महाराष्ट्र पशुधन अभियान योजना 2023 | आजचा अर्ज करा

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती निदर्शनात घेऊन त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे नेहमी महाराष्ट्र सरकार लक्ष देत असते व त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते त्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येतो आणि या सर्व योजना राबवण्याचा सरकारचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या उत्पादन वाढीस मदत करणे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने आत्ताच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी पशुवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही आणली आहे आणि या योजनेतून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला 100 टक्के अनुदान देणार आहे या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लेख संपूर्ण वाचा.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना काय आहे

शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाकडून राबवली जाणारी एक योजना आहे आणि या योजनेमध्ये महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग जे शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात म्हणजेच गाई म्हशी किंवा शेळीपालन कुकुटपालन असे व्यवसाय करतात त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते

आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग अशा सर्व शेतकऱ्यांना अनुदान देते की जे शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात व अनुदान हे पशुपालन व्यवसाय करत असताना पशुंच्या खाद्यासाठी अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्याला पशुपालन व्यवसाय करत असताना पशुंच्या खाद्यासाठी जास्त पैसे खर्च होणार नाही व त्याचा फायदा त्याला त्याच्या उत्पादनात होईल अशी ही योजना आहे

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेतून सर्व शेतकऱ्याला नापीक जमिनीवरती जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी किंवा उगवण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन हे शंभर टक्के अनुदान देते.

राष्ट्रीय पशुधन योजनेसाठी निवड कशी केली जाते

  • शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी निवड करताना अर्ज करणारा लाभार्थी हा सर्वप्रथम महाराष्ट्रातील रहिवासी असावा
  • त्यानंतर सर्वात महत्त्वाचे अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे स्वतःची शेत जमीन असणे खूप गरजेचे आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला प्रशिक्षण घ्यावे लागेल किंवा लागणार आहे
  • त्यानंतर केवायसी साठी सर्व आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याकडे असणे खूप गरजेचे आहे
  • त्यानंतर लाभार्थी अर्जदाराकडे जमीन पट्टा असणे आवश्यक आहे
  • त्यानंतर लाभार्थ्याकडे किती पाळीव पशु प्राणी आहेत यांची देखील माहिती घेण्यात येईल व त्यानुसार लाभार्थ्याची निवड करण्यात येईल

वैरणीसाठी शासनाकडून कोणती बियाणे पुरवली जातात

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्याला त्याच्या पशुपालन व्यवसायाचा आढावा घेऊन पशूंचे खाद्य तयार करण्यासाठी खालील बियाण्यांवर 100% अनुदान दिले जाते.

( मका,बाजरी,बरसिम,हायशुगर,आटा,ज्वारी इत्यादी ठराविक बियाण्यांचे वाटप हे या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती केले जाते) आणि या बियाण्याचे वाटप कृषी विभागामार्फत केले जाते त्यामुळे तुम्ही कृषी कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसंबंधीत माहिती घेऊन या बियाण्यांचा शंभर टक्के अनुदानावरती लाभ घेऊ शकता)

राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला असाल तर या योजनेसाठी तुम्हाला पशुखाद्य (वैरण) तयार करण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामार्फत एकही पैसा खर्च न करता 100 टक्के अनुदान हे दिले जाते.

राष्ट्रीय पशुधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी जर तुम्हाला जनावरांच खाद्य तयार करण्यासाठी अनुदान हवे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये जाऊन पशुसंवर्धन विभाग कडे या योजनेसंबंधित अर्ज करू शकता.

नाहीतर तुम्ही अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईल द्वारे देखील करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज हा करू शकता आणि अर्ज करण्यास जर अडचण येत असेल तर तुम्ही अर्ज कसा करावा या संबंधित युट्युब वरती व्हिडिओ पाहू शकता किंवा जवळच्या ई सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजने संबंधित माहिती घेऊन अर्ज करू शकता

सरकारी योजना येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी पोर्टलयेथे क्लिक करा

Leave a Comment