INDvsSA : भारतीय टीम साठी इतिहास रचण्याची संधी; साऊथ आफ्रिकेला भारत हरवू शकेल का…

A chance to create history for the Indian team Can India beat South Africa

INDvsSA :   भारतीय क्रिकेट संघाचे अनेक  खेळाडू येत्या काही दिवसांपासून आपल्याला सुट्टीवर पाहायला मिळतात. परंतु आत्ता होणाऱ्या भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीज मध्ये जर भारत क्रिकेट टीम ही टेस्ट मालिका जिंकली तर संपूर्ण जगभरात भारत टीमचं नाव होणार आहे, ते कसे तर पहा..

साऊथ आफ्रिका मध्ये आज पर्यंत जेवढ्या पण भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टेस्ट मालिका झाल्या त्यामध्ये सर्वात जास्त पराभव हा भारतीय संघाचा झालेला आहे, हेच नाही तर पूर्ण विश्वभरात भारतीय संघाला सर्वात जास्त पराभव करणारा संघ म्हणून साऊथ आफ्रिका संघाला ओळखले जाते, भारत संघाने साऊथ आफ्रिका संघ विरुद्ध आज पर्यंत जेवढे सामने खेळले त्या सर्व सामन्यांमध्ये भारताचा संघ हा फक्त चार वेळा विजय प्राप्त करू शकला आहे त्यामुळे आत्ता जी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका एक दिवसीयम टेस्ट मालिका होणार आहे त्यात भारताचा संघ जर जिंकला तर पूर्ण विश्वभरात त्यांचे नाव होईल.

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका हा सामना सेंचुरियन या मैदानात पार पडणार आहे जे सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी होणारी मैदान म्हणून ओळखले जाते. भारत संघ या मैदानावर  न जिंकण्याचे कारण ही असेच आहे की, इथे गोलंदाजी एवढी चांगली होते की कोणताही फलंदाज जास्त वेळ फलंदाजी करू शकत नाही जगातील सर्वात उत्कृष्ट मैदानापैकी हे एक मैदान ओळखले जात

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मालिकेत कोणते भारताचे खेळाडू खेळणार आहेत, रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळणार आहे त्यानंतर डाव्या हाताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, श्रीकर भारत, एवढे भारतीय संघाचे खेळाडू या मालिकेमध्ये खेळणार आहेत

अनेक क्रिकेट चाहत्यांकडून सोशल मीडियावर भारतीय संघासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यावर भारतीय संघ आता साऊथ आफ्रिका संघा विरुद्ध कसा खेळेल हा प्रश्न आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात पडला आहे भारत देश एक विश्व इतिहास बनू शकेल की नाही हे आता येणारा काळ आपल्याला दाखवेल परंतु जर भारताने 350 किंवा 400 रणांपर्यंत फलंदाजी केली तर नक्कीच भारतीय क्रिकेट संघ हा विश्वभरात इतिहास रचु शकतो

Leave a Comment