शेतकरी मित्रांनो शेती या व्यवसायासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर परंतु ट्रॅक्टर हा प्रत्येक शेतकऱ्याला घेणे हे शक्य नसतं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कृषी विभाग ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला अनुदान देत आहे ज्यामुळे आत्ता आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेला शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊन एक शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू शकतो. सरकार या योजनेसाठी दरवर्षी 22 ते 56 कोटीच्या आसपास निधी हा कृषी विभागासाठी मंजूर करत असतो त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्ही दरवर्षी घेऊ शकता खालील दिलेल्या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही या ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ कसा घेऊ शकता त्यामुळे खालील माहिती संपूर्ण व्यवस्थित वाचा.
ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे
शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजना ही महाराष्ट्र कृषी विभागामार्फत राबवली जाणारी एक योजना आहे आणि या योजनेचा एकच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याने यांत्रिकी पद्धतीने शेती करून कमी खर्चात व कमी वेळात जास्त उत्पादन काढाव म्हणजेच सांगायचं झालं तर तुम्हाला बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती ही करायची आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता
शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी खालील प्रमाणे अनुदान हे देण्यात येते
- सर्वप्रथम तुम्ही जर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती मधील असाल किंवा तुम्ही अल्पभूधारक असाल तर तुम्हाला या योजनेमार्फत एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान हे शासनाकडून दिले जाते याची रक्कम 1.5 लाखाच्या आसपास होते
- आणि यानंतर जर तुम्ही इतर प्रवर्गातील असाल म्हणजेच ओपन,ओबीसी किंवा इतर कोणत्याही कॅटेगिरी मधील असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत एकूण रकमेच्या 40 टक्के अनुदान हे दिले जाते. ज्याची रक्कम एक ते सव्वा लाखापर्यंत होते.
ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्र
शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे त्याची पूर्तता करूनच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराच ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड हे लागणार आहे
- यानंतर उमेदवाराच्या जमिनीचा सातबारा ८अ हा लागणार आहे
- यानंतर तुम्ही जिथून ट्रॅक्टर घेणार आहात त्या शोरूम मधून तुम्हाला त्या ट्रॅक्टरच कोटेशन तुमच्या नावाच घ्यायच आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे.
- यानंतर तुम्हाला तुमच जात प्रमाणपत्र हे लागणार आहे
- यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे पासबुक हे लागणार आहे
- यानंतर तुम्हाला स्वयंघोषणापत्र देखील लागणार आहे
- यानंतर तुम्हाला पूर्व संबंधी पत्र हे तुम्हाला लागणार आहे
- आणि तसेच तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी देखील लागणार आहे
वरील सर्व कागदपत्रे ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत त्यामुळे ही कागदपत्रे जर असतील तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज कसा करायचा
शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीला संपूर्णपणे सर्व योजना ह्या ऑनलाइन पद्धतीने राबवल्या जातात व या योजनेसाठी अर्ज देखील ऑनलाइन पद्धतीने केले जातात. आणि ही ट्रॅक्टर अनुदान योजना देखील ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते आणि यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र कृषी विभागाच्या (mahadbt.in) या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज हा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील करू शकता त्याची व्हिडिओ तुम्ही युट्युब वरती पाहू शकता आणि जर तुम्हाला अर्ज करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही अर्ज कसा करायचा या संबंधित माहितीसाठी तुम्ही जवळच्या कृषी विभाग कार्यालयामध्ये जाऊन कृषी अधिकाऱ्याच्या साह्याने या योजनेसाठी माहिती घेऊन अर्ज करू शकता
- शेतकरी मित्रांना जेव्हा तुम्ही या योजनेसाठी संपूर्णपणे अर्ज कराल त्याच्या दहा ते पंधरा दिवसांनी तुम्हाला कृषी विभागाकडून पूर्व सहमती येणार आहे ज्यामध्ये तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहात असे तुम्हाला कळवण्यात येईल व तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता असा देखील उद्देश केला जाईल
- शेतकरी मित्रांनो पूर्व सहमती आल्यानंतरच तुम्हाला ट्रॅक्टर हा खरेदी करायचा आहे. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टरचा जीएसटी बिल हे कृषी अधिकाऱ्याकडे जमा करून ते (mahadbt.in) या संकेतस्थळावरती कागदपत्रांमध्ये अपलोड करायचे आहे.
- आणि यानंतर शेतकरी मित्रांनो त्या संपूर्ण बिलाची पूर्णपणे चौकशी करून डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात अनुदान हे दिले जाईल.
शेतकरी मित्रांनो असा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता व कृषी विभागाकडून ज्या पण योजना राबवण्यात येतात याचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या (mahadbt.in) संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमच अकाउंट उघडा ज्यामुळे कृषी विभाग ज्या योजना राबवेल त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल.