मित्रांनो बाल संगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिला व बालविकास मार्फत राबवली जाणारी योजना आहे. आणि या योजनेचा लाभ हा 18 वर्षाच्या आतील मुलं किंवा मुलींना दिला जातो. आणि या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन 18 वर्षाच्या आतील बालकाला प्रतिवर्षी 27 हजार इतकी रक्कम देत असते. परंतु या योजनेत बालकांची निवड ही काही ठराविक गोष्टींच्या आधारे केली जाते त्यामुळे खालील माहिती मध्ये आपण बाल संगोपन योजना पात्रता व याचा अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही खालील लेख संपूर्ण वाचा.
बाल संगोपन योजना पात्रता
मित्रांनो खालील पात्रता ही या योजनेसाठी लागणार आहे त्यामुळे खालील संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा.
- सर्वप्रथम या योजनेचा लाभ अशा बालकांना दिला जाणार आहे जी बालके अनाथ आहेत किंवा अशी बालके की ज्यांना दत्तक देता येत नाही किंवा अशी बालके की ज्यांच्या पालकांचा पत्ता अजून लागत नाही या सर्वांना सर्वप्रथम या योजनेमध्ये लाभ दिला जातो
- यानंतर अशा बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो की त्यांना फक्त एकच पालक आहे. तसेच त्यानंतर अशा बालकांना देखील लाभ दिला जातो की ज्यांचे पालक हे गंभीर आजार असल्यामुळे रुग्णालयात आहेत. तसेच करुणा काळात ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो तसेच ज्यांचे पालक कारागृहामध्ये म्हणजेच जेलमध्ये आहेत त्यांच्या पालकांना देखील या योजनेचा लाभ हा दिला जातो. पालकांमध्ये जर घटस्फोट झाला असेल तर त्यांच्या बालकांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो.
- तसेच शाळेत न जाणाऱ्या बालकांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो एकंदरीत अशा गरजू मुलांची या योजनेसाठी निवड करण्यात येते. आणि ही निवड करताना तुम्हाला त्या बालकांना बालकल्याण समिती पुढे हजर करणे आवश्यक राहते आणि त्यानंतरच या या योजनेसाठी त्यांची निवड करण्यात येते.
बाल संगोपन योजना कागदपत्रे
मित्रांनो बाल संगोपन योजनेसाठी एक आपल्याला अर्ज करावा लागतो त्या अर्जासाठी खालील कागदपत्रे ही आपल्याला जोडावी लागतात
- त्या बालकाची व त्या पालकाची आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला लागते.
- यानंतर त्या बालकाचे शाळेतील बोनाफाईट सर्टिफिकेट किंवा टीसी आपल्याला अर्जा सोबत जोडायचे आहेत.
- यानंतर तहसीलदाराकडून कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला देखील आपल्याला लागणार आहे.
- यानंतर पालकांचा जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला देखील आपल्याला जोडायचा आहे.
- ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या हद्दीत जर आपण राहत असाल तर आपल्याला त्यांच्याकडून रहिवासी दाखला देखील लागणार आहे.
- यानंतर आपल्याला त्या बालकाचे बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे जर बालकाचे बँकेत खाते नसेल तर पालकांचे पासबुक झेरॉक्स आपल्याला लागणार आहे
- यानंतर पालकांच्या मृत्यूचा अहवाल यामध्ये जर तुमच्या पालकांचा कोविड-19 या आजाराने मृत्यू झाला असेल तर त्याचा अहवाल आपल्याला लागणार आहे.
- यानंतर आपल्याला त्या पालकाचे रेशन कार्ड लागणार आहे.
- यानंतर पालक असतील तर त्यांच्या घरा समोर पालकांसोबत बालकाचा फोटो कॉपी लागणार आहे.
- त्यानंतर बालकाचे तीन पासपोर्ट साईज चे फोटो आपल्याला लागणार आहेत.
बाल संगोपन योजनेचा अर्ज कुठे करायचा
मित्रांनो आता आपण या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणती लागतात हे आपण पाहिलं तर आता आपण पाहूया की बाल संगोपन योजनेचा अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो बाल संगोपन योजनेचा अर्ज हा आपल्याला आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालय मध्ये करायचा आहे. आणि यासंबंधीत अधिक माहितीसाठी तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून या योजनेबद्दल अधिक माहिती प्राप्त करू शकता. आणि जर तुम्ही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या जवळच्या जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन महिला बालविकास विभागाची तिथे देखील संपर्क करू शकता. आणि तिथेच तुम्हाला बाल संगोपन योजनेचा अर्ज देखील भेटेल तो अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. आणि या अर्जाला जोडण्यासाठी आपल्याला वरील कागदपत्रे ही लागणार आहेत त्यामुळे संपूर्ण कागदपत्रे तुम्ही योग्यपणे वाचून ती तिथे त्या अर्जा सोबत जोडा. आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज तिथेच त्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद च्या महिला बाल विकास कार्यालय मध्ये जमा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या अधिकाऱ्याकडून अधिक तुमच्या बालका विषयी व पालकांविषयी चौकशी करून तो बाल्य या योजनेसाठी पात्र आहे का हे तुम्हाला कळविण्यात येईल. आणि पात्र झाल्यानंतर वर्षाला 27 हजार म्हणजेच महिन्याला 2200 हे त्या पालकाच्या बँकेच्या खात्यात किंवा त्या बालकाच्या बँकेच्या खात्यात जमा होतील.