ई श्रम कार्ड कसे काढावे download ई श्रम कार्ड

आपल्या भारत देशामध्ये असंख्य नागरिक हे गरीब कुटुंबातील आहेत परंतु नोकरी नसल्या कारणामुळे त्यांना छोटी मोठी कामे करून दिवस काढावे लागतात व त्यातून त्यांना त्यांचे कुटुंब चालवावं लागत. त्यामुळे केंद्र सरकारने त्या प्रत्येक गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कामगारास सरकारकडून विविध योजनांचा लाभ मिळणार आहे तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचा.

e shram card kase kadhave

ई श्रम कार्ड योजना उद्देश काय आहे

मित्रांनो ई श्रम कार्ड योजनेचा उद्देश एकच आहे की सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ हा देशातील गरीब कुटुंबातील कामगारास व नागरिकास मिळावा. त्यामुळे भारत केंद्र सरकारने श्रम कार्ड योजना ही सुरू केली आहे.

ई श्रम कार्ड योजनेतून कोणत्या योजनांचा लाभ मिळणार

मित्रांनो ई श्रम कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या खालील योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळू शकतो.

  • सर्वप्रथम इ श्रम कार्ड जर तुम्ही काढले तर तुम्हाला सरकारकडून तुमच्या मुलांचा शैक्षणिक खर्च देखील मिळू शकतो
  • त्याचबरोबर केंद्र सरकार कडून तुम्हाला आर्थिक मदत देखील मिळू शकते
  • तसेच तुम्हाला आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज देखील मिळू शकते
  •  यानंतर केंद्र सरकार द्वारे राबवली जाणारी पीएम आवास योजनेचा देखील तुम्हाला लाभ मिळू शकतो त्यामध्ये तुम्हाला एक घर मिळू शकते
  • अशा अनेक प्रकारच्या भारत देशामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनेचा तुम्हाला ई श्रम कार्ड मुळे लाभ मिळू शकतो

ई श्रम कार्ड योजना फायदे

  • ई श्रम कार्ड काढल्यानंतर समजा एखाद्या नागरिकाचा अपघात झाला किंवा त्याच्या सोबत काही वाईट झाले तर त्याला शासनाकडून दोन लाख रुपया पर्यंत अनुदान हे दिले जाते.
  • यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कामगारासाठी केंद्र सरकारने एक ई श्रम हे संकेतस्थळ बनवल आहे. ज्यामध्ये सर्व गरीब कामगारांना सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे
  • यानंतर जर तुमच्याजवळ ई श्रम कार्ड असेल तर त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चात देखील घेता येणार आहे
  • एकंदरीत ई श्रम कार्ड योजना ही एक अशी योजना आहे ज्याच्या अंतर्गत केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या असंख्य योजनेचा लाभ हा त्या ई श्रम कार्ड धारकाला घेता येतो

ई श्रम कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

मित्रांनो ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील दिलेली कागदपत्रेही लागणार आहेत

  • स्वतःचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक असणे गरजेचे आहे
  • बँक अकाउंट नंबर पासबुक झेरॉक्स 
  • राशन कार्ड
  • ग्रामपंचायत मधील रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

ई श्रम कार्ड कसे काढावे 

  • सर्वप्रथम मित्रांनो ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला (eshram.gov.in) या संकेतस्थळावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यासमोर संकेतस्थळाच मुखपृष्ठ उघडेल त्यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूस असणाऱ्या (Registrar on eshram) या बटणावरती क्लिक करायचं आहे.
  • मित्रांनो तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला  तुमचा मोबाईल क्रमांक टाकून इतर माहिती भरायची आहे व त्यानंतर सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचा. त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो तुम्हाला ओटीपी बॉक्स मध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला बाकी उर्वरित संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे जसे आधार कार्ड बँक पासबुक फोटो अशी कागदपत्रे अपलोड करावी लागतील ते तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या याबद्दल तुम्ही प्रात्यक्षिक युट्युब वरती व्हिडिओ पाहून देखील माहिती भरू शकता
  •  सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे ई श्रम कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन येईल त्याच्या मदतीने तुम्ही ई श्रम कार्ड हे डाऊनलोड करू शकता

Leave a Comment