कृषी बातम्या : शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस आपण शेती व्यवसायामध्ये अनेक भन्नाट जुगाड झालेले पाहत असतो त्यामधीलच एक जुगाड आता शेती व्यवसायात खूप प्रसिद्ध होते चालला आहे, तो म्हणजे एका गाडीच्या साह्याने आपण शेतीतील असंख्य कामे करू शकतो ते करून दाखवले आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील हिरापूर गावांमधील एका युवकांनी ज्याचे नाव आहे प्रवीण मते
प्रवीण मते हा अमरावती जिल्ह्यातील एक संत्री उत्पादक शेतकरी आहे याची शेती ही दोन ते अडीच एकर च्या आसपास आहे परंतु शेतीची मशागत करण्यासाठी त्याला अडचण येत होती ज्यामुळे त्याने ट्रॅक्टर घेण्याचा विचार केला होता परंतु ट्रॅक्टर घेण्यासाठी खूप पैसे लागत असल्या कारणामुळे त्यांनी घरच्या घरी काही जुगाड करता येईल का याचा विचार केला व त्यातून त्याला एक युक्ती सुचली ती म्हणजे
घरात असलेली जुनी गाडी त्याला बाजारामध्ये विकायची होती परंतु पाहिजे तेवढा त्या गाडीला भाव मिळत नव्हता ग्राहक अगदी त्या गाडीला भंगार्याच्या भावामध्ये दोन ते तीन हजार रुपयाला मागत होते मग त्यानंतर त्यांनी असा विचार केला की या गाडीचा आपल्याला काही यंत्र बनवता आलं तर त्या यंत्राचा आपल्याला व्यवसायामध्ये चांगला उपयोग होईल
असा विचार करून त्याच्या ओळखीच्या गाडी गॅरेज वाल्या मित्राकडे तो गेला व त्याने त्याला सांगितले की या गाडीला आपल्याला असे बनवायचे आहे की ज्याचा वापर आपल्याला शेतीमध्ये करता येईल व त्या युक्तीवर दोघांनी विचार करून त्या गाडीला एक ट्रॅक्टरची संकल्पना देण्याचा विचार केला ज्याच्या साह्याने आपल्याला ट्रॅक्टरची छोटी-मोठी कामे करता येतील.
त्यामुळे प्रवीण व त्याच्या गॅरेज वाल्या मित्राने या गाडीमध्ये काही बदल करण्याचा विचार केला व या संकल्पनेवर त्या दोघांनी काम करण्यास सुरुवात केले व अवघे त्या गाडीवर तीस हजार रुपये खर्च करून त्यांनी एक यंत्रणा तयार केली ज्यामध्ये त्या गाडीला 100 सी सी चे इंजिन असल्यामुळे ते इंजिन शेतीची अवजारे ओढत नव्हतं त्यामुळे त्यांनी त्याच्यात थोडा बदल करून त्या गाडीला 150 सी सी च इंजिन दहा हजार रुपये देऊन बसवलं जे की आजकाल बुलेट किंवा पल्सर गाडी मध्ये असतं.सर्व यंत्रणा गाडीमध्ये बसून जेव्हा शेतामध्ये गाडी नेण्यात आली तेव्हा सुरुवातीला असंख्य लोकांकडून त्यांना टोमणे मारण्यात आले परंतु त्यांनी न खचता ही यंत्रणा शेतीमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला व त्या निर्णयावर त्यांना यश देखील प्राप्त झाले व आता प्रत्येक गावामध्ये या यंत्रणेसाठी मागणी वाढू लागली आहे व प्रवीण मते यांची मुलाखत देखील खूप मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे, तुम्हाला जरी या यंत्रणे विषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या क्रमांकावर संपर्क (9373239768) करून प्रवीण मते यांच्याकडून माहिती घेऊ शकता