मित्रांनो जर तुम्ही सरपंच किंवा उपसरपंच असाल किंवा तुम्हाला तुमच्या गावांमध्ये सरपंच किंवा उपसरपंच बनायचे असेल तर या पदासाठी सरकार मार्फत किती वेतन पगार दिला जातो ते आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत
सरपंच पगार किती असतो
मित्रांनो गावचा सरपंच या पदासाठी जो शासनाकडून पगार दिला जातो तो पगार हा गावातील लोकसंख्येला आधारित पगार दिला जातो
लोकसंख्या | वेतन |
0 ते 2000 लोकसंख्या ग्रामपंचायतीला | दरमहा 3000 रुपये |
2000 ते 8000 लोकसंख्या ग्रामपंचायतीला | दरमहा 4,000 रुपये |
8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामपंचायतीला | दरमहा 5,000 रुपये |
वरील पगारवाढ शासन निर्णय हा 20 जुलै 2021 चा आहे त्या शासन निर्णयास अनुसार वरील पगार हा गावातील सरपंच पदासाठी दिला जातो
उपसरपंच पगार किती आहे
लोकसंख्या | वेतन |
0 ते 2000 लोकसंख्या ग्रामपंचायतीला | दरमहा 1,000 रुपये |
2000 ते 8000 लोकसंख्या ग्रामपंचायतीला | दरमहा 1,500 रुपये |
8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामपंचायतीला | दरमहा 2,000 रुपये |
ग्रामपंचायत सदस्य पगार किती असतो
मित्रांनो शासनाकडून ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सदस्यांना दर महिना पगार दिला जात नाही परंतु दर महिन्याच्या ज्या मासिक मीटिंग असतात त्या मिटींगला जर सदस्यांची उपस्थिती राहिली तर त्यांना मासिक भत्ता म्हणून 200 रुपये दिले जातात
ग्रामपंचायत ची स्थापना कशी होती
मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना ही गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते
- ज्या गावात 1,500 पर्यंत लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत चे सात सदस्य नेमले जातात
- ज्या गावात 3,000 पर्यंत लोकसंख्या असते त्या गावांमध्ये नऊ ग्रामपंचायत सदस्य नेमण्यात येतात
- ज्या गावात 4,500 लोकसंख्या असते त्या गावांमध्ये एकूण 11 ग्रामपंचायत सदस्य नेमले जातात
- ज्या गावा मध्ये 6,000 लोकसंख्या असते त्या गावांमध्ये एकूण 13 सदस्य नेमण्यात येतात
- ज्या गावांमध्ये एकूण 7,500 लोकसंख्या असते त्या गावांमध्ये 15 सदस्य ग्रामपंचायत मार्फत नेमण्यात येतात
अश्या वरील पद्धतीने लोकसंख्येवर आधारित ग्रामपंचायत ची स्थापना किंवा एक आराखडा तयार केला आहे ज्या मार्फत सदस्यांची निवड केली जाते