मित्रांनो एस टी महामंडळ हे नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या प्रवासासाठी अनेक प्रकारच्या प्रवासी योजना घेऊन येते जसे की 75 वर्ष पुढील लोकांना मोफत प्रवास असेल किंवा 65 वर्षाच्या पुढील प्रवाशांना हाफ तिकीट असेल आणि आत्ताच जी नवीन योजना आणली आहे त्यामध्ये महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटावर 50 टक्के सूट देखील देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या योजना या एसटी महामंडळ राबवत आहे परंतु इतर प्रवाशांसाठी कोणतीही एसटी महामंडळाची योजना नसल्यामुळे एसटी महामंडळाने आता सर्वांसाठी आवडेल तिथे कोठेही प्रवास ही योजना आणली आहे. ज्याचा लाभ सर्व नागरिकांना घेता येईल या योजने संबंधित संपूर्ण माहितीसाठी खालील माहिती वाचा.
आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना काय आहे
मित्रांनो ही योजना खास करून अश्या लोकांसाठी आहे की ज्यांना फिरण्याची आवड जास्त आहे म्हणजेच त्यांना महाराष्ट्रा मध्ये देवदर्शन करणे किंवा इतर जिल्हे किंवा धार्मिक स्थळे पाहण्यास आवडतात परंतु त्यांच्याकडे वाहतुकीसाठी साधन नसल्यामुळे ते फिरू शकत नाही किंवा प्रवासासाठी खर्च खूप होत असल्याकारणामुळे देखील ते फिरू शकत नाहीत यामुळे त्यांचा ख़र्च टाळण्यासाठी व प्रवास सुरक्षित होण्यासाठी एसटी महामंडळाने ही योजना स्थापन केली आहे.
- आवडेल तिथे कुठे प्रवास करा या योजनेचा हेतू एकच आहे की प्रवाशांना स्वस्ता मध्ये सात ते तीन दिवसांचा एसटी महामंडळाचा संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा पास देवून प्रवाशांचा कमी खर्चात एक सुरक्षित प्रवास करून द्यायचा. हा एक मुख्य हेतू या योजनेचा आहे.
- प्रवाशांनी हा पास काढल्यानंतर तो प्रवासी एसटी महामंडळाच्या कोणत्याही गाडीने मोफत प्रवास करू शकतो व तो कितीही गाड्या बदलून हा प्रवास करू शकतो. व हा प्रवास महाराष्ट्र पुरताच मर्यादित नाही तर महाराष्ट्र बाहेरील काही राज्यात देखील हा प्रवास तुम्हाला करता येईल. जेथे जेथे महाराष्ट्र परिवहन एसटी महामंडळाच्या गाड्या जातील तिथपर्यंत हा प्रवास तुम्हाला मोफत करता येईल.
एसटी महामंडळ योजना नियम
मित्रांनो या योजनेसाठी काही नियम व अटी देखील आहेत त्या आता तुम्ही खालील प्रमाणे वाचू शकता.
- सर्वप्रथम मित्रांनो हा पास तुम्हाला दोन कालावधी साठी पाहायला मिळतो. एक म्हणजे सात दिवसांसाठी दिला जाणारा बस पास व दुसरा म्हणजे चार दिवसांसाठी दिला जाणारा पास
- यानंतर या फास्ट चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे साधा पास यामध्ये तुम्हाला परिवहन मंडळाच्या साध्या एसटी बसने प्रवास करावा लागणार आहे म्हणजेच साधी,रातराणी,शहरी, यशवंती, अशा बसने तुम्हाला प्रवास करावा लागेल. आणि यानंतर दुसरा म्हणजे शिवशाही पास या पासने तुम्ही शिवशाही किंवा महामंडळाच्या इतर कोणत्याही बसने प्रवास हा करू शकता.
- हा पास काढल्यानंतर एखाद्या बस मध्ये जर बसायला जागा नसेल आणि बसमध्ये गर्दी असेल तर तुम्हाला बसायला जागा भेटेल असं शक्य नाही त्यामुळे तुम्ही या पासच्या मदतीने एखाद्या बसच रिझर्वेशन देखील करु शकता.
- यानंतर या पासच्या आधारित प्रत्येक प्रवाशाला 30 किलो सामानच एसटीमध्ये नेता येईल त्याच्यावरती असेल तर एसटी महामंडळ ते सामान घेऊ शकत नाही.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रवाशाला या पासच्या मदतीने तिथपर्यंतच प्रवास करता येईल जिथपर्यंत महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस जाईल तिथून पुढील प्रवास तुम्हाला पैसे देऊन करता येईल.
- यानंतर काढलेला पास जर प्रवाशांनी हरवला तर त्यांना दुसरा पास देण्यात येणार नाही तो पास त्यांचा रद्द करण्यात येईल व त्यांचा प्रवास तिथून पुढे पैसे घेऊन का करण्यात येईल. त्यामुळे पास काढल्यानंतर हा पास तुम्ही व्यवस्थितपणे सांभाळून ठेवा.
- यानंतर हा पास ज्याच्या नावावर आहे त्यांनीच वापरावा जर पासचा गैरवापर झाला तर त्या प्रवशाकडून दंड आकारण्यात येईल व तो पास रद्द करण्यात येईल.
आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना पास कुठे मिळेल
मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेऊन पास काढायचा असेल तर तो पास तुम्हाला तुमच्या जवळच्या एसटी महामंडळाच्या कोणत्याही डेपोला मिळून जाईल.या योजनेअंतर्गत ज्यापण प्रवाशांना पास दिले जातात ते पास प्रवाशांना दहा ते पंधरा दिवस आधी देखिल काढता येतात आणि या पासच्या मदतीने तुम्ही बाहेरील राज्यात देखील प्रवास करू शकता.
एस टी महामंडळ पास किंमत
या योजनेअंतर्गत जो तुम्हाला दोन प्रकारांमध्ये पास दिला जाणार आहे त्याची किंमत खालील प्रमाणे आहे ती तुम्ही पाहू शकता
वाहतूक प्रवाशाचा प्रकार | चार दिवसाच्या पासाची किंमत | सात दिवसाच्या पासाची किंमत | ||
जेष्ट | मुले | जेष्ट | मुले | |
साधा बस प्रवास व शिवशाही बस प्रवास | 1170 | 585 | 2040 | 1025 |
साधी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती | 1520 | 765 | 3030 | 1520 |