दैनंदिन जीवनात आपण पाहिलं तर भारत देशामध्ये असंख्य लोक ही बेरोजगार व गरीब परिस्थितीतील कुटुंबातील असतात ज्यामुळे त्यांना खूप सार्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामधील एक परिस्थिती म्हणजे दवाखान्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च.
जर आपण पाहिलं तर एक सर्वसामान्य गरीब माणूस दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्या उपचाराचा खर्च हा खूपच होत असतो ज्यामुळे त्यांना तो उपचार घेणे परवडत नाही ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर व कुटुंबावर देखील होत असतो
त्यामुळेच भारत सरकारने प्रत्येक गरीब व्यक्तीला एक चांगला महागडा उपचार घेता यावा यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड भारत योजना ही सुरू केली आहे. या योजनेमार्फत प्रत्येक व्यक्तीला खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात कमी खर्चात उपचार मिळणार आहे या संबंधित सविस्तर माहिती वाचण्यासाठी तुम्ही खालील लेख संपूर्ण वाचा.
आयुष्यमान कार्ड योजना काय आहे
मित्रांनो सरळ व सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आयुष्यमान कार्ड योजना ही एक अशी योजना आहे की जी केंद्र सरकार द्वारे राबवली जाते आणि या योजनेचा उद्देश एकच आहे की गरीब लोकांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करणे.
या मदतीमध्ये सरकार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व्यक्तीला उपचारासाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत अनुदान दिले जाते ज्यामध्ये दवाखान्याच्या औषधापासून ते जेवणापर्यंत चा खर्च हा सरकार पुरवते.
आयुष्यमान कार्ड कसे काढायचे
मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला जवळच्या संगणक कार्यालयांमध्ये जावे लागेल किंवा जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल व तुम्हाला स्मार्टफोनचे ज्ञान असेल तर तुम्ही आयुष्यमान कार्ड साठी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
जर तुमच्याकडे चांगला मोबाईल असेल तर तुम्हाला मोबाईल मध्ये सर्वप्रथम (google chrome) हे उघडायचं आहे आणि त्यानंतर (www.pmjay.gov.in) या संकेतस्थळावरती जायचं आहे व येथे अर्ज करायचा आहे अर्ज कसा केला जातो यासाठी तुम्ही युट्युब वरती एक प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील पाहू शकता व त्याप्रमाणे आयुष्यमान कार्ड साठी अर्ज करू शकता.
आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे
मित्रांनो आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड ग्रामपंचायतीकडून रहिवासी दाखला स्वतःचा मोबाईल क्रमांक वार्षिक उत्पन्नाचा दाखला जात प्रणामपत्र अशी कागदपत्रे लागतील.
आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
- मित्रांनो आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आर्थिक दृष्ट्या कुमकुवत किंवा गरीब घराण्यातील व्यक्ती असायला हवेत
- तुमच्या जवळ कोणतीही सरकारी किंवा खाजगी नोकरी नसायला पाहिजे. म्हणजेच महिना दहा हजार रुपये पेक्षा जास्त तुम्ही कमवत नसाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल
- यानंतर अशा देखील लोकांना या योजने चा लाभ घेता येईल की ज्यांच्या घरात कमावणारे व्यक्ती कोणी पण नसेल तसेच त्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख अपंग असतील तेव्हा देखील योजनेचा लाभ ते घेऊ शकतात
- आपण जर अनुसूचित जाती जमातीतील असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळू शकतो परंतु यासाठी तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्र लागणार आहे.
- यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावरती कोणत्याही प्रकारच घर किंवा खाजगी मालमत्ता नसायला हवी अशा काही ठराविक गोष्टींची पात्रता ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे.
आयुष्यमान कार्ड चे फायदे
जसे की मित्रांनो आयुष्यमान कार्ड ही गरीब कुटुंबासाठी व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबासाठी राबवली जाणारी एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेचे फायदे हे खालील प्रमाणे लोकांना घेता येतात.
- मित्रांनो या योजनेचा सर्वप्रथम फायदा असाकी आयुष्यमान योजना ही लोकांना दवाखान्याच्या खर्चासाठी 5 लाख पर्यंत अनुदान देते.
- या योजनेचा लाभ एकून 1393 रोगांवर्ती घेता येतो. त्यामध्ये असंख्य प्रकारच्या आजारावरती आपल्याला सरकार मदत करत असते
- यानंतर या योजनेअंतर्गत पेशंटला त्याच्या दवाखान्यातील गोळ्या औषधांचा व जेवणाचा खर्च हा सरकारद्वारे पुरवला.
- यानंतर या योजनेअंतर्गत पेशंटला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेता येतो अशे असंख्य प्रकारचे फायदे हे या योजनेतून मिळत असते.