Goat farm : नोकरी करून पगार 2 लाख व  शेळी पालन करून पगार 7 लाख,तुम्ही काय कराल..

A young man who earns 2 lakhs by working and 7 lakhs by doing goat rearing business

Goat farm : महाराष्ट्र मध्ये चिकलठाणा छत्रपती संभाजी नगर येथे एका तरुणाने दोन लाखाची नोकरी सोडून सात लाख रुपये कमवून देणारा शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहे, शहरांमध्ये रोजगारासाठी फिरणारा नंदकुमार त्याने भाड्याने जमीन घेऊन त्यात शेळी पालन व्यवसाय केला व तो आत्ता सात लाख रुपये नफा कमवत आहे

नंदकुमार हा मूळचा महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी नगर येथे राहणारा युवक आहे पूर्वीपासून त्याला व्यवसायामध्ये ओढ होती. नंदकुमार यांच्या घरात पूर्वीपासून पारंपारिक व्यवसाय हा शेळी पालन व्यवसाय होता ज्यामध्ये सुरुवात ही जानेवारी 2020 मध्ये आठ शेळ्यांपासून झाली होती.

 नंदकुमार हा एका कंपनीमध्ये परमनंट पोस्टवर नोकरी करत होता परंतु बारा तास काम असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून त्याचा पूर्वीपासून चालत आलेला शेळीपालन व्यवसाय मोठा करण्याचा निर्णय घेतला व तो निर्णय यशस्वी देखील ठरला, व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांनी त्याच्या गोट फार्मचे नाव स्वराज्य गोट फार्म असे टाकून शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली

नंदकुमार याची गायरान जमीन असल्यामुळे व एक दोन एकर मध्ये त्याने मेथी घास करून संपूर्ण शेळी पालनाचे व्यवस्थापन नियोजन केले, या व्यवसायातून त्याने तीन महिन्यात सात लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे व शेती पूरक व्यवसायामध्ये शेळी पालन व्यवसाय हा किती उपयुक्त ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे

Leave a Comment