Poultry farm : 3 महिन्यात 2 लाख नफा कमवला, गावरान कोंबड्यांचा पैसाच पैसा…

a farmer son made an income of two lakhs in three months by doing poultry farming

Poultry Business : महाराष्ट्रात ग्रामीण भागात व तरुण पिढीला व्यवसायामध्ये चालना देणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय व हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात केला जाणारा व्यवसाय आहे जो अगदी शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो व या व्यवसायात ग्राहकांची खूप मागणी देखील आहे त्यामुळे आज आपण अशा युवकाची माहिती पाहणार आहोत ज्याने हा व्यवसाय करून 3 महिन्यात 2 लाख उत्पन्न काढले

महाराष्ट्रातील जिल्हा सांगली मध्ये सांबवडे या ठिकाणी राहणारा शुभम साळुंखे नावाचा युवकाने दोन ते तीन महिन्यापूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला व या व्यवसायातून त्यांनी तीन महिन्यात दोन लाख रुपयाचे उत्पन्न काढले जे की एका सरकारी नोकरदाराला एवढा पगार नसतो

शुभम साळुंखे सांगतो की बाजारामध्ये आपल्याला बरेच पोल्ट्री फार्म पाहायला मिळतात जसे की बॉयलर पोल्ट्री फार्म त्यानंतर लेयर पोल्ट्री फार्म परंतु मी जो पोल्ट्री फार्म टाकला तो संपूर्णपणे गावरान कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म टाकला, कारण म्हणजे शहरात किंवा ग्रामीण भागात सगळ्यात जास्त कोंबड्यांना जी मागणी असते ती गावरान कोंबड्यांना असते, त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनात सगळ्यात जास्त मागणी असलेला व्यवसाय कधीही केलेला चांगलंच त्यामुळे शुभमने गावरान कोंबडी व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय घेतला.

शुभम ने व्यवसायाची सुरुवात ही 6000 पक्षांनी केली परंतु, जर आपण या व्यवसायाची सुरुवात करत असाल तर तुम्ही सुरुवातीला 50 ते 100 पक्षी घेऊन देखील करू शकता अर्थात तुमचे उत्पन्न हे थोडे कमी होईल पण तुम्हाला या व्यवसायामध्ये अनुभव येईल, शुभम नी ज्या 6000 पक्ष्यांची पहिली बॅच भरली त्यामध्ये त्याला 3 महिन्यात उत्पन्न मिळाले म्हणजेच एक बॅच तयार होण्यासाठी किमान 3 महिने हे लागतात,

कारण गावरान कोंबडीची वाढ ही खूप हळू होत असते त्यामुळे 3 महिन्यात गावरान कोंबडी ही 1 ते 1.5 किलोच्या आसपास जाते ज्याचा आपल्याला बाजारामध्ये एक उत्तम भाव मिळतो.

गावरान कोंबडी पालन व्यवसाय करताना पिल्लांची निवड ही शुभम साळुंके अशाप्रकारे करतात की जर पक्षी हा टवटवीत असेल तर तो पक्षी अधिक काळ टिकतो गावरान कोंबडीचा पक्षी हा तुम्हाला 25 ते 30 रुपयात उपलब्ध होतो

सुरुवातीला जेव्हा आपण गावरान कोंबडीची पिल्ले आणतो तेव्हा आपल्याला त्यांना एका बंद खोलीत ठेवायचे आहे ज्यामध्ये आपल्याला त्यांना उब द्यावी लागेल उप देण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये जे पिवळ्या रंगाचे 200 वॅट  चे बल्ब मिळतात ते तुम्ही लावून त्यांना उब देऊ शकता

त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला त्यांना खाद्य हे मका घालायचे आहे जर तुमच्याकडे बाजरी असेल ते देखील तुम्ही घालू शकता, पक्षी हा सहा ते आठ दिवस संपूर्ण मोठा होईपर्यंत तुम्हाला त्याला एखाद्या बंद खोलीत किंवा बंद बॉक्समध्ये ठेवायचे आहे त्यानंतर त्याला बाहेर काढायचे आहे

गावरान कोंबडीचे पिल्ले आणल्यानंतर त्यांना तीन लस दिल्या जातात त्या तीन लस तुम्ही एक सहाव्या दिवशी एक आठव्या दिवशी व एक 21व्या दिवशी अशा स्वरूपात द्यायचे आहेत त्या लसणाचे नाव आहे lasoota, gumbora, lasota या तीन लस ठरलेलं लस आहेत ज्या तुम्हाला पिनलांना प्रत्येक सहा दिवसानंतर द्यायच्या आहेत

अशाप्रकारे शुभम साळुंखे हा एक गावरान कुक्कुटपालन व्यवसाय करतो व त्यातून लाखोचे उत्पन्न काढतो जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही युट्युब वर निलेश साळुंखे याचे नाव टाकून माहिती घेऊ शकता

Leave a Comment