टॉप 12 वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी

मित्रांनो महाराष्ट्रा मिधिल अनेक शहरांमध्ये व खेडेगावांमध्ये अशा कितीतरी महिला आहेत की ज्यांचे शिक्षण हे बारावी पास पर्यंत झाले आहे परंतु त्यांना बारावी पास वर कोणत्या सरकारी नोकऱ्या मिळतात हे माहीत नसते त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा घेऊन सरकारी नोकरी प्राप्त करता येत नाही. त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आपण बारावी पास महिलांसाठी सरकार द्वारे कोणत्या नोकऱ्या दिल्या जातात या संबंधित माहिती पाहणार आहोत.

ग्रामसेवक नोकरी माहिती

मित्रांनो बारावी पास झाल्यानंतर जी सर्वप्रथम आपल्यासमोर महिलांसाठी नोकरी उभी राहते ती म्हणजे ग्रामसेवक पदाची नोकरी.

मित्रांनो ग्रामसेवक हा गावासाठी नेमलेला एक प्रमुख अधिकारी असतो व तो अधिकारी सरकार द्वारे नेमण्यात येतो व त्याचे काम हे गावा पुरतेच मर्यादित असते व तो अधिकारी नेमण्यासाठी सरकार ग्रामसेवक भरती ही घेत असते याचा लाभ महिलांना देखील घेता येतो

ग्रामसेवक भरतीसाठी जर महिलांना अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेला कोणत्याही शाखेतुन बारावी मध्ये 50% हून अधिक गुण असायला हवे तरच ती महिला या ग्रामसेवक पदासाठी अर्ज करू शकते

ग्रामसेवक भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी (येथे क्लिक करा )

पोलीस भरती माहिती

यानंतर बारावी पास वरती महिलांसाठी दुसरी सरकारी नोकरी म्हणजे पोलीस भरती जसे की महाराष्ट्र राज्यात महिला व पुरुष यांच्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती राबवण्यात येते त्याचा लाभ महिलांना देखील घेता येतो

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी महिलांचे शिक्षण जर 12 पास झाले असेल तर ती महिला या सरकारी पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकते

पोलीस भरतीसाठी दोन प्रकारची परीक्षा घेण्यात येते एक मैदानी चाचणी व दुसरी लेखी चाचणी सर्वप्रथम मैदानी चाचणी मध्ये गोळा फेक सोळाशे मीटर रनिंग 100 मीटर रनिंग अशा स्वरूपात शारीरिक चाचणी घेण्यात येते व त्यात पात्र झालेल्या महिलांची त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येते व लेखी परीक्षा पात्र झाल्यानंतर पोलीस पदासाठी त्यांची निवड करण्यात येते.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती

यानंतर बारावी पास महिलांसाठी तिसरी नोकरीची संधी म्हणजे पोस्ट ऑफिस भरती. ही एक अशी भरती आहे जी महाराष्ट्र सरकार द्वारे सर्व  महिलांसाठी व पुरुषांसाठी बारावी व दहावी पास शिक्षणावरती काढण्यात येते

मित्रांनो पोस्ट ऑफिस भरतीसाठी कोणत्याही प्रकारची शारीरिक व लिखित असणे होत नाही पोस्ट ऑफिस या पदासाठी निवड ही संपूर्णपणे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणांवरती केली जाते त्यामुळे तुम्हाला जर दहावी किंवा बारावी मध्ये जास्त गुण असतील तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता व या सरकारी नोकरीचा लाभ घेऊ शकता.

वन विभाग भरती माहिती

यानंतर बारावी पास महिलांसाठी चौथी सरकारी नोकरीची संधी म्हणजे वन विभाग भरती. वन विभाग भरती ही संपूर्णपणे बारावी पास महिलांसाठी व पुरुषांसाठी घेण्यात येणारी एक भरती आहे

वन विभाग भरती मध्ये वन विभाग अधिकारी हा नेमण्यात येतो व त्या वन विभाग अधिकाऱ्याचे काम हे असते की त्याला दिल्या जाणाऱ्या क्षेत्राचे नैसर्गिक संरक्षण करावे लागते

वन विभाग भरतीसाठी दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येते सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येते व त्यानंतर मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येते व त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या लाभार्थ्याची वन विभाग या पदासाठी निवड करण्यात येते.

महिला रेल्वे भरती माहिती

यानंतर बारावी पास महिलांसाठी सर्वात शेवटची एक महत्त्वाची भरती म्हणजे रेल्वे भरती रेल्वे भरती ही एक अशी भरती आहे की ज्या भरतीमध्ये महिलांसाठी विविध पदांसाठी जागा दिली जाते ग्रामीण रेल्वे सेवा ऑपरेटर इंजिनिअरिंग अशा अनेक पदांसाठी महिलांना प्राधान्य देण्यात येत

या भरतीसाठी परीक्षा ही पदानुसार होते म्हणजेच काही पदांना शारीरिक व लेखी चाचणी होते व काही पदांसाठी फक्त लेखी चाचणी परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड करण्यात येते.

FAQ

महिलांसाठी सरकारी नोकरी कोणत्या आहेत

मित्रांनो महाराष्ट्रा मध्ये महिलांसाठी सरकार पोलीस भरती, वन विभाग भरती, रेल्वे भरती, पोस्ट ऑफिस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती अशा असंख्य भरती आहे महाराष्ट्र सरकार महिलांसाठी काढत असते.

Leave a Comment