शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी या पोर्टल मार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी एक प्रधानमंत्री ठिबक व तुषार सिंचन योजना ही राबवली आहे यामध्ये प्रत्येक अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ठिबक व तुषार सिंचनासाठी 55% अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार ही योजना संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये राबवते त्यामुळे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर शेतकरी मित्रांनो खालील दिलेली माहिती वाचून तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा केला जातो तसेच या योजनेसाठी पात्रता व कागदपत्रे कोणती लागतात व या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते हे तुम्ही खालील माहिती सविस्तर पणे वाचू शकता.
ठिबक व तुषार सिंचन योजना अनुदान
- शेतकरी मित्रांनो ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान हे दोन प्रकारांमध्ये दिले जाते त्यामधील पहिलं म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी अनुदान म्हणजेच की यामध्ये अशे शेतकरी येतात की ज्यांच्याकडे जमीन अगदी थोडी आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना अनुदान हे 55% इतके दिले जाते म्हणजेच की जर शेतकऱ्यांनी 10 हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन खरेदी केले असेल तर त्यावर त्याला 55 टक्के म्हणजेच साडेपाच हजार रुपये हे अनुदान स्वरूपात दिले जाईल.
- यानंतर दुसऱ्या प्रकारांमध्ये बाकी उरलेले इतर शेतकरी येतात ज्यांना अनुदान हे 45 टक्के दिले जाते त्यामुळे एकंदरीत सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ठिबक व तुषार सिंचन योजना पात्रता
- सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे असणार आहे.
- यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ सातबारा उतारा ८अ असणे गरजेचे आहे तो तुम्ही डिजिटल पद्धतीने देखील काढू शकता काढण्यासाठी डिजिटल सातबारा ईथे क्लिक करा.
- यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कास्ट मधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे
- यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जमिनीचे क्षेत्र हे पाच हेक्टर पेक्षा कमी असायला पाहिजे.
- यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरवेल,विहीर,शेततळे किंवा इतर पाण्याचा साठा असायला हवा व त्याची नोंद तुमच्या सातबारा उतारा वरती असायला हवी जर नोंद सातबाऱ्यावरती नसेल तर तुम्ही ती नोंद जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करू शकता जर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रात पाण्याचा साठा असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल
ठिबक व तुषार सिंचन योजना अर्ज
- शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या (mahadbt.in) या संकेतस्थळावरती जायचं आहे. त्यासाठी आपण मोबाईल मध्ये (Google chrom) वरती जाऊन सर्च मध्ये (mahadbt.in) हे संकेतस्थळ टाकून इथे जाणार.
- संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने तुमचं नवीन रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसे केले जाते या संबंधित तुम्ही youtube वरती असंख्य व्हिडिओ आहेत त्या पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन या पर्याया वर क्लिक करून सर्वप्रथम लॉगिन करून घ्यायचं आहे
- शेतकरी मित्रांनो महाडीबीटी या पोर्टल वरती लोगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे लिहिलेलं असेल की अर्ज करा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन मजकूर उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकार दिसतील त्यामधील पहिला म्हणजे कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर दुसरा सिंचन साधने व सुविधा आणि यानंतर शेवटचा एक पर्याय दिसेल फलोत्पादक.
- त्या शेतकऱ्यांना तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पुढील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचं आहे
- तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मुख्य घटक मध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे. आणि यानंतर बाब निवडा मध्ये ठिबक सिंचन हा पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला या योजनेसाठी उपघटक निवडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले असतील त्यामधील तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला कोणत ठिबक हवं त्याप्रमाणे ठिबक हे निवडायचा आहे.
- यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकामधील अंतर हे निवडायचं आहे तुम्हाला ज्या पिकासाठी ठिबक करायचा आहे त्या पिकाच अंतर तुम्हाला व्यवस्थित निवडायचा आहे
- अशी संपूर्ण पिकाबद्दल माहिती व तुमच्या जमिनीच्या क्षेत्रा बद्दल माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. अर्जा संबंधित अधिक माहितीसाठी किंवा तो व्यवस्थितपणे कसा भरा यासाठी तुम्ही कृषी कार्यालयांमध्ये जाऊन माहिती घेऊ शकता किंवा युट्युब वर असंख्य व्हिडिओ अर्ज भरण्याबाबत आहेत त्या तुम्ही पाहून व्यवस्थितपणे अर्ज हा भरू शकता.