प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 | फायदे पात्रता अर्ज

मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना एक अशी योजना आहे की ज्या अंतर्गत सर्व नागरिकांच्या आर्थिक गरजा किंवा व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे राबवली जाणारी ही योजना आहे.मुद्रा लोन योजना अंतर्गत केंद्र सरकार नागरिकांना तीन प्रकारांमध्ये कर्ज देत असते

पहिलं म्हणजे सामान्य कुटुंब ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे त्यांना जर व्यवसायासाठी किंवा शेतीसाठी कर्ज हवे असेल तर केंद्र सरकार त्यांना 50 हजार रुपया पर्यंत कर्ज देते.

दुसऱ्यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांना केंद्र सरकार 50 हजार पासून ते 5 लाखापर्यंत कर्ज देते. आणि यानंतर उच्चवर्गीय कुटुंबांना केंद्र सरकार 50 हजार पासून ते 10 लाख पर्यंत कर्ज देते.शी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना आहे ही संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी व इतर माहिती वाचण्यासाठी तुम्ही खालील दिलेला संपूर्ण लेख वाचू शकता.

pradhanmantri mudra loan yojana

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही एक अशी योजना आहे की जी केंद्र सरकारद्वारे राबवली जाते व या योजनेचा लाभ हा तरुण वर्गाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कुटुंबाची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी किंवा शेतीसाठी लाभ घेता येतो. आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 50 हजार रुपया पासून ते 10 लाख रुपया पर्यंत कर्ज देते.

मुद्रा लोन योजना उद्दिष्टे

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्टे हे केंद्र सरकारचे एकच आहे की नवनवीन तरुणांना व्यवसायाचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांना आर्थिक कर्ज स्वरूपात मदत करणे. यामुळे बरेचसे नागरिक हे स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक आर्थिक उत्पन्न निर्माण करतील

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना महिला प्राधान्य

केंद्र सरकारने या योजनेचा महिलांसाठी देखील विचार केला आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिला ह्या व्यवसायामध्ये उतरतील व त्यामध्ये यश देखील प्राप्त करतील. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी एक नियम देखील बनवला आहे ज्यामध्ये चार लाभार्थ्यांमध्ये तीन लाभार्थी या महिला असल्या पाहिजे आणि एक लाभार्थी हा पुरुष असला पाहिजे असा सरकारने नियम देखील आखल आहे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना प्रमुख नियम

  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनाच कर्ज हे मिळते
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा केंद्र सरकारकडून शुल्क आकारला जात नाही
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थ्याला कर्ज मिळते त्या कर्जाचा परतफेड कालावधी हा पाच वर्षापर्यंतच्या असतो

या योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर लाभार्थ्याला एक मुद्रा कार्ड मिळते त्या कार्डच्या साह्याने लाभार्थी हा त्याच्या व्यवसायासाठी कर्ज काढू शकतो.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तीन टप्पे

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना खालील तीन टप्प्यांमध्ये राबवली जाते.

  • शिशु लोन : शिशु लोन मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय जर 18 वर्षाच्या आत असेल तर तो या गटामध्ये लाभ घेऊ शकतो. परंतु त्याला सरकारकडून कर्जाचा लाभ हा फक्त 50 हजार रुपया पर्यंत घेता येतो
  • किशोर लोन : किशोर लोन मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय जर 18 ते 25 मध्ये असेल तर तो या गटांमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आणि पात्र लाभार्थ्याला केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 50 हजार रुपया पासून ते पाच लाख रुपया पर्यंत व्यवसायासाठी कर्ज देते.
  • तरुण लोन : तरुण लोन या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय हे जर 25 ते 40 मध्ये असेल तर तो या गटामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि पात्र लाभार्थ्याला केंद्र सरकार या योजने अंतर्गत 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपया पर्यंत कर्ज देते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना पात्रता

मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना पात्रता मध्ये सर्वप्रथम लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा. व कर्ज प्राप्तीसाठी त्याच्या कडे व्यवसायाचा संपूर्ण प्रकल्प व माहिती असावी असे असेल तर लाभार्थ्याला शंभर टक्के कर्ज हे केंद्र सरकार देते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना व्याजदर

मित्रांनो केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ठराविक असा व्याजदर ठरवत नाही कारण की व्याजदर हा लाभार्थ्याच्या व्यवसायावरती अवलंबून असतो तो कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतो यावर व्याजदर हा ठरवला जातो परंतु सरकार जास्तीत जास्त व्याजदर हा 12% पर्यंत आकारते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना कागदपत्रे

मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि व्यवसायासाठी कर्ज मिळवायचे असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रेही लागणार आहेत जर तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असतील तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा.

  • सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला लाभार्थ्याचे ओळखपत्र मतदान कार्ड,आधार कार्ड व पॅन कार्ड हे लागणार आहे
  • त्यानंतर ग्रामपंचायत कडून मिळणारा रहिवासी दाखला देखील तुम्हाला लागणार आहे
  • त्यानंतर तुम्हाला राहत्या घराचे तुमच्या नावाचे लाईट बिल देखील लागणार आहे
  • आपण जो व्यवसाय करणार आहोत त्याबद्दल माहिती व त्याबद्दल कागदपत्रे देखील तुम्हाला लागणार आहेत
  • अशी अजून काही ठराविक कागदपत्रे देखील तुम्हाला लागू शकतील

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अर्ज

प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना ही प्रत्येक बँकेमार्फत राबवली जाते व कोणत्याही बँकेमध्ये तुम्हाला या योजनेची माहिती देऊन तुम्हाला कर्ज हे मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही बँकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावरती जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता किंवा जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता व एक व्यवसायासाठी सुरुवात करू शकता.

Leave a Comment