मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक अशी योजना आहे की जी फक्त अनुसूचित जातीतील व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. आणि मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की अनुसूचित जातीतील व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. त्यासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक विशिष्ट अनुदान हे स्कॉलरशिप या स्वरूपात देण्यात येते.
विद्यार्थी मित्रांनो जर आपण अनुसूचित जाती जमाती मधील असाल किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असाल आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खालील माहिती व्यवस्थितपणे संपूर्ण वाचून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
स्वाधार योजनेचा लाभ कोणाला मिळतो
- विद्यार्थी मित्रांनो स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अनुसूचित जातीतील असायला हवेत किंवा नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी असायला हवेत
- यानंतर या योजनेचा लाभ तेच विद्यार्थी घेऊ शकतात की ज्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळाला नाही किंवा त्यांचा प्रवेश शासकीय वस्तीगृहात नाही
स्वाधार योजनेतून विद्यार्थ्याला स्कॉलरशिप किती मिळते
विद्यार्थी मित्रांनो स्वाधार या योजनेतून विद्यार्थ्याला स्कॉलरशिप ही दोन प्रकारांमध्ये मिळते.
- सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मुंबई किंवा नवी मुंबई अशा ठिकाणी शिक्षण घेत असतील तर त्या विद्यार्थ्यांना या योजनेतून स्कॉलरशिप ही प्रति विद्यार्थी जेवण भत्ता 32 हजार रुपये तसेच राहण्यासाठी 20 हजार रुपये निवासी भत्ता व इतर निर्वाह भत्ता 8 हजार रुपये इतके एकूण 60 हजार रुपये प्रति वर्ष अशी स्कॉलरशिप मुंबई सारख्या शहराचा विचार करून विद्यार्थ्याला देण्याचे शासनाने ठरवले आहे
- यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थी जर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला स्कॉलरशिप ही भोजनबत्ता 28 हजार रुपये, निवासी भत्ता 15000 रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकूण 51 हजार रुपये इतकी प्रति वर्षी स्कॉलरशिप दिली जाते.
स्वाधार योजना विद्यार्थी पात्रता
विद्यार्थी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता ही लागणार आहे. जर तुम्ही यामध्ये पात्र होत असाल तरच तुम्हाला अर्ज करता येईल
- सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अनुसूचित जाती मधील किंवा नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी असायला हवेत
- यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवेत
- यानंतर विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही दहावी बारावी किंवा पदवीचे शिक्षण घेत असाल आणि दहावी किंवा बारावी मध्ये जर तुम्हाला 40% पेक्षा अधिक गुण असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो
- यानंतर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे
- यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये तुमची 75 टक्के पेक्षा जास्त हजेरी असायला पाहिजे त्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडावं लागेल
- अशा वरील काही गोष्टींची पात्रता ही या योजनेसाठी सरकारने ठेवलेली आहे जर तुम्ही पात्र होत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या
स्वाधार योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
विद्यार्थी मित्रांनो खालील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत.
- विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम इच्छुक विद्यार्थ्याला त्याचं जात प्रमाणपत्र हे लागणार आहे
- त्यानंतर ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला हा त्याला लागणार आहे
- यानंतर विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असायला हवे व पासबुकची झेरॉक्स देखील अर्ज करताना लागणार आहे
- यानंतर तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला देखील विद्यार्थ्याला लागणार आहे
- यानंतर इयत्ता दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुण प्रमाणपत्र हे विद्यार्थ्याला लागणार आहे
- यानंतर विद्यार्थीच्या महाविद्यालयात शिकत आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र हे विद्यार्थ्याला लागणार आहे
- यानंतर विद्यार्थ्याला त्याचा मोबाईल क्रमांक लागणार आहे तो मोबाईल क्रमांक त्याच्या बँकेच्या खात्याबरोबर व आधार कार्ड सोबत लिंक असायला हवा
- यानंतर विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नाही या संबंधित विद्यार्थ्यांचे सहमती पत्र देखील लागणार आहे
- तसेच महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची 75% पेक्षा जास्त हजेरी असल्याचा पुरावा देखील लागणार आहे.
- असे व इतर अजून काही ठराविक कागदपत्रे देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागते
स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा
- विद्यार्थी मित्रांनो स्वाधार योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल (www.sjsa.maharashtra.gov.in) हह
- संकेत स्थळावरती जाऊन होम पेज वरून तुम्हाला स्वाधार योजनेचा अर्ज हा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर तो अर्ज तुम्हाला हाताने भरून व फॉर्म दिलेली सर्व कागदपत्रे जोडून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन तो फॉर्म तुम्हाला जमा करावा लागेल.