महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा | संपूर्ण माहिती

 महाराष्ट्र सरकारने राबवलेली लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा यासंबंधीत लोकांना माहिती हवी आहे तर मित्रांनो लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा आपण ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने करू शकतो यासंबंधीत संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये दिलेली आहे व ही योजना काय आहे तसेच या योजनेसाठी पात्रता काय आहे तसेच लाभार्थ्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत या संबंधित सर्व माहिती आम्ही आमच्या लेखामध्ये सांगितली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण व्यवस्थित वाचा.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

  • मित्रांनो लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे मुलींसाठी राबवण्यात येणारी एक योजना आहे व या योजनेतून गरीब कुटुंबातील मुलींना 75 हजार रुपये इतके शैक्षणिक खर्चासाठी अनुदान दिले जाते.

मित्रांनो आमच्या माहितीनुसार लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा आपण ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करू शकतो परंतु ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अजून या योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळ तयार केलेले नाही त्यामुळे लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती कार्यालय मध्ये करता येईल. त्यामुळे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालय मध्ये किंवा जिल्हे परिषद कार्यालय मध्ये जाऊन या योजने संबंधित माहिती घेऊन अर्ज करू शकता.

  • परंतु या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे त्यामुळे खालील कागदपत्रे तुमच्याकडे आहेत की नाही ते व्यवस्थित तपासून पहा

महाराष्ट्र लेक लाडकी योजना कागदपत्रे

  • सर्वप्रथम लाभार्थ्याचे ओळखपत्र म्हणजेच (मुलीचे आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • मुलीचे बँक पासबुक व खाते नंबर
  • पालकांचे म्हणजेच (आई-वडिलांचे बँक खाते असायला हवे)
  •  लाभार्थ्याच्या रहिवासी दाखला
  • मुलीचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • पालकांचे ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • रेशन कार्ड
  • त्यानंतर संपर्क क्रमांक

अशी वरील कागदपत्रे जर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो परंतु या योजनेसाठी काही पात्रता देखील आहे ज्यामध्ये ज्यामध्ये उमेदवार पात्र होत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे तुम्ही खाली दिलेली पात्रता वाचून घ्या

लेक लाडकी योजना पात्रता काय आहे

  • मित्रांनो सर्वप्रथम या योजनेसाठी पात्रता ही अर्ज करणारा उमेदवार (मुलगी) ही महाराष्ट्रा मधील रहिवासी असायला हवी 
  • त्यानंतर अर्ज करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचे रेशन कार्ड हे पिवळे किंवा केशरी असायला हवे
  • यानंतर या योजनेसाठी अर्ज हा 18 वर्षाच्या आतील मुलीच करू शकतात  व या योजनेचा लाभ हा मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंतच मिळतो 
  • अशी वरील काही ठराविक या योजनेसाठी पात्रता आहे जर तुम्ही पात्र होत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा

लेक लाडकी योजनेतून किती अनुदान मिळते

  • मित्रांनो लेक लाडकी योजनेमधून मुलीला शैक्षणिक खर्चासाठी अनुदान हे दिले जाते ते अनुदान खालील प्रमाणे आहे

या योजनेत पात्र झालेली मुलगी जर इयत्ता पहिली या वर्गात शिक्षण घेत असेल तर तिला त्यावर्षी पाच हजार रुपये इतके अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते

  • यानंतर मुलगी जर इयत्ता सहावी या वर्गात शिक्षण घेत असेल तर तिच्या त्यावर्षीच्या शैक्षणिक खर्चासाठी या योजनेतून 6 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते

यानंतर जर मुलगी इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत असेल तर त्यासाठी या योजनेअंतर्गत त्या मुलीसाठी 8 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते

  • त्यानंतर शेवटी मुलीच अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून महाराष्ट्र सरकार मुलीला पुढील शिक्षणासाठी 75 हजार रुपये इतके अनुदान देते.

अशा प्रकारच्या टप्प्यांमध्ये या योजनेतून पात्र झालेल्या मुलीला अनुदान हे सरकार मार्फत दिले जाते

लेक लाडकी योजनेचा फायदा काय

मित्रांनो लेक लाडकी योजनेचा फायदा असा की महाराष्ट्रामध्ये असे खूप सारे कुटुंब आहेत की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व त्यांची कौटुंबिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्या मुलींना शैक्षणिक खर्चाचा सामना खूप करावा लागतो व त्यामुळे त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक खर्चाची चिंता दूर होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनाही आणली आहे व याचा फायदा खूप साऱ्या गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे.

FAQ
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन करू शकता.

लेक लाडकी योजना किती अनुदान देते

लेक लाडकी योजनेतुन पात्र मुलीसाठी 75 हजार रुपये इतके अनुदान मिळते 

Leave a Comment