मित्रांनो एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा दल ही एक महाराष्ट्रातील सरकारी सिक्युरिटी एजन्सी आहे या दलाची स्थापना ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मार्फत करण्यात आली आहे हे पद एक महाराष्ट्र पोलीस दलाप्रमाणे आहे तर या पदासाठी महाराष्ट्र सरकार किती वेतन देते हे आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत

Maharashtra security force salary
पद | पगार |
महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स (सुरक्षा दल) | किमान 17,000 |
हत्यारी सुरक्षा रक्षक | किमान 18,000 |
वरील वेतना मधून सुरक्षारक्षक दलाच्या व्यक्तीच्या पगारातून दर महिन्याला 12% EPF कट केला जातो
MSF पद इतर सोयी सुविधा
महाराष्ट्र सुरक्षा दल या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराला ॲक्सिस बँक बँकेकडून 15 लाखाचा अपंगत्व विमा व 45 लाखांचा अपघाती विमा दिला जातो
तसेच संबंधित सुरक्षा दल या पदावर काम करत असणाऱ्या उमेदवाराला व त्याच्या कुटुंबाला सरकारी व खाजगी दवाखान्यांमध्ये सवलती दिल्या जातात
MSF पद माहिती
मित्रांनो MSF या पदासाठी जर तुमची नियुक्ती झाली असेल तर सुरुवातीला तुम्हाला 45 दिवस MSF पदाची ट्रेनिंग घ्यावी लागते
MSF ही नोकरी एक शासकीय नोकरी नाही ही नोकरी एक निमशासकीय नोकरी आहे
MSF या पदासाठी काम करत असणाऱ्या उमेदवाराची ड्युटी ही मोठमोठ्या दवाखान्यात बँकेमध्ये टोलनाके कॉलेज व अनेक सरकारी व खाजगी कामांमध्ये लावली जाते
FAQ
महाराष्ट्र सुरक्षा दल पदासाठी सुट्ट्या कशा असतात
सर्वप्रथम मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा दल या पदासाठी एक साप्ताहिक सुट्टी दिली जाते ती आठवड्यातून एकदा असते यानंतर 11 महिन्यात त्याला 23 पगारी सुट्ट्या दिल्या जातात
MSF पदाचा पगार किती तारखेला होतो
MSF (महाराष्ट्र सुरक्षा दल) या पदाचा पगार हा दर महिन्याला सहा तारखेला होत असतो
महाराष्ट्र सुरक्षा दल पदाला किती तास काम असते
महाराष्ट्र सुरक्षा दल या पदासाठी दररोज आठ तास काम असते परंतु काही अडचणी असल्यास ओवर टाईम देखील करावे लागते त्याचा जास्त पगार खात्यात जमा होत असतो
महाराष्ट्र सुरक्षा दल या पदाचा पगार कुठे जमा होतो
महाराष्ट्र सुरक्षा दल या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराचा पगार हा AXIS BANK या बँकेमध्ये होतं व त्याला या बँकेमध्येच खाते खोलावे लागते