपल्याला घेऊन त्या गाडीच्या साईटला एक माठाच्या आकाराचा एक जार मिळतो तिथे तो नारळ आपल्याला उलटा करायचा आहे जेणेकरून त्या नारळामधील सगळं पाणी त्या जार मध्ये पडेल आणि खाली आपल्याला त्या जारचे दोन नळ मिळतात जे चालू करून आपण ग्लासमध्ये नारळाचे पाणी काढू शकतो.
- याचबरोबर मित्रांनो आपल्याला याच गाडीमध्ये नारळ ठेवण्यासाठी एक मोठी जागा देखील मिळते ज्यामुळे आपल्याला कोणत्याही गोणीची गरज भासत नाही आणि आपले नारळ उन्हाणी तापत देखील नाहीत
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर मित्रांनो या गाडीला खाली दोन चाके आहेत ज्याच्या मदतीने आपण जिथे गिऱ्हाईकांची गर्दी जास्त आहे तिथेही गाडी उभी करू शकतो जसे की एसटी बस स्टॅन्ड तसेच दवाखाने तसेच सरकारी कार्यालय कचेरी किंवा पंचायत समिती ज्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त आहे तिथे जर आपण ही गाडी उभी केली तर यामधून आपल्याला जास्त फायदा होण्याचे प्रमाण वाढते.
व्यवसायामध्ये ही चूक कधीच करू नका
मित्रांनो नारळ पाणी व्यवसाय असू देत किंवा दुसरा कोणताही व्यवसाय असू देत जर एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे त्याच्या तोंडावर गोडी असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच की आपण जर ग्राहकाबरोबर चांगले वागलो तर त्याचा फायदा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये होतो तसंच काहीतरी बाबांचे देखील म्हणणं आहे बाबा सांगतात की ते प्रत्येक गिऱ्हाईका सोबत देव माणसाप्रमाणे वागतात ज्यामुळे तो गिराईक त्यांच्याकडे परत येतो त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा त्यांना त्यांच्या व्यवसायात होतो त्यामुळे व्यवसाय करत असताना आपली वागणूक चांगली असणे खूप गरजेचे आहे.
नारळ पाणी व्यवसाय उत्पन्न
नारळ पाणी व्यवसायामध्ये उत्पन्न हे दोन प्रकारे कमावले जाते एक म्हणजे त्या नारळाचं पाणी काढून प्रत्येक ग्लास वीस रुपये या भावाने ग्राहकाला देऊन आणि दुसरं म्हणजे त्या नारळाची जर एखाद्याला मलई खायची असेल तर ती देखील आपण देऊ शकतो त्यासाठी पाच दहा रुपये आपण वाढाव घेऊ शकतो. मित्रांनो अधिक माहितीसाठी किंवा नारळ पाणी व व्यवसायासाठी तुम्हाला गाडी हवी असेल तर तुम्ही (7448282622) या नंबर वरती संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता.(टॉप 05 शेतीपुरक व्यवसाय )