महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2023

जसे की शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार सर्व शेतकऱ्यांसाठी दरवर्षी अनेक साऱ्या योजना राबवत असते आणि या सर्व योजनांमधून सरकार शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक अनुदान देखील शेतकऱ्याला देत असते

त्यामुळे शेतकरी मित्रांनो यावर्षी देखील महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज या उपक्रमा मार्फत सौर ऊर्जा वीज प्रकल्प हा या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार आहे व याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेता देखील येईल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जे सौर पॅनल मिळणार आहेत ते महाराष्ट्रातील राज्य विद्युत वितरण कंपनीकडून मिळणार आहेत आणि या सौर पॅनल च्या मदतीने तुम्ही मोटार तसेच शेतीयुक्त असणारी साधने देखील वापरू शकता व वीज बिलाची बचत करून तुमचे आर्थिक उत्पन्न वाढू शकता. तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज करण्याची पद्धत काय आहे व इतर माहितीसाठी तुम्ही खालील दिलेला लेख संपूर्णपणे व्यवस्थित वाचा.

saur krishi vahini yojana

सौर कृषी वाहिनी योजना काय आहे

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मुख्यमंत्री अंतर्गत राबविण्यात येणारी सौर कृषी वाहिनी योजना ही फक्त शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे व या योजनेतून शेतकऱ्याला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सौर पॅनल पुरवले जातात ज्याच्या मदतीने शेतकऱ्याचा वीज बिल खर्च कमी होतो व त्याला मोफत वीज वापरता येते.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सरकार सोलर पॅनल बसून मोफत वीज पुरवठा सुरू करणार आहे व दिले जाणारे सोलर पॅनल 2 ते 10 मेगा व्याट क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनल असणार आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्याला मोटार च्या साह्याने पाणी ओढणे किंवा शेताला लाईट नसली तरी पाणी देणे अशा समस्येवर एक चांगला उपाय सरकारने आता सौर ऊर्जा प्रकल्प काढून काढला आहे

सौर कृषी वाहिनी योजना ध्येय

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेचे ध्येय एकच आहे की महाराष्ट्रामधील सर्व भागांमधील शेतकऱ्यांना एक मोफत वीज प्रकल्प म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प हा या योजनेअंतर्गत मिळवून देणे यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या योजनेसाठी 3700 कोटी रुपये खर्च करणार आहे जेणेकरून राज्यातील प्रत्येक व अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र सरकार या योजनेमुळे शेतकऱ्याला जो दरवर्षी लाईट बिलाचा खर्च येतो तो कमी करण्याचे सरकारचे ध्येय आहे त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे
  • अनेक वेळा काय होते की जेव्हा नैसर्गिक कारणामुळे किंवा इतर कारणामुळे जेव्हा गावाकडील भागातील वीस पुरवठा खंडित होतो बंद होतो तेव्हा शेतकऱ्यापर्यंत वीज जात नसल्यामुळे त्याचे नुकसान त्याच्या पिकामध्ये होते पिकाला वेळेवर पाणी न दिल्यामुळे त्याचे तिथे आर्थिक नुकसान होते याचाच विचार करून महाराष्ट्र सरकारने सौर ऊर्जा हा प्रकल्प आणला आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्याला 12 तास वीज वापरता येईल
  • यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच देण्याचे सरकारने ठरविले आहे

सौर कृषी वाहिनी योजना फायदे

  • शेतकरी मित्रांनो या योजनेतून सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकार सौर पॅनल देऊन स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्याच्या वीज बिलाच्या खर्चात घट होणार आहे व त्याला आर्थिक मदत देखील प्राप्त होणार आहे
  • या योजनेतून 4000 हून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार 20 मेगावॅटचे सौर ऊर्जा पॅनल प्रकल्प दिले जाणार आहेत ज्या मधून शेती युक्त साधने चालण्यास वीज प्राप्त होईल
  • या योजनेअंतर्गत नुकतेच महाराष्ट्रामधील लातूर व सोलापूर या भागांमध्ये सरकारने काही सोलर प्लांट बसवले आहेत व त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचे ध्येय घेतले आहे

सौर कृषी वाहिनी योजना पात्रता

  • शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवेत तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
  • यानंतर ज्या शेतकऱ्याला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे खूप गरजेचे आहे ज्यावर तो हा सौर कृषी प्रकल्प उभा करणार आहे
  • त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज केल्यानंतर तो प्रकल्प उभा करण्यासाठी तेथील जमिनीवर कोणत्याही प्रकारचे सरकारी बंधन नसावे
  • वरील गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवले जाईल

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अर्ज कागदपत्रे

  •  सर्वप्रथम लाभार्थ्याचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड लागणार आहे
  • त्यानंतर लाभार्थीच्या गावामध्ये राहतो त्या गावामधील ग्रामपंचायत इकडून मिळणारा रहिवासी दाखला त्याला लागणार आहे
  • यानंतर लाभार्थ्याच्या जमिनीचे कागदपत्रे म्हणजेच सातबारा अशा काही गोष्टी लागणार आहेत
  • यानंतर लाभार्थ्याकडे अर्ज करण्यासाठी एक मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे त्यावर त्याला या योजनेबद्दल माहिती मिळेल
  • असे वरील व इतर अजून काही कागदपत्रे या योजनेसाठी लाभार्थ्याला लागणार आहेत

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ऑनलाइन अर्ज असा करा

शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील पद्धतीने अर्ज हा या योजनेसाठी करू शकता परंतु जर तुम्हाला अर्ज करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या कृषी अधिकाऱ्याची भेट घेऊन किंवा कृषी कार्यालयांमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

  • शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सौर कृषी वाहिनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे त्यासाठी तुम्ही गुगल क्रोम वरती (mahadiscom.in/solar) हे सर्च करा
  • संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे संकेतस्थळाची होम पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला होम पेज वरती असणाऱ्या सर्विसेस या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला तिथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दिसेल त्या योजनेवर क्लिक करून तुम्हाला नोंदणी पर्यायावर ती क्लिक करायचं आहे
  • तिथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (New user Register Here) असा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडून  तुम्हाला तिथे एक नोंदणी अर्ज दिसेल ज्यामध्ये तुम्हाला आता तिथे दिलेली संपूर्ण आवश्यक माहिती भरावी लागेल
  • सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला तिथे दिलेली सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात तिथे अपलोड करावी लागतील
  • शेतकरी मित्रांनो सर्व तुम्ही तिथे दिलेली माहिती भरल्यानंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट असा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे
  • शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी घरबसल्या मोबाईलचा उपयोग करून अर्ज करू शकता व यानंतर या योजनेत पात्र शेतकऱ्यांना मोबाईल वरती एक मेसेज जातो किंवा या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा आपले या योजनेत नाव आले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयांमध्ये जाऊन या योजनेसंबंधीत माहिती घेऊ शकता

Leave a Comment