मित्रांनो लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत आणि या लग्नसरामध्ये महाराष्ट्रातील परंपरेनुसार प्रत्येक लग्नात नवरीला किंवा नवरदेवाला एक नाव म्हणजेच एक उखाण घ्याव लागतं त्यामुळे आजच्या लेखात आपण टॉप 100 महिलांचे विनोदी उखाणे पाहणार आहोत
funny ukhane in marathi for female
- गव्हाचे पोते सुईने उसवले विश्वासरावंनी मला कॉलेजमध्ये डोळे मारून पटवले
- हातामध्ये हात आहे बोटांमध्ये बोट, विलास च नाव घेते आता जात नाही कुठे
- कोरोना संकट आलं या जगावर वाहून राहुल च नाव घेते मास्क आणि सॅनिटायझर लावून
- काचेच्या ग्लासात चक चक दही, संकेत रावांच्या अंगठीवर इंग्लिश माझी सही
- साडी घालते फॅशनची पदर घेते साधा, संकेत राव माझे कृष्ण मी त्यांचे राधा
- उखाणा घेते आशीर्वाद द्यावा, कैलास रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा
- खान तशी माती, कैलास राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती
- अंगणात होत रुंदावन, वृंदावनात होती तुळस, कैलास रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस
- हिमालयाच्या पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी अक्षय रावांनमुळे आली आयुष्यला गोडी
- गोकुळाच्या वनामध्ये कृष्ण वाजवितो बासरी, कैलास रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी
- संध्याकाळी दिवा लावून नमस्कार करते देवाला, मंगेश रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला
- शंकराच्या मंदिराला सोन्याचा कळस, अक्षय रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस
- अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी, गणेश रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती
- संसार रूपी वृक्षाला बांधून प्रेमाचा झुला,…… रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला
- आधुनिक स्वयंपाक घरात शोभतो डायनिंग टेबल,…….. रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल
- जाई जुईच्या वेली खाली हरिण घेते विसावा,…….. रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा
- गळ्यामध्ये मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं,….. रावांचं नाव माझ्या हदयात कोरलं
- ब्रह्मा,विष्णू,महेश अनुसयेचे पुत्र, ……… रावांच्या नावाचे घातले मंगळसूत्र
- माहेरी साठवले मायेचे मोती,अक्षय रावंच नाव घेऊन जोडते नवीन नाती
- पराक्रमाची यशोगाथा सांगते महाराष्ट्राची माती, शेखर रावांनं सोबत जुळली जन्मस्थळाची नाती
- चांदीच्या परातीमध्ये सोन्याची नाणी, आजपासून झाली विश्वास रावांची राणी
- घरातील मोठ्यांचा करावा माण सान्मान, सुनील रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण
- आकाशातील शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा, अनिल रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा
- आई-वडील करीत होते काळजी, कसे मिळते घर, संकेत रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर
- चहा केला नेऊन दिला, चिवडा केला ताजा, प्रतीक रावांचे नाव घेते पहिला नंबर माझा
- चांदीच्या वाटीत खडीसाखरेचे खडे, तुषार रावांचं नाव घेते देवापुढे
- सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवल, यांच्यासाठी मी आई बापाला रडवले
- इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून, रोहन रावांचं नाव घेते जाधव पाटलांची सून
- अडवलं सर्वांनी पुढचं पाऊल, शिवम रावांचं नाव घेते कपाळाला कुंकू लावून
- जन्म दिला माझ्या मातेने, पालन केल माझ्या पित्याने, राहुल रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने
- आकाशाच्या प्रांगणात ब्रह्म विष्णू महेश, अजित रावांचं नाव घेऊन करते मी गृहप्रवेश
- चांदीच्या वाटीमध्ये सोन्याचा चमचा, सागर रावांचं नाव घेते आशीर्वाद असू द्या तुमचा
- स्वर्गामध्ये जुळतात लग्नाच्या गाठी, अभिजीत रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी
- रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा, प्रशांत रावांच्या नावाचा भरला मी हिरवा चुडा
- उंबरठ्याशी उभी आहे ओलांडते मी माप, सोडून आली सारा परिवार, सुशांत रावांचं आता माझा आधार
- आनंदाने भरला दिवस हा लग्नाचा, गणेश रावांना घास भरवते गोड गोड जिलेबीचा
- यमुनेच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी सुमित रावांनं सोबत निघाले मी सासरी
- पैठणीच्या साडीवर सुंदर मोराची नक्षी, स्वप्निल रावांशी लग्न केलं देवा-ब्राह्मणाच्या साक्षी
- गळ्यामध्ये मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरले, अनिकेत रावांचं नाव मी माझ्या आयुष्यात कोरले
- गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वती चे सुपुत्र, प्रतिक रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र
- दारात होती तुळस, तिला घातले होते पाणी, आधी होती आईबापांची तान्ही, आता झाली संकेत रावांची राणी
- नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती संसार होईल मस्त,…… राव असता सोबती
- पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते जाऊन रोहित रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
- हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल
- सासरची छाया माहेरची माया,…. रावांनं सोबत माझे सर्व हट्ट पुरवाया
- कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून, अथर्व रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून
- कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास, सुजल रावांनी भरवला आज मला पहिला घास
- गार गार माठामध्ये पाणी ताजे ताजे, सार्थक राव माझ्या मनाचे झाले राजे
- सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, विराज रावांचं नाव गृहप्रवेशाच्या दिवशी
- ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, विनायक रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल