मित्रांनो शैक्षणिक कामात व खाजगी व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खूप वेळा तलाठी उत्पन्न दाखला याची गरज भासते व तो दाखला काढण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे कोणती असायला पाहिजेत हे आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे खालील लेख संपूर्ण व्यवस्थित वाचा
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड पॅन कार्ड)
- रेशन कार्ड
- फोटो
- स्वयंघोषणापत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- सातबारा उतारा
- तलाठी उत्पन्नाचा अहवाल
घरबसल्या उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा
मित्रांनो तुम्ही घर बसल्या अगदी 35 रुपयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला हा तीन ते चार दिवसात काढू शकता तो कसा काढायचा जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा
- सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलवर गुगल क्रोम या एप्लीकेशन वरती जाऊन गुगल वरती आपले सरकार या संकेतस्थळावरती जावे लागेल
- त्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला आपले सरकार संकेतस्थळाचे होम पेज दिसेल
- त्यानंतर तुम्हाला तिथे उजव्या बाजूस (New user register here ) असा एक पर्याय दिसेल जर तुम्ही नवीन युजर असेल तर तुम्हाला त्या पर्यायावर ती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे
- आणि तुम्ही जर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या लॉगिन मेनू वरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड आणि कैप्चा व तुमचा जिल्हा टाकून लॉगिन करायच आहे
- लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूस एक ( revenue department ) असा पर्याय निवडायचा आहे
- त्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन पेज उघडेल Sab department म्हणून त्यामध्ये तुम्हाला revenue service असा तिथे पर्याय निवडायचा आहे
- त्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे पर्याय उघडतील तिथे तुम्हाला खाली थोडं scroll करून income certificate या पर्यायावर क्लिक करायचे आहे व वरती पिवळ्या बॉक्स मध्ये असलेल्या (proceed) या पर्यायावर ती क्लिक करायचं आहे
- त्यानंतर तुमच्यासमोर हे नवीन पेज लोड होऊ नये त्यामध्ये तुम्हाला income certificate या पर्यायावर क्लिक करायचं आहे
- यानंतर पुन्हा एकदा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल त्या पेज वरती तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे सांगितली जातील ती तुम्ही वाचून खाली जाऊन continue या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होऊन उत्पन्नाचा दाखला अर्ज ऑनलाईन हा तुम्हाला समोर दिसेल तिथे तुम्ही संपूर्णपणे योग्य माहिती भरा व शेवटी तुम्हाला तीस रुपयाचे ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करावे लागेल
अशा पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला काढू शकतो या संबंधित अधिक माहितीसाठी जर तुम्हाला माहित नसेल की उत्पन्नाचा दाखला कसा भरावा तर त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही युट्युब वरती एखादी व्हिडिओ पाहून माहिती करून घेऊ शकता
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रे | येथे क्लिक करा |
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
उत्पन्नाचा दाखला Download कसा करायचा
मित्रांनो वरील पद्धतीने जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही खालील सांगितलेल्या माहितीप्रमाणे तो उत्पन्नाचा दाखला डाऊनलोड करू शकता
- उत्पन्नाचा दाखला डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार या संकेतस्थळावरती जावे लागेल
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला युजर आयडी व पासवर्ड टाकून एक कैप्चा व तुमचा जिल्हा निवडून तुम्हाला लॉगिन बटणावर करून लॉगिन करावे लागेल
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जो ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तो अर्ज तुम्हाला तिथे दिसेल व त्या अर्जाच्या समोर तुम्हाला पन्नाचा दाखला डाऊनलोड करण्यासाठी एक डाउनलोड असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करू शकता
FAQ
उत्पन्नाचा दाखला कुठे मिळतो
मित्रांनो उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला दोन ठिकाणी मिळतो एक म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा अगदी 30 रुपयात मिळतो व दुसर म्हणजे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन देखील तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा मिळतो
उत्पन्नाचा दाखल्याचे फायदे काय
मित्रांनो उत्पन्नाच्या दाखल्याचे शैक्षणिक,खाजगी व सरकारी कामात खूप फायदे आहेत जसे की जर शैक्षणिक कामात तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागत असेल तर तुम्हाला शासनाकडून शिष्यवृत्ती प्राप्त होते तसेच सरकारी अनेक योजनांचा लाभ देखील तुम्हाला मिळतो
अर्ज केल्यानंतर उत्पन्नाचा दाखला किती दिवसात मिळतो
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात मिळतो