शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमची शेत जमीन तुमच्या वारस असलेल्या मुलांच्या नावावर करायची झाली तर तुम्हाला सर्वप्रथम सातबारा वरती तुमच्या वारस असलेल्या सर्व मुलांची नोंदणी करावी लागते.
नोंदणी तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन ती करावी लागते परंतु बदलत्या युगामुळे आता तुम्ही तुमच्या सातबारावरती वारस नोंदणी ही घरबसल्या देखिल तुमच्या मोबाईल द्वारे करू शकता ज्यामुळे तुमच्या वेळेची व पैशाची बचत होईल. त्यामुळे आज आपण माहिती पाहणार आहोत की घरबसल्या मोबाईल वरून वारस नोंदणी कशी केली जाते तर खाली दिलेल्या संपूर्ण लेख तुम्ही व्यवस्थित वाचा.
सातबाऱ्यावरती वारस नोंदणी करणे का गरजेचे आहे
शेतकरी मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या शेतजमिनी वरती आपल्या वारसाची नोंद करणे हे खूप गरजेचे आहे जसे की कायद्यानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन आहे त्या शेतजमिनीचा लाभ हा त्याच्याच मुलाला घेता येतो किंवा वारसदाराला घेता येतो
परंतु जर त्या व्यक्तीने वारसाची सातबारा वरती नोंद केली नसेल तर वारसाला पुढे शेतजमीन मिळण्यास खूप वेळ व पैसा लागू शकतो. जसे की समजा त्या व्यक्तीचे अवकाती किंवा नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्या आणि त्याच्या वारसाची जर नोंद सातबारा वरती नसेल तर त्याच्या वारसाला कायद्याला पटवून देण्यासाठी खूप मेहनत घेऊन शेतजमीन त्याच्या नावावरती करून घेता येईल त्यामध्ये आणि अडचणी देखील येतील
याचाच विचार करून प्रत्यक्ष शेतकऱ्याने जर त्याच्या वारसदाराची नोंद सातबारा वरती केली तर त्या वारसाला त्याचे वडील गेल्यानंतर तीन महिन्याच्या आत त्या शेत जमिनीचा मालकी हक्क मिळू शकतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या जमिनीच्या सातबारा वरती वारसदारांची नोंद करणे हे खूप गरजेचे आहे.
वारसदाराची सातबाऱ्यावरती नोंद ऑनलाईन मोबाईलवर अशी करा
शेतकरी मित्रांनो खालील पद्धतीने तुम्ही तुमच्या वारसदाराची नोंद ही सातबारा उतारा वरती ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरती करू शकता
- शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल वरती गुगल क्रोम उघडून (pdeigr.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावरती जायचं आहे.
- संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर त्या संकेतस्थळाचा मुखपृष्ठ उघडेल आणि तिथे तुम्हाला पब्लिक डेटा एन्ट्री (public data entry) या नावाचा एक पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे.
- दिलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन मुखपृष्ठ तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम त्या संकेतस्थळावर तुमच्या नावाची नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक आयडी व पासवर्ड मिळेल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे किंवा लिहून ठेवायचे आहे कुठेतरी
- जेव्हा तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड तयार कराल तेव्हा तुम्हाला लॉगिन या बटनावरती क्लिक करून तुमचं त्या संकेतस्थळावरती लॉगिन करून घ्यायचं आहे
- जेव्हा तुम्ही त्या संकेतस्थळावर पूर्णपणे आयडी पासवर्ड टाकून लॉगिन कराल त्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये तुम्हाला सातबारा या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- यानंतर पुन्हा एकदा एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला युजर सिलेक्ट करावा लागेल त्यामध्ये तुम्हाला युजर इज बॅक या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे
- यानंतर पुढे प्रोसेस बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फेरफार अर्ज प्रणाली एक नावाचे पेज तिथे दिसून येईल
- यानंतर तुम्हाला आता तुमच्या गावाचे नाव जिल्हा तालुका अशी माहिती भरून लगेचच त्याला टेकडी एक अर्ज करून फेरफार प्रकार निवडावा लागेल
- त्यानंतर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं वारस नोंदणी करायची आहे त्यामुळे तुम्हाला वारस नोंद या पर्यायावरती क्लिक करायचं आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल आणि तिथे संपूर्ण योग्य माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे क्लिक करायचे आहे
- यानंतर आता तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे किंवा मृत व्यक्तीचे नाव खाते क्रमांक अशी सर्व माहिती फॉर्ममध्ये तिथे भरावी लागेल जेव्हा तुम्ही संपूर्ण योग्य माहिती तिथे भराल त्यानंतर तुम्हाला खातेदार शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- यानंतर ज्या खातेदाराची तुम्ही माहिती भरलेली आहे किंवा जो खातेदार तुम्ही निवडला आहे त्या व्यक्तीचा खाते क्रमांक गट क्रमांक आपल्याला तिथे निवडावा लागेल आणि त्यानंतर खातेदार जर मृत्यू झाला असेल तर त्याच्या मृत्यूची दिनांक देखील आपल्याला तिथे टाकावी लागेल
- त्यानंतर पुढे तुम्हाला याच्यासोबत तिथे शेती संबंधित सर्व माहिती मिळेल तसेच तुम्हाला काही ठराविक प्रश्न देखील विचारण्यात येतील त्या प्रश्नांची तुम्हाला योग्यपणे उत्तरे देऊन पुढे त्यानंतर तुम्हाला वारसदारांची नावे भरावी लागतील पुढील सर्व माहिती तुम्हाला इंग्रजी मध्ये भरावी लागेल
- शेवटी शेतकरी मित्रांना संपूर्ण माहिती तुम्ही योग्यपणे भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती तलाठ्याकडून योग्यरित्या तपासली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या सातबारे वरती तुमच्या वारसदाराची नोंद करण्यात येईल
शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा वापर करून तुमच्या सातबारा उतारा वरती वारसदाराची घरबसल्या नोंद करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंद करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील सातबारा वरती वारसाची नोंद करू शकता.
FAQ
वारस नोंदणी कशी करायची
वारस नोंदणी ही तलाठ्या मार्फत केली जाते व ऑनलाईन पद्धतीने देखील केली जाते परंतु वारस नोंदणीचा अर्ज हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या तीन महिन्याच्या आत करावा लागतो.