टॉप 05 सरकारी योजना कार्ड व त्यांचे फायदे

मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 10 सरकारकडून दिले जाणारे कार्ड ज्यांचा फायदा लोकांना सरकारी योजनेमध्ये घेता येतो

तसेच हे दहा सरकारी योजना कार्ड चे फायदे काय आहेत व हे कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईलवर कसे काढू शकता या संबंधित संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा

टॉप 05 सरकारी योजना कार्ड

मित्रांनो आपण जे दहा सरकारी कार्ड पाहणार आहोत त्याचा फायदा तुम्हाला सरकारी योजनेचा शंभर टक्के लाभ मिळवण्यासाठी होणार आहे व यामध्ये असे काही कार्ड आहेत की जे कार्ड तुमच्याकडे असतील तर तुमच्या दवाखान्याचा किंवा आर्थिक परिस्थितीत पैशांचा खर्च देखील दूर होणार आहे

आयुष्यमान भारत कार्ड

मित्रांनो सर्वप्रथम आयुष्यमान भारत कार्ड हे एक असे कार्ड आहे की जे तुमच्याकडे असले तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत दवाखान्याचा खर्च हा मोफत दिला जातो

आयुष्यमान कार्ड फायदे

  • मित्रांनो आयुष्यमान कार्ड चे फायदे असे आहेत की जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला एखादा गंभीर आजार असेल व त्या आजारावर उपचार हा सरकारी किंवा प्रायव्हेट दवाखान्यात चालू असेल तर हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमचा तिथे पाच लाख रुपया पर्यंत बिल हे कमी होऊ शकते किंवा पाच लाख रुपया पर्यंत तुमचा मोफत उपचार होऊ शकतो
  •  आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व फक्त रेशनिंग कार्ड असणे गरजेचे आहे त्यामुळे जास्त कागदपत्र देखील तुम्हाला लागणार नाहीत

आयुष्यमान कार्ड कसे काढायचे

मित्रांनो आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या या (ayushmanbharat.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन हे कार्ड काढावे लागेल

आभा कार्ड

आभा कार्ड हे एक आरोग्य कार्ड आहे की जे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेलात तर तुम्हाला कोणता आजार आहे हा लगेच त्या दवाखान्यातील डॉक्टरांना कळून जाईल

ते कसे तर आभा कार्ड हे लोकांचे आरोग्य कसे आहे या संबंधित माहिती साठवून ठेवते व हे आभा कार्ड आधार कार्ड सारखेच असते व एकंदरीत लोकांचे आरोग्य कसे आहे ही माहिती साठवून ठेवते

 आभा कार्ड चे फायदे

मित्रांनो आभा कार्ड चे असे फायदे आहेत की जर तुम्ही एखाद्या दवाखान्यात उपचारासाठी गेला तर आभा कार्ड दाखवल्याने तेथील डॉक्टरांना लगेच समजून जाईन की तुम्हाला कोणता आजार आहे व तुमची मेडिकल हिस्ट्री कशी आहे त्यामुळे तुमच्याकडे आभा कार्ड असणे खूप गरजेचे आहे

आभा कार्ड कसे काढायचे

मित्रांनो आबा कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या (healthid.ndhm.gov.in) या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करून आभा कार्ड काढावे लागेल

ई श्रम कार्ड

मित्रांनो देशांमधील व राज्यांमधील सर्व बेरोजगार व कामगार लोकांना एकत्रित आणण्यासाठी ई श्रम कार्ड हे सरकारने काढले आहे.या ई श्रम कार्ड च्या मदतीने देशातील सर्व कामगारांना सरकार हे आर्थिक मदत वेळोवेळी करत असते व या ई श्रम कार्ड मुळे कामगारास साठ वर्षानंतर तीन हजार रुपये महिना अशी पेन्शन देखील दिली जाते

ई श्रम कार्ड चे फायदे

  • जर तुम्ही एक बेरोजगार किंवा कामगार व्यक्ती असाल आणि जर तुमचा काम करण्याच्या वेळी एक अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाला ही श्रम कार्ड च्या मदतीने पाच लाख रुपयाची आर्थिक मदत देखील केली जाते
  • तसेच सरकार देशातील कामगारव्यक्तींसाठी वेळोवेळी अनेक योजना व आर्थिक मदत आणत असते त्याचा देखील तुम्हाला ई श्रम कार्ड मुळे लाभ घेता येतो

ई श्रम कार्ड कसे काढायचे

जर तुम्ही कामगार व्यक्ती असाल आणि जर तुम्हाला ई श्रम कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला सरकारच्या या (eshram.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन ई श्रम कार्ड हे काढावे लागेल

एनसीएस कार्ड

मित्रांनो सरकारने एनसीएस कार्ड हे खास करून युवकांसाठी तयार केले आहे व हे कार्ड तयार करण्यामागे सरकारचा उद्देश असा आहे की या कार्डमुळे देशातील युवकांना नवीन उपक्रमांची ट्रेनिंग दिली जाईल व त्यांना एक नोकरीसाठी संधी दिली जाईल

एनसीएस कार्डचे फायदे

मित्रांनो जर तुम्ही एक युवक असाल आणि जर तुम्ही एनसीसी कार्ड काढले तर त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की सरकार अनेक प्रशिक्षण हे युवकांना घेत असते त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल वया कार्ड मुळे तुम्हाला सरकारी व प्रायव्हेट नोकरी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती मिळेल व तेथे तुम्हाला संधी देखील मिळेल

एनसीएस कार्ड कसे काढायचे

मित्रांनो एनसीएस कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या या (ncs.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन हे कार्ड तुम्ही काढू शकता

किसान क्रेडिट कार्ड (kcc card)

मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड हे खास करुन शेतकऱ्यांसाठी बनलेले कार्ड आहे व या कार्डच्या मदतीने शेतकरी तात्काळ शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे

जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड हे काढले तर तुम्हाला सर्वप्रथम असा फायदा होईल की तुमच्याकडे शेत जमीन अगदी एक एकर किंवा एक गुंठा जरी असेल तरी तुम्हाला तात्काळ किसान क्रेडिट कार्ड च्या मदतीने तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे मिळू शकणार आहे

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे

मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या या (pmkisan.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन क्रेडिट कार्ड हा अर्ज डाऊनलोड करावे लागेल व त्यानंतर तो अर्ज भरून जवळच्या बँकेत द्यावा लागेल त्यानंतरच तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल


Leave a Comment