शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या टॉप 05 योजना

शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा शेतीमधील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी व जास्त उत्पादन होण्यासाठी अनेक योजनांचा लाभ हा घेत असतो. परंतु काही शेतकऱ्यांना तर योजनेबद्दल पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या माहितीत आपण सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अशा पाच योजना पाहणार आहोत की ज्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल तर खालील माहिती संपूर्णपणे व्यवस्थित वाचा.

top 05 yojana for farmers in maharashtra

सलोखा योजना

शेतकरी मित्रांना सर्वात पहिली जी योजना आहे ती आहे सलोखा योजना. सलोखा योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी सरकार मार्फत राबवली जाते की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वाद चालू आहे. म्हणजेच की दोन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ताब्याचा जर वाद असेल तर हा वाद मिटवण्यासाठी जी काही नोंदणी फी असते ती खूप जास्त असते. त्यामुळे बऱ्याच वेळा दोन शेतकऱ्यांमधील वाद मिटत नाही.म्हणूनच हे ताबे आदला बदल करताना म्हणजेच योग्य शेतकऱ्याकडे त्याची योग्य जमीन देताना जी काही नोंदणी फी लागते तिथे आता सरकारने खूप कमी केली आहे या योजनेमार्फत. म्हणजेच नोंदणी फी ही फक्त एक हजार रुपये इतकी या योजनेअंतर्गत ठेवण्यात आली आहे. जेणेकरून वाद मिटण्यास वेळ लागणार नाही.

जर तुमचं किंवा तुमच्या जवळच्या शेतकऱ्याचा असं काही प्रकरण असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन या सलोखा योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्यासाठी अर्ज करायचा आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

  • शेतकरी मित्रांनो यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे कृषी सिंचन योजना. ही योजना केंद्र शासना अंतर्गत राबवली जाणारी एक योजना आहे.
  • या योजनेचा उद्देश हा एकच आहे की ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन बसवायचे असेल तर त्याचा खर्च कमी करण्यासाठी सरकार त्या शेतकऱ्याला अनुदान हे देत असते.
  • शेतकरी मित्रांनो अनुदान हे दोन भागांमध्ये दिले जाते एक म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना अनुदान  55% इतके दिले जाते व दुसर इतर शेतकरी यामध्ये बाकी शेतकऱ्यांना अनुदान हे 45% इतके दिले जाते. म्हणजे जर सांगायचं झालं तर ठिबक सिंचनासाठी जर तुम्हाला हजार रुपये खर्च आला असेल तर त्याचे 55 आणि 45 टक्के स्वरूपात अनुदान हे तुम्हाला सरकार द्वारे देण्यात येईल.

कृषी सिंचन योजना पात्रता

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज भासणार आहे

  • शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही शेतकरी असायला हवेत ज्यामध्ये जमिनीचा सातबारा तुमच्याकडे असायला पाहिजे व त्यावरती बागायती क्षेत्राची नोंद असणे गरजेचे असणार आहे
  • यानंतर तुमच्या जमिनीचे क्षेत्र हे पाच हेक्‍टरच्या कमी असायला हवे तसेच तुमच्या सातबारा वरती विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असायला हवी
  • तसेच तुमच्याजवळ तुमचे कायमचे वीज कनेक्शन असायला पाहिजे. आणि त्याचं मागील महिन्यातील वीज बिल देखील तुम्हाला लागणार आहे

वरील कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज हा तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयांमध्ये देखील जाऊन करू शकता किंवा अर्ज कसा केला जातो यासंबंधी तुम्ही कृषी कार्यालय मध्ये जाऊन माहिती देखील घेऊ शकता.

सधन कुकूट पालन योजना

शेतकरी मित्रांनो यानंतर तिसरी जी योजना आहे ती योजना आहे कुक्कुट पालन योजना ही योजना अशा युवकांसाठी आहे की ज्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे व घरात बसून एक व्यवसाय करायचा आहे अशा युवकांसाठी ही योजना राबवली जाते.

  •  कुक्कुट पालन योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असायला पाहिजे जिथे तुम्ही हा व्यवसाय करणार आहात
  • यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा पंचायत समिती कार्यालय मध्ये जाऊन पशुवर्धन विभागात या योजनेबद्दल तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळून जाईल व तिथे तुम्ही अर्ज देखील करू शकता

अहिल्या शेळीपालन योजना

शेतकरी मित्रांनो चौथी योजना ही शेळी पालन व्यवसायासाठी सरकार द्वारे राबवली जाणारी एक योजना आहे आणि खास करून ही योजना अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांसाठी राबवली जाते. जे शेतकरी पारंपारिक शेळीपालन करतात किंवा पारंपारिक शेळी पाळनाचा अनुभव आहे अशांना या योजनेचा लाभ मिळतो.

  • अहिल्या शेळीपालन योजनेमार्फत तुम्हाला एक बोकड व दहा शेळ्या खरेदी करण्यासाठी 90% अनुदान हे दिले जाते
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवर्धन विभागात किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये पशुवर्धन विभागात या योजने संबंधित चौकशी करून अर्ज करू शकतात

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतकरी मित्रांनो यानंतर जी शेवटची योजना आहे ती आहे सौर कृषी पंप योजना या योजनेचा हेतू एकच आहे की शेतकऱ्याच्या शेतात जर विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा शेततळे असेल त्यामध्ये सौर पंप पद्धतीने एक मोटार बसवण्यात येईल. जी संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालेल.

  • या योजनेमार्फत राज्य शासन आपल्याला अनुदान हे 95 टक्के इतके देत.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयांमध्ये जाऊन या योजनेसंबंधी चौकशी करून अर्ज करू शकता

तर शेतकरी मित्रांनो वरील पाच अशा योजना आहेत ज्यांच्या लाभ तुम्ही जर शेतकरी तर घेऊ शकता.

Leave a Comment