मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात व जात प्रमाणपत्र कसे काढले जाते याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती ही या आजच्या लेखा मध्ये भेटेल
जातीचा दाखला कागदपत्रे 2023
- ओळखपत्र (आधार कार्ड,पॅन कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्माचा दाखला
- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
- वडिलांचा जन्म दाखला
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- आजोबांचा जन्म दाखला
- वंशावळ
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- हक्क पत्र नोंद
इत्यादी वरील कागदपत्रे ही तुम्हाला जातीचा दाखला काढण्यासाठी लागणार आहे
कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- पत्त्याचा पुरावा (सातबारा,रेशन कार्ड)
- वयाचा पुरावा (जन्माचा दाखला)
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- वडिलांचा किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला
- हक्क पत्र नोंद
- वंशावळ
वरील कागदपत्रे ही कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत
जात प्रमाणपत्र कागदपत्रे St जातीसाठी
- उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र
- स्वयंघोषणापत्र
- चौकशी अहवाल
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला
- बोनाफाईल
- वडिलांचा जातीचा दाखला
- वडिलांचा जन्म दाखला पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला
- आजोबांचा जन्म किंवा मृत्यू दाखला
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- 1950 चा पुरावा
- वंशावळ
- हक्क पत्र नोंद
वरील कागदपत्रे ही अनुसूचित जाती जमाती म्हणजेच ST जातीसाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत
जात प्रमाणपत्र कागदपत्रे obc
- उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र
- स्वयंघोषणापत्र
- चौकशी अहवाल
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला
- बोनाफाईल
- वडिलांचा जातीचा दाखला
- वडिलांचा जन्म दाखला पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला
- आजोबांचा जन्म किंवा मृत्यू दाखला
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- 1950 चा पुरावा
- वंशावळ
- हक्क पत्र नोंद
वरील कागदपत्रे ही ओबीसी कास्ट प्रवर्गातील लोकांसाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत
जातीचा दाखला कसा असतो
मित्रांनो जातीचा दाखला हा चौकोनी आकाराचा कलर प्रिंट मध्ये असतो ज्यावर आपले नाव गाव याबद्दल माहिती व आपली जात कोणती आहे हे नमूद केले असते.
तो दाखला ओरिजनल आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही त्या दाखल्याच्या खालील उजव्या बाजूस एक आपल्या जिल्ह्याच्या सब डिव्हिजनल ऑफिसर चा जर शिक्का व सही त्यावर असेल तर ते प्रमाणपत्र हे ओरिजनल प्रमाणपत्र म्हणून ओळखले जात
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रे | येथे क्लिक करा |
जातीचा दाखला कुठे काढायचा
मित्रांनो आपण जातीचा दाखला हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील काढू शकतो
ऑफलाइन पद्धतीने जर तुम्हाला जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या महसूल कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज घेऊन त्याबरोबर तुमची सर्व कागदपत्रे जोडून तिथे तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल त्यानंतर तुमचा जातीचा दाखला हा तुम्हाला तिथे दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मिळून जाईल
तसेच तुम्ही ऑनलाईन देखील जात प्रमाणपत्र हे काढू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या संकेतस्थळावरती जावे लागेल व तिथे जाऊन सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागते त्यानंतर तुम्हाला काही दिवसात जात प्रमाणपत्र हे मिळून जाईल या पद्धतीने जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही युट्युब वरती प्रत्यक्ष व्हिडिओ पहा व त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा
जातीचा दाखला किती दिवसात मिळतो
मित्रांनो जातीचा दाखला हा पूर्णपणे महसूल विभागातून काढला जातो तर जर तुम्ही तुमच्या जवळच्या महसूल कार्यालयामधून जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तपासून व सर्व कागदपत्रे योग्य आहेत की नाही याची पूर्तता करून तुमचा जातीचा दाखला हा 15 ते 30 दिवसाच्या कालावधीच्या आत तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात प्राप्त होऊन जातो